आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ब्रेटलीच्या ज्या चेंडूवर द्रविडला डिफेन्स करावा लागत असे ,त्या चेंडूवर वीरेंद्र सहवाग षटकार ठोकत असे…!


तकनिक आणि परंपरा यापेक्षा सहवागचा खेळ समोरुन येणाऱ्या बॉलवर सहज प्रतिक्रिया देण्यावर चालत असे.
ऑगष्ट २००१ ची गोष्ट आहे . श्रिलंकामध्ये होणाऱ्या तिनं देशांच्या एकदिवसीय सिरीज मध्ये भारताचा न्यूझिलंड सोबत महत्त्वाचा सामना होता. जिंकणारी टिम फायनल मध्ये पोहोचणार होती. परंतु ऐन वेळी सलामीचा फलंदाज सचिन तेंडुलकर च्या पायाला लागलेल्या जखमेने चिंता वाढवली.

यामध्ये कोच जॉन राइट आणि कप्तान सौरभ गांगुलीने एक डाव  खेळला. त्यांनी नविन फलंदाज ओपनिंग ला घेण्याच ठरवलं. या खेळाडुने तोपर्यंत १५ वनडे सामन्यात १५ च्या सरासरी ने १६९ धावा केल्या होत्या.

सहवाग

new google

न्युझिलंड च्या २६४ लक्षाचा पाठलाग करायला भारताने खेळायला सुरुवात केली. पारीच्या पहिल्याच बॉलवर या खेळाडूंन चौकार मारला. त्यानंतर तर बाउंड्रींचा पाऊसच पडला. लवकरच हा खेळाडू आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आणि पाहता पाहता त्याने आपले शतक पुर्ण केले. ६९ चेंडू आणि १९ चौके आणि १ छक्का लगावून खेळलेल्या विस्फोटक खेळीच्या बळावर भारत ७ विकेट्सनी सामना जिंकला. या मॅचमध्ये फक्त २२ वर्षिय सेहवागने टिम मध्ये फक्त जागाच पक्की झाली नाही तर क्रिकेटला धर्म मानणारा खेळाडुही टिमला भेटला.

याच सहवागने आपल्या जन्मदिवशी १५ आॉक्टोंबर २०१५ साली क्रिकेट मधून संन्यास घेतला तेंव्हा खूप लोकांसाठी हि गोष्ट दुःख द होती. हैराणी कमी होती कारण सेहवाग खुप वर्षांपासून क्रिकेटपासुन दूर होते .

सहवागचा भर सहज खेळण्यावर जास्त होता यामुळे त्यांचा करियर ग्राफ लवकर वाढला आणि कमी सुध्दा झाला. आपल्या जवळपास दीड शतक लांब आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये सहवागने १०४ टेस्ट मध्ये २३ शतकांच्या सहाय्याने ८५८६ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या दोन त्रिशतकांचाही समावेश आहे. सन २००८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडु मध्ये त्रिशतक ठोकले. सहवागने २५१ वनडेमध्ये १५ शतकांच्या सहाय्याने ८२७३ धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये एक द्विशतक त्यांच्या नावे आहे.

तकनिक आणि परंपरेपेक्षा सहवागचा खेळ जास्त शरिराराच्या सहजतेवर चालत असे . डोळे आणि हाथ यांमधील ताळमेळ ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये हैंड आय कोऑर्डिनेशन म्हणतात . हीच खुबी त्यांना अग्रस्थानी घेऊन गेली आणि यामुळे च त्यांचा करियर ग्राफ लवकर खाली आला. वय वाढल्या मुळे आणि नजर कमी झाल्यामुळे त्यांचा ताळमेळ बिघडला आणि त्यांचे प्रदर्शन खराब होऊ लागले. दोन वर्षांपूर्वी सहवाग टीम मधून बाहेर पडले ते टिम मध्ये परत आले नाही. नाहीतर तर क्रिकेटच्या दिग्गजांच्या मते सेहवागने त्यांच्या प्रतिभेनुसार आणखी रेकॉर्ड बनवले असते.

सहवाग

सहवागने रेकॉर्ड ची पर्वा केली असती तर ते सहवाग झाले नसते.सहवाग म्हणत होते कि बैंटिंग बाबत ते जास्त विचार करत नव्हते. त्यांची खुप खेळी यांचे उदाहरण आहे. याचंच उदाहरण म्हणजे २००४ मध्ये पाकिस्तानाच्या मुल्तानमध्ये टेस्ट मैचमध्ये सहवाग गोलंदाजांची धुलाई करतो होता . दुसऱ्या बाजूला असणारा सचिन तेंडुलकर त्याला समजावून सांगत होता की त्रिशतकाच्या जवळ आहेस सांभाळून खेळ पण तरिही सेहवागने २९४ वर असताना छक्का मारुन आपले शतक पुर्ण केले. क्रिकेट च्या पंडितांच्या मते असे फक्त सहवागच करु शकत होता.

एकवेळ असा कोणी विचार करु शकत नव्हते कि, या महान खेळाडूला मैदानाच्या बाहेरच सन्यास घ्यावा लागेल.

हिच गोष्ट सेहवागला सर डॉन ब्रॅडमन च्या जवळ नेऊन ठेवते. याच मुळे सहवाग आणि डॉन ब्रॅडमन यांनी २९० चा आकडा तिनं वेळेस ओलांडला . करियरच्या सुरुवातीला सहवागला दुसरा सचिन तेंडुलकर म्हणत होते. दुरून बघितल्या वर दोघांचीही शरिरयष्टी सारखीच दिसत होती आणि दोघांचीही बैंटिग शैली सारखीच होती.

करियरच्या शेवटच्या वर्षात सचिनने स्वताची शैली बदलली . पहिल्या सारखी फलंदाजीमधील आक्रमकता त्यात राहिली नाही. सचिन चाहत्यांना असं वाटायचं कि सचिनने सेहवाग सारखी फलंदाजी करावी. सेहवाग साठी हि उपलब्दी होती. स्वता सचिनलाही सहवागची फलंदाजी बघुन आनंद होत असे. खुप वेळेस सचिनने हि गोष्ट सांगितली होती.

सहवाग नेहमी हमलावर अंदाजामध्ये बैंटिंग करत असे . ब्रेटलीच्या ज्या बाउंसरला द्रविड आडवत असे त्याच बॉलवर सहवाग बांउंड्री काढत असे . टेस्ट मैचमध्ये सहवागचा औसत सुनील गावस्कर पेक्षा जास्त होता . सहवागने जेवढे शतक लावले त्यामध्ये ७५ टक्के शतकांमध्ये १५० पेक्षा जास्त रन होते. एकप्रकारे पाहिलं तर सहवागचा खेळण्याचा अंदाज बेफिकीर होता नाहीतर यांमधील बरेचसे शतक द्विशतक राहिले असते .

बैटिंग साठी टिप्स मागणाऱ्यांना सहवागचे एकच सांगणे होते विकेट वर येणारा चे़डु आडवा बाकी सगळे ठोका. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये सहवागने शतक ठोकले होते. टेस्टमध्ये गोलंदाजांच हथियार असणाऱ्या नविन चेंडुची सहवाग धुलाई करीत असे. याच गोष्टी मुळे अभिनेता रितेश देशमुख ची सहवागच्या सन्यासानंतर प्रतिक्रिया होती ” मि फलंदाजांना बॉलला घाबरताना पाहिलं आहे पण बॉल फक्त सहवागलाच घाबरत असे “.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

व्हिडीओ प्लेलीस्ट :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here