आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुलगी झाली की पैसे न घेणारे डॉक्टर माणुसकीचा नवा चेहरा, डॉक्टर बनले देवदूत
२ हजारपेक्षा जास्त प्रसूती केल्या मोफत सोलापूरच्या सुपुत्राची वेशीबाहेर कौतुकास्पद कामगिरी!


 

पुरुष प्रधान भारतीय संस्कृतीमध्ये आज मुलगा वंशाचा दिवा मानला जातो. मात्र, मुलीला वंशवेल मानायला कुणी तयार होत नाही. मुलगी जन्मताच अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. अनेकदा ही कळी फुलण्याआधी चिरडून टाकले जाते. स्रीभ्रूण हत्येसारखा किळसवाना प्रकार समाजाची घडी बिघडवण्याचे काम करतोय हे डॉक्टरांनी जाणलं. आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास हॉस्पिटल चे बिल न घेता मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे ठरवले. समाजापुढे माणुसकीचा नवा चेहरा ठेवणाऱ्या या देवदूताचे नाव आहे डॉ. गणेश राख.

मुलगी

new google

डॉक्टर राख हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वंजारवाडी गावचे. या गावात दुष्काळ पाचवीला पुजलेला. हाताला काम नसल्याने त्यांच्या वडिलांनी गाव सोडलं आणि पुण्यात हमाली करून पोट भरू लागले. वडिलांनी मोठ्या कष्टाने मुलांचा सांभाळ केला. पहलवान होण्याची इच्छा बाळगलेले गणेश गरिबीविरुद्ध संघर्ष करत अभ्यास करून डॉक्टर झाले. गणेश यांनी डॉक्टर झाल्यानंतर गावाकडे जाऊन गोरगरीबांची सेवा करायचे ठरवले. मात्र गाव दुष्काळाने पूर्ण होरपळून गेलं होतं. माणसांअभावी गाव ओस पडलेले होते त्यामुळे गणेश यांना पुन्हा पुण्यात यावं लागले.

डॉ. राख सांगतात, पुण्यातील हडपसर येथे २००७ साली एक हॉस्पिटल उभे केले. चांगल्या रुग्ण सेवेमुळे ओपीडीचे रूपांतर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाले. यातून चांगली कमाई देखील व्हायची. मुलगा झाला की नातेवाईक हॉस्पिटल डोक्यावर घ्यायचे. आनंदाने पेढे वाटायचे. मात्र, मुलगी झाली कि त्या मुलीला सासू सासरे नवरा इतर नातेवाईक बघायला देखील यायचे नाही. बिल भरताना कानकून करायचे. कधी कधी तर त्या मुलीला घेऊन देखील जात नव्हते. मुलीच्या बाबतीत समाजामध्ये असलेली ही भयानक मानसिकता बदलण्याचा चंग बांधला.

आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास एकही रुपयांना घेता हॉस्पिटलचा खर्च माफ करून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांनी डॉ. राख यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. घरातूनही विरोध झाला. मात्र, त्यांना वडिलांची साथ होती. मुलीला देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्या जगल्याच पाहिजे. त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी हाती वसा घेतला.

३ जानेवारी २०१२ पासून ‘बेटी बचाव’ या अभियानाची सुरुवात केली. हॉस्पिटलच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाचा विचार न करता त्यांनी हे काम चळवळ म्हणून उभारले. देशभर फिरुन डॉक्टरांना एक केले. आज २ लाखांपेक्षा अधिक खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते या चळवळीचा भाग बनले आहेत. यातील काही आर्थिक मदत करून तर काही जणांनी सक्रीय सहभाग घेत हे अभियान नेटाने पुढे नेण्यास मदत करतात.

मुलगी

आफ्रिका खंडात मुली वाचवा अभियानाचा दिला नारा

डॉ. राख यांच्या हॉस्पिटलमध्ये २ हजार पेक्षा जास्त मुलींचा जन्म झाला आहे. म्हणजेच तितक्याच प्रसूती मोफत केल्या आहेत. डॉक्टरांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे लोन सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर व्हायरल होत गेले. सोशल मिडीयात त्यांच्यावर सतत कौतुकाचा वर्षाव होत असतो. ‘बेटी बचाव’ हे अभियान आज जगात पोचले आहे. याचाच एक भाग म्हणजे सातासमुद्रापार आफ्रिका खंडातील लुसका या राजधानीच्या ठिकाणी जाऊन बेटी बचाव चा नारा देत जनआंदोलन  केले.

अमिताभ बच्चन यांनी दिली स्विफ्ट डिझायर गाडी भेट

डॉ. राख यांच्या कामगिरीचा पराक्रम अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहचला. बच्चन यांनी मुंबई येथे बोलून राख यांचा एका कार्यक्रमात सत्कार केला. राख यांच्याकडे फोर व्हिलर गाडी नसल्याचे अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. त्यांनी या डॉक्टरांना स्वीफ्ट डिझायर ही गाडी भेट म्हणून देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here