आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आज आपण सुरेश चिन्नासामी यांच्या यशाबद्दल जाणुन घेणार आहोत. कसे त्यांनी पराठा विकुन १८ करोड कमावले.

आपल्या वडिलांच्या गाडयावर काम करणाऱ्या मुलाला बालपणी शाळेतील मुलांच्या हेंडसाळीस सामोर जाव लागे, पण त्याने आपले जीवन बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज ते एका रेस्टॉरंट चैंनचा मालक आहे ज्याचा दोन वर्षाचा टर्न ओवर १८ करोड रुपये आहे.

सुरेशचे वय आज ३७ वर्षे आहे आजही त्याच्यात सकारात्मक उर्जा भरपुर आहे.

पराठा

new google

लहाणपणच्या दिवसांची आठवण काढताना  ” चे संस्थापक सुरेश म्हणतात “माझ्या वडिलांनी सन १९७९ मध्ये बसंतनगरमध्ये एका छोट्या गाड्यापासून खाण्याची दुकान सुरू केली. त्यानंतर त्यांनी मरिन बिचवर गाडा लावायला सुरुवात केली. सन १९८७ मध्ये अड्यार मध्ये एक छोटीशी जागा किरायाने घेउन मटन चिकन ग्रेवी सोबत लंच विकायला सुरुवात केली.”

अडयार मध्ये मजदूर काम करणारे खूप सारे लोक तिथे येत असत त्यामुळे त्यांचे काम वाढु लागले. सरेश सांगतात जेव्हाते १२ वर्षाचे होते तेंव्हापासून वडिलांची मदत करतात.ते आणि त्यांचे तीन वर्षांचे मोठे भाऊ जेवण आणि भांडी धुण्याचे काम करत. त्या दिवसांमध्ये सुरेश ऑलकॉट मेमोरियल शाळेमध्ये शिकत होते, जिथे त्यांना मोफत शिक्षण आणि दुपारचे जेवण मीळत होते.

जेंव्हा परिवार अजुन एक दुकान उघडण्यासाठी डिंडीगुल येथे स्थानांनतरित झाला तेंव्हा त्यांचे वय १३ वर्षे होते आणि त्यांनी शाळेत जाणे बंद केले होते. त्यांचे वडिल पेरियाकोट्टिई गावामध्ये शेती करु लागले आणि सोबतच त्यांनी जवळच नगर पलानी मध्ये एक लहानशी दुकान खोलली.

सुरेश आपल्या वडिलांसोबत दुकानात जात असे तर मोठा भाऊ शेतीची देखभाल करुन शाळेत जात असे. परंतु शेतीमधुन जास्त आमदानी होत नसल्यामुळे दोन वर्षांनी त्यांनी चेन्नई ला वापस जाण्याचे ठरवले.

चेन्नई मध्ये त्यांनी ईस्ट कोस्ट रोडवरील श्रिनिवासापुरम येथे जागा किरायाने घेतली आणि जेवणाचा व्यवसाय सुरू केला.
जेंव्हा सुरेशने वडिलांच्या दुकानापासुन १०० मिटर पुढं इडली डोसाचा गाडा लावण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याचे वय फक्त १५ वर्षे होते.

सुरेश सांगतात लवकरच त्यांच्या गाड्यावरिल विक्री हि वडिलांच्या विक्री पेक्षा जास्त होऊ लागली. ते जर दिवसाला २०० रुपये कमावत असतील तर तो दिवसाला २५० कमावत असे. मि लोकांना दिवसाचे जेवणही द्यायला लागलो आणि आम्ही अजुन एक गाडा लावला. माझी आई त्या गाड्या वर लक्ष ठेवत असे आणि पहिल्यांदाच कामाला माणुस ठेवायला सुरुवात केली.

एक दिवस त्याच्या दुकानात एक वृध्द ग्राहक आला आणि त्याने सुरेशला १० ची परिक्षा बाहेरून देण्याचा सल्ला दिला आणि याच सल्ल्याने सुरेश चे जिवन बदलले.

