आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कोहिनूरच्या नादी लागून या राज्याना त्यांच्या सत्तेसोबत आपला जीवही गमवावा लागला होता!


कोहिनूर ची गोष्ट एखाद्या जादूच्या चिराग सारखी आहे. हा आपल्यामध्ये खुप साऱ्या गोष्टी लपवून वर्षांनुवर्षे चर्चेत आहे. अस मानल्या जाते इतिहासामध्ये ज्याने कोहिनूर ला आपले बनवले तो जास्त दिवस सुखी नाही राहू शकला.एवढच नाही तर कोहिनूर कित्येक साम्राज्यांच्या उदयाचा आणि मातीत मिसळण्याचा साक्षिदार आहे.

तर चला मग बघुया कोहिनूर बाबत प्रचलीत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल.कोहिनूर

कोहिनूर चा ऐतिहासिक प्रवास …

 

new google

अस मानल जात हा हिरा पहिल्यांदा काकतिय वंशच्या शासनमध्ये समोर आला.जिथुन इस सन १३२३ मध्ये तुर्की शासक ग्यासुद्दीन शाह याने तो काकतिय राजा प्रतापरुद्र याला हरवून दिल्लीला नेला. तसेच एक किवंदंती च्या अनुसार सन १२९४ साली हा हिरा ग्वालियर च्या राजाकडे होता.

बाबरनामा मध्ये बाबरने लिहीलं आहे पानिपत मध्ये इब्राहिम लोदीला हरवून सगळा शाही खजाना हुमायूने लुटला. तिथेच हुमायूला ग्वालेरच्या राजाने त्याला खूप मोठा हिरा दिला.तसेच हे सांगणं कठीण आहे कि मुघलांपाशी हा हिरा कुठून आला .परंतु धारणांनुसार सन १६२८ मध्ये मुघल बादशहा शहाजहान ने शानदार रत्नजडित सिंहासन बनवले.

त्याला मयुर सिंहासन असे नाव देण्यात आले. अस म्हणतात की यामध्ये कोहिनूर हिरा लावण्यात आला होता. या सिंहासनाच्या निर्माणानंतर जवळपास एक शतकापर्यंत मुघलांनी या हिऱ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवले.
दुसरीकडे मयुर सिंहासनाच्या चमकतेने विदेशातील राजघराण्यांना आकर्षित केले होते. ते त्याला मिळवु इच्छित होते . त्यांनी लुटीच्या ईराद्याने एक एक करुन भारतावर आक्रमण केले.

नादिरशाहाचे आक्रमण आणि ….

यामध्येच इराण चा शाह नादिरशाहायाने आक्रमण करून कोहिनूर इराणला नेऊन याला ‘ कोह-इ-नूर ‘ असे नाव दिले. हा एक फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे चमकणारा पर्वत असा आहे. त्यानंतर नादिरशाहाची हत्या करण्यात आली आणि अफगाणिस्तान चा बादशाहा अहमद शाह दुर्रानी कोहिनूरला अफगाणिस्तान मध्ये घेऊन गेला.

अहमद शाह चर्या मृत्यूनंतर हिरा त्याचा मुलगा शाह शुजा दुर्रानी कडे राहिला. जेंव्हा त्याला पदच्युत करण्यात आले तेंव्हा त्यांने तो हिरा सोबत घेऊन पंजाबचा राजा रणजित सिंह यांना दिला. त्याबदल्यात त्यांनी त्याला पुन्हा अफगाणिस्तान चा शासक बनवले.

पुढे रणजितसिंहांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी हा हिरा ओडिसाच्या पुरी मंदीराला देण्याच सांगितले होते पण ब्रितानी शासकांनी त्याची  इच्छा पूर्ण केली नाही.  पुढे समिकरण असे काही बनले कि १८४८ मध्ये नाबालिक शासक दिलीपसिंहाच्या मृत्यूनंतर नाबालिक शासक दिलीप सिंहांनी हा हिरा ईस्ट इंडिया कंपनीला दिला.

