आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा शोध असा लागला होता..


पार्टीला जायचे असो अथवा घर सजवायचे असो परफ्यूम मुळे सगळं शक्य आहे. तुम्ही अंघोळ करा अथवा न करा तमच्या शरिरापासुन येणाऱ्या दुर्गंधीस दूर करतो. आज कितीतरी प्रकारचे फ्लेवर्ड परफ्यूम बाजारात उपलब्ध आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का हे कुठुन आले?

तुम्हाला माहिती आहे का परफ्यूम ची सुरुवात कुठून झाली? , पहिली व्यक्ती कोण आहे ज्याच्या मनात परफ्यूम बनवण्याचा विचार आला? अशाच काही प्रश्नांची उत्तरे येथे आपण पाहणार आहोत.

new google

धर्मामध्ये विशेष महत्त्व.

परफ्यूम
परफ्यूम- yuvakatta

परफ्यूम च्या बाबतीत खुप प्रकारचे मत आहेत.अस म्हटल्या जाते कि जंगलात जनावरे चालणाऱ्या लोकांनी अशा जडी बुटींचा शोधल्या ज्या जाळल्यानंतरही वातावरण सुगंधित करतात. त्यांचाच उपयोग परफ्यूम तेल बनवण्यात केला जाऊ लागला. अशा शोधांच्या नंतर लोकांनी असे अवयव शोधले ज्यांच्या पासून परफ्यूम बनवता येईल.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


जवळपास सगळ्याच धर्मांमध्ये परफ्यूम चा उपयोग होतो. एकीकडे हिंदू धर्मात देवी देवतांची अनुष्ठान पुजा पाठ मध्ये परफ्यूम वापरतात तर दुसरीकडे ईद मध्ये मोठ्या प्रमाणात परफ्यूम ची मागणी असते. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये सुध्दा परफ्यूम चे वर्णन आढळते.पुजा पाठ आणि रोजच्या कार्यामध्ये याचा वापर करतात.

सुगंधित परफ्यूम रोपटी किंवा फुलांपासून मिळतात.ज्यांचा उपयोग देवतांची उपासनेसाठी केला जात होता. आजही खुप धर्मांमध्ये वापरल्या जाते.

भू-मध्य सागराच्या आसपासच्या लोकांद्वारे यांचा उपयोग देवतांची उपासनेसाठी केला गेला. विश्वातली प्राचीन परंपरा मध्ये सुद्धा परफ्यूम चा वापर केला आहे. जो आजही सुरुच आहे. सुफी लोकांसाठी हे परफ्यूम भौतिक संपत्ती मानल्या जाते जे मनुष्याला मिळाली आहे.

मेसोपोटामिया मध्ये बनले होते पहिले परफ्यूम !

आपण जेंव्हा कधी परफ्यूमच्या सहवासात येतो तेंव्हा आपण मोहून जातो आणि तो सुगंध कोठून येतो याचा शोध घेतो. जेथुन तो सुगंध येतो तिकडे आपले पाय वळतात. खुप वेळा आपल्याला तिकडे जाण्याची इच्छा नसते पण आपल्या मनात त्या ठिकाणाविषयी जिज्ञासा असते. या प्रकारे तो सुगंध आपल्या डोक्यात घर करून बसतो.

जेंव्हा खुप वर्षांनंतर आपण तो सुगंध परत घेतो तेंव्हा आपल्याला त्याची आठवण होते. हे असेच आहे जसे आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला मातीचा सुगंध घेतो आणि आपल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण होतो.

परफ्यूम च्या सुरूवातीविषयी खुप मत प्रचलीत आहेत. साधारणपणे जगातील इतर लोकांच्या अगोदर मेसोपोटेमिया, मिस्र आणि फारस येथील लोकांना परफ्यूम चे निर्माते मानल्या जाते. असही म्हणतात की मेसोपोटेमिया बेबीलोन मधील ताप्पुती नावाच्या महिला केमीस्टने सुगंध, तेल आणि फुलांपासून पहिला परफ्यूम बनवला.

जवळपास ४००० वर्षांपूर्वी मिस्र मधील शिक्षीत आणि उच्च वर्गाचे लोक श्रृंगाराच्या वेळेस तसेच त्यांच जिवनमान दर्शविण्यासाठी परफ्यूम चा वापर करत. मिस्रचे लोक परफ्यूम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अफ्रिकेच्या जंगलांमधून सुगंधित सामान मागवत होते.

ते धार्मिक कार्यात , रोजच्या जीवनात तसेच मृत कार्यक्रमात परफ्यूम चा वापर करत. मिस्र मधील किंग्स घाटी मधील शाही मकबऱ्याच्या भिंतीवरील चित्र लिलीच वर्णन करतात.