काम करून परतल्याच्या नंतर रात्री सुरेश ११ ते १ अभ्यास करत असे. त्यांनी ३७ टक्के गुण घेऊन परिक्षा पास केली आणि बसंतनगरमधील अरिग्नार अन्न गवर्नमेंट स्कुल मध्ये हायर सेकंडरीला प्रवेश घेतला जिथे ते १२ वी पर्यंत शिकले.
शाळा संपल्याच्या नंतर आपल्या गाड्यावर काम करणारे सुरेश सांगतात, सोबती त्यांना पराठा विकणारा म्हणत पण या गोष्टी चे त्यांना कधी वाईट नाही वाटले. उलट यामधुन त्यांना प्रेरणा मिळाली आणि परिवाराच्या मदतीसाठी काम केले.

१२ वी पास केल्याच्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये बिए कॉर्पोरेट सेक्रेटरी शीप इनविंग कोर्स ज्वाइन केला. पुढल्या वर्षी मद्रास इंस्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा साठी प्रवेश घेतला.

सुरेश सांगतात त्या वेळी ते व्यवसाय मधुन ठिकठाक पैसे कमावत होते पण पुढच्या स्तरासाठी शिक्षण महत्त्वाचे होते.
मि सकाळ पासून दुपारी ३ पर्यंत कैटरिंग ची क्लास करत होतो. त्यानंतर हॉटेल सवेराच्या किचनमधे काम करत होतो.
२००१ साली सुरेशने क्रुज शिपमध्ये कुक म्हणुन काम करण्याचे ठरवले. आणि चेन्नई मधील इंडस हॉस्पिटैलिटी करियर्स आणि ट्रेनिंग मध्ये एक महिण्याचा कोर्स केला .

पुढच्या वर्षी त्यांनी मुंबई मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रुजशिप पैकी एक कर्निवाल क्रुज लाइनमध्ये नोकरी मिळवली. जेंव्हा त्यांना त्यांचे कसब दाखवण्यासाठी मियामी जाव लागलं तेंव्हा त्यांच्या परिवाराने एक लाख रुपये गोळा केले. या वेळेपर्यंत परिवारावर ३ लाख रुपयांचे कर्ज झाले होते पण सुरेशने काही वेळेतच हे कर्ज फेडले.

पराठा

ते सांगतात त्यांनी जहाजावर ५०० अमेरिकी डॉलर वर कुक ची नौकरी केली. सोबत च हाउसकिपींग मध्ये ओवरटाइम काम केले ज्याचे त्यांना ६०० डॉलर वेगळे मिळायचे.मि रूम, टॉयलेट आणि अंथरुण साफ करत असे. अशातच वडापालनीमध्ये आउटलेट सुरू करणारे सुरेश सांगतात , दरवर्षी माझे प्रमोशन होते आणि नोकरी सोडण्याच्या वेळी पाच वर्षांनंतर माझी पगार २००० डॉलर झाली होती.

२०१३ पर्यंत कार्लटन मध्ये काम केले.यावेळी त्यांची महिण्याची कमाई चार ते पाच लाख रुपये होती.
सुरेश ने २००८ मध्ये दिव्या सोबत लग्नकेले आणि त्यांच्याच जहाजामध्ये तिला नौकरी लावली.

ते आणि दिव्या २०१३ मध्ये चेन्नईत वापस आले तोपर्यंत त्यांनी बरेचशे पैसे कमावले होते.चेन्नइमध्ये त्या दोघांनी रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम केले. २०१६ साली त्यांनी १.८ करोड घालून पैरंबूरच्या स्पेक्ट्रम मॉलमध्ये १०००० वर्ग फुट जागेवर स्वताचरेस्टॉरंट टाकले.

या रेस्टॉरंटच्या यशानंतर पुढच्या काही महिण्यांमध्ये त्याने अजुन पाच रेस्तराँ उघडले‌. ते सांगतात २०१९-२०२० साली त्यांचा टर्नोवर १८ करोड रुपये राहिला. त्यांचे हॉटेल फायद्यामध्ये चालत आहेत. सुरेश ने त्यांची कंपनी रजिस्टर केली आहे आणि त्यांच्या कंपनीत ४०० कर्मचारी आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here