आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

पोलिसांच्या शिट्टीमुळे होणारा संसर्गजन्य धोका कमी करण्याच्या उद्देशाने एका सहा वर्षीय मुलीने शिट्टीसाठी सुरक्षा कवच तयार केलं आहे. कोरोना विरूध्दच्या लढाईत फ्रंट लाईनवर असणार्‍या पोलिसांसाठी अगदी उपयुक्त असा शोध लावणार्‍या त्या चिमुरडीचे नाव आहे गीता गणपत धनवडे.

गीताने केलेल्या या संशोधनाची केंद्रसरकारने दखल घेतली असून तिच्या या या शीट्टींवरील प्रोजेक्टचे इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

गीता

 

new google

अकरा वर्षीय गीता ही मुळची शहरापासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी या गावची रहिवासी. सध्या ती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, पुणे या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत आहे.

तिचे संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थायिक आहेत. तिच्या या प्रयोगाला प्रोत्साहन देणारे तिचे वडील गणपत मारुती धनवडे हे विभाग प्रमुख म्हणून कॅम-अविडा एन्व्हायरो इंजिनियर्स, पुणे येथे नोकरीस आहेत.

गीता ही आळंदी येथे असणार्‍या तिच्या पोलीस काकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ती गेली होती. त्यावेळी तिच्या काकांच्या ड्रेसला लावलेली शिट्टी घेऊन गीताची बहीण खेळत होती. तिला कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने तिच्या काकांनी शिट्टी वाजवण्यास मनाई केली. शिट्टीमुळे कोरोनाचा संसर्ग कसा होतो? यावर गीता विचार करू लागली आणि त्यासंबंधी आपल्याला काही करता येईल का? असा विचार तिच्या मनात घोळत होता.

 

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी माणसाला जशी मास्कची गरज आहे तसे सुरक्षा कवच या शिट्टीला तयार करण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. या प्रयत्नात तिला यश आले. यावर पोलीस व्हिसल विथ सेफ्टी एन्क्लोजर प्रोटेक्शन फ्रॉम कोव्हिड व्हायरस असा प्रोजेक्ट तयार केला.

(Police whistle with safety enclosure protection from COVID 19 Virus) या प्रोजेक्टसाठी तिला शाळेतील शिक्षिका मंजिरी पाटील, रसिका लिमये यांनी मार्गदर्शन केलं. याच प्रोजेक्टची विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून हे विज्ञान प्रदर्शन मार्च महिन्यात होणार आहे.

 

गीता

एक स्टील डबी, हूक, शिट्टी आणि शिट्टी बांधायची दोरी एवढंच तिचं साहित्य. डबीच्या झाकणाला तिने एक भोक पाडलं. यात शिट्टीचा समोरचा भाग घट्ट बसवला. नंतर व्हायरस प्रोटेक्शन बॉक्सला म्हणजेच डबीला तिने पोलिसांच्या शर्टला अडकवली जाणारी दोरी बांधून टाकली.

आणि तयार झाली व्हायरस प्रोटेक्शन व्हिसल. आता पोलिसांना शिट्टी वाजवायची तर शिट्टीचं केवळ हूक पकडावं लागेल. पूर्ण शिट्टी हाताळावी लागणार नाही आणि शिट्टीला कसलाही हात लागायची शक्यताही नाही.

दहा हजार रुपयांची मिळाली शिष्यवृत्ती

गीताने केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला हा प्रोजेक्ट ऑनलाईन सादर केला. तिच्या या प्रोजेक्टसाठी शासनाकडून दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देखील तिच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. ही जमा झालेली शिष्यवृत्ती या संशोधनावर खर्च करणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

तिच्या या अनोख्या संशोधनाबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिचे कौतुक केलं आहे. तसेच उळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने देखील तिचा भव्य सत्कार करण्यात आला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here