आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

लहानपणी झाला होता पोलिओ: दिव्यांगावर केली यशस्वीपणे मात

सोलापूर – काही लोक शरीराने धडधाकट असून देखील प्रत्येक गोष्टीत नशिबाच्या नावाने बोटे मोडतात. पण जगात अशी काही माणसं आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये अपंगत्व येऊन देखील त्याचा बाऊ न करता अशक्य गोष्टी शक्य करून दाखवत इतरांपुढे एक मिसाल बनतात.

आज आपण अशाच एका झुंजार व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत जे जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. संजय नामदेव कोंढारे असं यांचे नाव आहे. एक दिव्यांग व्यक्ती ते अधिकारी असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

अधिकारी

new google

संजय यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने दिव्यांगत्व आ. घरची परिस्थिती बेताची, आईवडिलांचा आधार घेत शिक्षण पूर्ण केले. दोन्ही पाय नसतानाही खचून न जाता स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहिले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण पोलिस मुख्यालयात लिपिक पदी निवड झाली. पण लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न तडीस नेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर दिव्यांगावर मात करून क्लास टू अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

संजय मुळचे चिखर्डे, तालुका बार्शीचे रहिवासी. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा सामना करत बी.पी. सुलाखे महाविद्यालयातून २००९ साली बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शंकरराव निंबाळकर महाविद्यालयातून डी.एड.ची पदवी पूर्ण केली. काही दिवस नोकरीसाठी शोधाशोध केली. हाती काही लागत नव्हतं म्हणून चिखर्डेत खाजगी कॉम्प्युटरचा क्लास सुरू केला. गावातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेत स्वतःच्या पायावर उभे राहिले. यातून त्यांचा अर्थार्जन होत होता.

 

याच दरम्यान २०११ साली सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात अपंगांसाठी कनिष्ठ लिपिक पदासाठी २ जागेसाठी जाहिरात आली. सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे संजय यांनी या परीक्षेत यश मिळवले आणि ते पोलिस खात्यात कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झाले. पण बालपणीच अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी बांधलं होतं. त्यामुळे त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पुढे त्यानी अभ्यास सुरू ठेवला. पोलिस खात्याअंतर्गत परीक्षा देण्यास सुरुवात केलीअधिकारी

 

२०१५ साली  स्थानिक निधी लेखापरीक्षा परीक्षेत पास झाले. त्यामुळे महाराष्ट्र सहाय्यक लेखा अधिकारी परीक्षा गट ब या परीक्षेत पात्र झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ साली महाराष्ट्र सहाय्यक लेखा अधिकारी परीक्षा गट ब ची जाहिरात प्रसिद्ध केली. यात संपूर्ण महाराष्ट्रातून ५२ विद्यार्थी पात्र ठरले. त्यात संजय कोढांरी यांचेही नाव होते. आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता संघर्षांची वाटचाल सुरू ठेवत जगण्याची दुर्दम्य प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या संजय यांची कहाणी अनेकांना प्रेरणादायीआहे.

सर्वांच्या सहकार्यामुळेच यशस्वी बनलो

लहानपणापासून माझे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. माझ्या यशात मित्रांचा आणि आई वडिलांचा लाख मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मी ही गरुड झेप घेऊ शकलो. पोलीस मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मला मार्गदर्शन आणि सहकार्य केले. त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. नुकतेच मी जिल्हा कोषागार कार्यालय सोलापूर, उप कोषागार अधिकारी म्हणून रुजू झालो आहे.  असं संजय कोढांरी सांगतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here