आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आज आपण पाहणार आहोत रेणुका अराध्य यांच्या यशस्वी गोष्टीबद्दल जे पहिले घर घर जाऊन भिक मागत होते ते आज आहेत करोडपती. रेणुका अराध्य यांचा जन्म मैंगलोरच्या जवळ अनेकाल ताल्लुकच्या गोपासचंद्र गावात झाला. त्यांचे वडिल राज्य सरकार द्वारा गठित एका स्थानिक मंदीराचे पुजारी होते जे परिवाराच्या पालनपोषणासाठी मंदीरातुन मिळणाऱ्या पैशावर अबलंबुन होते.

परंतु या तुटपुंज्या पैशावर परिवाराचे पालनपोषण होत नसे म्हणुन रेणुका अरध्य आसपासच्या गावांमध्ये जाऊन धान्य मागत असत आणि ते बाजारात नेऊन विकत असत.

रेणुका अराध्य


काही वेळेनंतर जेंव्हा रेणुका अरध्य ६ व्या इयत्तेत गेले तेंव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एका चर्मरोग्याच्या घरी कामाला लावले तिथे तो त्याचे प्रत्येक गोष्टिचे ध्यान ठेवत असे आणि पुजारी परिवारातुन येत असल्यामुळे त्याच्या घरी पुजापाठ करत असे.

तिथे त्यांनी एक वर्ष काम केले नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना चिपकेट येथील आश्रमात टाकले जिथे त्यांना संस्कृत आणि वेदांचे शिक्षण घ्यावे लागे आणि पोटभर जेवणही मिळत नसे. शेवटी त्यांनी पोटभर जेवणासाठी आपल्याहून मोठ्या मुलांसोबत नामकरण, विवाह आणि बाकी कार्यक्रम यामध्ये कार्य करण्याचे ठरवले पण यामध्ये त्यांना त्या मुलांची मनमानी सहन करावी लागत असे आणि त्यांचे कामही करावे लागत.

यामुळे त्याच्या जेवणाचीतर सोय झाली पण अभ्यासावर परिणाम होऊन ते दहावीच्या परिक्षेत नापास झाले.
रेणुका अराध्य यांच्या जिवनात संघर्ष तेंव्हा अजुन वाढला जेंव्हा त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले.मोठ्या भावाने घर सोडल्या कारणाने आई आणि बहिणीची जिम्मेदारी त्यांच्यावर आली. मग काय त्यांनी शिक्षण सोडले आणि सुरु केली जिवन जगण्याची लढाई.

सगळ्यात पहिल्यांदा एका छोट्याशा कंपनीत हेल्पर म्हणुन काम केले , त्यानंतर प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीत काम केले.नंतर बर्फ बनवणाऱ्या कंपनीत काम केले.नंतर श्याम सुंदर कंपनीत मजदूर म्हणुन काम केले आणि त्याच कंपनीत पुढे सेल्स मन म्हणून काम केले.

यानंतर ६०० रुपये महिण्याने सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले आणि विवाह केला. उत्पन्न वाढविण्यासाठी सोबतच प्रति झाड १५ रुपये नारळ तोडण्याचे काम केले.

रेणुका अराध्य यांचे जिवन तेंव्हा बदलले जेंव्हा त्यांनी ड्रायवर बनण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी लग्नाचे दागिने विकुन ड्रायवरचे लायसन काढले.परंतु त्यांचे खराब नशीब नौकरी लागल्यावर काही दिवसांतच एक्सिडेंट झाल्यामुळे ती पण गमावली. नंतर काही दिवसांनी एका व्यक्तीने ट्रावल एजंसी मध्ये बिना पगारावर काम दिले तिथे त्यांनी मन लाऊन काम केले.

हळुहळु त्यांची सेवा बघुन यात्री ही खुश राहायला लागले आणि ड्रायवर म्हणुन त्यांची मागणी वाढायला लागली. यानंतर त्यांना ते एका दवाखान्यात काम मिळाले जिथे मृत शरीर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे होते.येथे त्यांनी चार वर्षे काम केले.नंतर त्यांनी एका विदेशी ट्रावल कंपनीत काम केले जिथे त्यांना परदेशी यात्रींपासुन टिप मध्ये डॉलर मिळत असत‌.

असेच पैसे गोळा करून आणि पत्नीच्या जमा पैशातुन २००१ साली त्यांनी सिटी सफारी नावाची कंपनी सुरु केली तिथे तेच मॅनेजर बनले. यानंतर बॅंकेतून लोन घेऊन दोन कार घेतल्या. यांच्या मदतीने दोन वर्ष ‘ स्पॉट सिटी स्पॉट ‘ मध्ये काम केले. आणि वर्षे २०१६ पर्यंत स्वताची पाच कार घेतली.

रेणुका अराध्य यांना जिवनात एवढं करुनही समाधान मिळाले नाही म्हणून त्यांनी २००६ मध्ये ‘ इंडियन सिटी टॅक्सी ‘ विकत घेतली आणि तिचे नाव ‘ प्रवासी कैब्स प्राइवेट लिमीटेड ‘ अशे ठेवले पण यासाठी त्यांना आपल्या सगळ्या कार विकाव्या लागल्या आणि मार्केटमधून काही पैसे उसने घ्यावे लागले.

हा निर्णय चांगला ठरला आणि त्यांनी कॉर्पोरेट मध्ये स्वताच्या सेवा द्यायला सुरुवात केली. त्यांची पहीली कंपनी होती Amazon India, वालमार्ट, अकामाई, जनरल मोटर्स, यासारखी कंपनी त्यांच्या ‘ इंडियन सिटी टॅक्सी ‘ कंपनीच्या सेवा द्यायला लागलेल्या.


आज त्यांच्या कंपनीची १००० पेक्षा जास्त कार आहेत आणि देशाच्या खुप भागांमध्ये त्यांची कंपनी  आहे.आणि सोबतच ३ स्टर्टअप चे डायरेक्टर पण आहेत.

तर पाहिले आपण कसे रेणुका अराध्य यांनी जिवनात कठोर मेहनत करून यशाला गवसणी घातली. आपणही यांच्यासारखी मेहनत करुन यशस्वी होउ शकतो. गरज आहे ती मजबुत इरादे घेउन पहाडासारख ठाम राहण्याची.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here