कोहिनूर

सन १८५० मध्ये भारताचा गर्वनर लॉर्ड डलहौसीने हा हिरा इंग्लंडची महाराणी विक्टोरियाला दिला . तेंव्हा पासून हा हिरा इंग्लडच्या राजघराण्याची शान आहे .

ब्रिटीश राजघराण्याची बनला शान.

१८५० साली हा हिरा इंग्लंडची महाराणी विक्टोरियाला मिळाला. १८५२ मध्ये तिने तो आपल्या मुकुटामध्ये लावाला. तिने वसियतमध्ये लिहून ठेवले आहे हा हिरा फक्त महिलाच लाउ शकते, षुरुष राजा झाला तरी तो वापरु शकत नाही.

कोहिनूर हिरा लंडन मधील टेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या लंडन टावर म्युझियम मध्ये सुरक्षित आहे.येथे शाही दागिने सुध्दा ठेवले आहेत.कोहिनूर लावलेला हिरा १९३७ मध्ये राजा जॉर्ज पंचम याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी राणि एलिझाबेथ ने आपल्या मुकुटात लावला होता.सन २००२ साली एलिझाबेथ च्या मृत्यूनंतर तिच्या ताबूत मध्ये लावला होता.

भारतीय कनेक्शन .

कोहिनूर फक्त १०५ कैरेटचा दगड नसून तो भारताची संस्कृती आणि इतिहास याचा अभिन्न भाग आहे. कधी राजेशाही च प्रतिक असणारा हा हिरा खुप काळ इतिहासामध्ये दडलेला होता. नंतर हा गोवळकुंडा च्या खाणितून बाहेर आला आणि सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनला .

ज्यांच्या चवळ कोहिनूर गेला त्यांचे ….

हा शापित हिरा आहे हा जिथे गेला तिथे याने कितीतरी साम्राज्य बर्बाद केली. ज्या कोणाजवळ हा राहिला त्याचे जिवन बर्बाद झाले.

१४ वर्मा शतकामध्ये कोहिनूर ची सुरक्षा करणारा काकतिय वंश १७ वर्षात उधवस्त झाला. सन १३२३ मध्ये झालेल्या लढाईत मोहंमद बिन तुघलक याने काकतिय राजाला हरवुन हा हिरा नेला. नंतर त्याचेही पतन झाले. मुघल बादशहा बाबरच्या नंतर हा हिरा हुमायू जवळ राहिला ज्याला शेरशाहा सुरीने हारवल आणि हिरा घेतला. हळुहळु त्याचाही विनाश झाला.

कोहिनूर

शाहाजहानने मयुर सिंहासनावर लावल्यानंतर मुघल सल्तनतीचाही विनाश होत गेला . येथून नादीरशाहा , अफगाणिस्तान नंतर राजा जगजितसिंह आणि शेवटी इंग्लंडला हा हिरा पोहोचला. जेंव्हा पासुन हा हिरा इंग्लंडच्या राजघराण्यात गेला तेंव्हापासून त्याचाही विनाश सुरू झाला.

कोहिनूर एक दावेदार अनेक

भारतीय लोकांना वाटते कोहिनूर भारतात आणल्या जावा. तसेच पाकिस्तान आणि इराण सुध्दा या हिऱ्यावर दावा करतात. सन २०१५ मध्ये भारतीय वंशाचे ब्रिटीश सांसद किथ वाज यांनी कोहिनूर भारताला परत द्यावा अशी मागणी केली होती. परंतु भारताच्या नरेंद्र मोदी सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही.

पाकिस्तान चे म्हणणे आहे कि दिलीप सिंहाने जेंव्हा हा हिरा इंग्लंडला दिला तेंव्हा ते पाकिस्तानच्या पंजाब राज्याचे राजे होते त्यामुळे हा हिरा पाकिस्तानचा आहे. सगळे होउन आजही हिऱ्याची चमक पहिल्या सारखीच आहे आणि त्याला आपल बनवण्याची स्पर्धाही तशीच सुरू आहे. अजुनही हिऱ्याला आपल बनवण्यासाठी अनेक लोकं आपला जीव धोक्यात घालण्यास तयार आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here