आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आदर्श गाव: २० वर्षापासून दारुबंदी असलेलं कर्देहळ्ळी गाव तरुणाईच्या प्रयत्नाला आले यश ग्रामसुरक्षा दारूबंदीसाठी बजावली लाखमोलाची भूमिका.

 

दारू पिण्याने अनेकांची घरे अन् प्रपंचाची राखरांगोळी झाली. याविरोधात आवाज उठवण्याची गरज तरुणाईला वाटू लागली. सर्वनाश करणारी ही दारू आपल्या गावातून हद्दपार झाली पाहिजे. या विचारातून कर्देहळ्ळी गावातील तरुणांनी अॅड. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २००१ मध्ये एकत्र येऊन दारूबंदीच्या कार्याला सुरुवात केली. त्यांच्या या मोहिमेला यश देखील लाभले. अाज या गावात गेल्या वीस वर्षांपासून दारूचा एक थेंब देखील पाहायला मिळत नाही.

दारुबंदी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी गावची ही कहाणी आहे. गावातील ग्रामसुरक्षा दारूबंदीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका लाखमोलाची ठरली. दारूबंदी यशस्वी करण्यासाठी संपूर्ण युवक मंडळी ही कोणतीही अवैध दारू विकू नये, म्हणून रात्रीच्यावेळी गावातून गस्त घालायचे. गरज भासल्यास मानसिक परिवर्तनाचा मार्ग व व्यसनमुक्तीवर व्याख्यान आयोजित करणे तसेच गावातील दारू मुक्तीबाबत मोहीम राबवली. सतत तीन वर्ष संघर्ष केला. त्यानंतर गावात परिवर्तन होऊ लागले.

या गावच्या यशस्वी दारूबंदीचा आदर्श घेण्यासारखा आहे.  दारूबंदीच्या अखंड यशासाठी या युवकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु दारूबंदीची पेटवलेले ज्योत विझणार नाही, यासाठीं या तरुण युवक मित्रांनी रात्रीचा दिवस करून दारूबंदी केली. सलग २० वर्षे यशस्वीपणे दारूबंदी करून दाखवली. दारूबंदी करण्या अगोदर दारू गुत्तेदार म्हणून गावात व्यवसाय करणाऱ्यांचे संसार सुद्धा आता अतिशय चांगले फुलले आहे.

अण्णा हजारे यांनी केलं कौतुक..

गावात दारूबंदी यशस्वी केल्याबद्दल युवकांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते यशस्वी दारूबंदीबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. अण्णा हजारे यांनी या गावाला भेट देऊन कौतुक केले. हे गाव सैनिकाचे गाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या गावातील सर्व घरांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. अॅड. शरद पाटील, बाळू गायकवाड, अभिमन्यू पवार, कृष्णा पवार, हरी पोळ, संतोष पवार, दिवंगत मच्छिंद्र शिंदे, दिवंगत विजयकुमार शिंदे हे त्यावेळच्या युवकांनी ग्रामसुरक्षा व दारूबंदीसाठी महत्त्वपूर्ण लाखमोलाची भूमिका निभावली.

दारुबंदीसाठी राज्य सरकारने कडक पावले उचलण्याची गरज

दारूबंदी यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वांचे सहकार्य लाभले.  दारूमुळे काय परिस्थिती होते, याचे दुष्परिणाम आणि परिस्थिती फार जवळून पाहिली होती. आज गेल्या वीस वर्षांपासून दारूबंदी ही मोहीम कडकपणे राबवली अाहे. या मोहिमेमुळे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचले. आज गावात वाईट प्रवृत्तीला थारा नाही. दारूबंदीसाठी राज्य सरकारनं कडक पावले उचलण्याची गरज आहे.

दारूबंदी

गावचा अभिमान

आमच्या गावात गेल्या २० वर्षापासून दारूबंदी आहे. ग्रामीण आणि युवा वर्गाच्या पुढाकारामुळे दारु बंदी मोहीम यशस्वी ठरली. गावात दारू कुठेच विकली जात नाही. गावात साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुले उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावरती आज कार्यरत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. असं मत बाळासाहेब पौळ यांनी व्यक्त केलय..

दारुबंदीमुळे गावात शांतता.

तरुण वर्ग दारूच्या आहारी जात होता. त्यांचे भविष्य अंधारमय होऊ नये म्हणून गावातील सुशिक्षित तरुणांचे संघटन तयार होऊन व्यसनमुक्ती कार्यक्रम हाती घेतला आणि त्याचे परिणाम असे झाले की, आज गाव 100% व्यसनमुक्त असून तरुण वर्ग नोकरी, सैन्य, आधुनिक शेती करत आहेत. दारुबंदीमुळे गावात शांतता आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here