परफ्यूम

पॅरिस मधुन झाली आधुनिक परफ्यूम ची सुरुवात.

२००७ साली पुरातत्ववादी लोकांना साइप्रस मध्ये इस पुर्व २००० मधील परफ्यूम बनवणाऱ्या कारखाना सापडला. अस म्हटल्या जाते इथे प्रामुख्याने धनिया, लॉरेल, हिना,लैवेंडर आणि रोजमैरी फ्लेवर यांच्या परफ्यूम चे उत्पादन करत होते.
परफ्यूम च्या बाबतीत आधुनिक माहीती ९व्या शतकातील अरबी परफ्यूम बिषयाच्या ‘दी बुक ऑफ फरफ्यू ‘ मधून मिळते. याचा लेखक याकुब अल किंडी होता.

तसेच फारसींनी राजनितीक संकेत पोहचवण्यासाठी परफ्यूम चा उपयोग केला. इस्लामिक संस्कृतीने परफ्यूम विकासामध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी परफ्यूम च्या विकासासाठी नविन प्रकारचे शोध लावले. त्यात त्यांनी खुप प्रकारचे फ्लेवर मिळवले.

फारसियांचे खुप शतके परफ्यूम च्या व्यापारावर वर्चस्व राहिले. अस म्हणतात की त्यांनी आसवन प्रक्रियेचा वापर करून अल्कोहोल चा शोध लावला याच प्रक्रियेचा वापर करून भारतात आजही परफ्यूम बनवल्या जाते.

परफ्यूम

तसेच एविसेना नावाच्या फारसी डॉक्टर , रसायनशास्त्रज्ञ याने आसवन विधीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. एविसेना हा पहिला व्यक्ती होता ज्याने बिना तेलाच्या परफ्यूम चा शोध लावला आणि तो बनवण्याची प्रक्रिया शोधली. सन १९९० पॅरिस (फ्रांस) येथून व्याहारिक रित्या परफ्यूम चे उत्पादन सुरू झाले. येथूनच आधुनिक परफ्यूम ची सुरुवात झाली असं म्हणतात.

१६ व्या शतकामध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम कस्तुरी आणि गुलाबाच पाणी यापासून बनवलेले परफ्यूम वापरत होती. तसेच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट सुगंधासाठी महिन्यात परफ्यूम च्या ५० बोटल विकत घेत होता.

फारस मधून भारतात आला परफ्यूम.

फारस ,मध्य पुर्व, भारत यांसारख्या प्राचीन समृध्द संस्कृती मध्ये परफ्यूम चा इतिहास मानव सभ्यतेएवढाच जुना आहे.
परफ्यूम एक फ्रेंच शब्द आहे. ज्याचा अर्थ खुशबुदार तेल असा होतो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये परफ्यूम भिनलेला आहे. जुन्या काळापासून भारतातील शाही परिवारातील लोक परफ्यूम चा वापर करतात.

परफ्युम

निजामांच शहर हैदराबाद सुद्धा खुशबुदार परफ्यूम साठी प्रसिध्द आहे.वेळेसोबत येथील परफ्यूम थोडे कमी झाले पण आजही जुन्या हैदराबाद मध्ये मोठ्या प्रमाणात परफ्यूम आढळतो. अस म्हणतात की परफ्यूम जर आपण अंगाला लावले तर त्याचा काही परिणाम होत नाही.

जगात अशी पसरली परफ्यूम ची खुशबू.

मिस्र आणि अरबी नंतर ग्रीक , रोमन लोकांनी परफ्यूम चा वापर सुरू केला. प्राचिन ग्रीक आणि रोमन लोकांनी परफ्यूम बनवण्याची प्रक्रिया पुस्तकात लिहून ठेवली आहे. तसेच पोम्पोई मधील परफ्यूम बनवणाऱ्या माणसाच्या घरातील चित्र ग्रीक रोमन परफ्यूम बनवण्याची पद्धत सांगतात.

प्राचीन ग्रीक रोमन मध्ये परफ्यूम चा उपयोग पुजा पाठ मध्ये करत.

एका अनुमानानुसार ईस १००मध्ये रोमन खुशबू साठी दरवर्षी २८०० टन लोबान वापरत होता.त्यापासून मिळणाऱ्या सेंटचा उपयोग सौंदर्य उत्पादन, स्नानगृह, पायाचे तलाव यासाठी केला जाई. यानंतर त्यांनी विविध प्रकारचे परफ्यूम बनवले.येथूनच ते सर्व विश्वामध्ये प्रसारीत झाले.

====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here