आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

 

सचिन काळे मुळात छत्तीसगड मधील बिलासपूर जिल्ह्यातील मेधपूर गावाचे रहिवासी आहेत . त्यांचा सगळा परिवार शेतीवरच आपली उपजीविका करतो जी त्यांच्या आजोबांनी रिटायरमेंट नंतर सुरू केली होती .

नोकरी

 

सचिन काळे यांच्या शिक्षण आणि नोकरी बद्दल..

सचिन काळे यांच्या घरचे त्यांना इंजिनिअर बनवु पाहत होते म्हणुन त्यांनी नागपुरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअर मध्ये बीटेक डिग्री पुर्ण केली . त्यानंतर फायनान्स मध्ये एमबीए ची डिग्री सुध्दा पुर्ण केली . आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुडगाव मध्ये एका पावर प्लांट मध्ये नोकरी सुरू केली . नोकरी सोबतच त्यांनी लॉ ची डिग्री पण पुर्ण केली आणि नंतर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी सुध्दा प्राप्त केली .

जाणुन घेऊया सचिन काळे यांच्या स्वताचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचाराबाबत

जेंव्हा सचिन काळे यांनी पीएचडी पुर्ण केली तेंव्हा ते स्वताचा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करू लागले पण कोणता व्यवसाय करावा ही अडचण होती . अशातच त्यांना त्याच्या आजोबांची गोष्ट आठवली जे नेहमी सांगत होते की माणूस कशाही शिवाय राहु शकतो पण जेवणाशिवाय राहु शकत नाही . येथुनच त्यांनी शेतीत हाथ आजमवायचे मन बनवले . २०१४ साली स्वताची कंपनी ‘ इनोव्हेटिव्ह एग्रिलाइफ सॉल्यूशन्स प्राइवेट लिमीटेड ‘ सुरू केली .

बघा सचिन काळे यांच्या शेती सुरू करण्याच्या आणि आतापर्यंत च्या प्रवासाबद्दल

नोकरी

सचिन यांनी आपले विचार वास्तवात आणण्याचे ठरवले यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि विलासपुर आपल्या गावी परत आले तिथे त्यांची २५ बिघा जमीन होती . तिथे आल्यानंतर त्यांनी काही वेळ क्राॅन्ट्रैक्ट वर शेती करण्याबाबत रिसर्च केली . नंतर त्यांनी आपली ‘ इनोव्हेटिव्ह एग्रिलाइफ सॉल्यूशन्स प्राइवेट लिमीटेड ‘ नावाच्या कंपनीची सुरुवात करून शेती करण्यास सुरुवात केली आणि आजुबाजुच्या शेतकऱ्यांची जमीन सुध्दा किरायाने घेतली . त्यासाठी त्यांनी त्यांची जमा एफडी पण तोडली.

त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या सोबत जोडुन शेती करण्याच्या नविन पध्दतीविषयी माहिती दिली. शेती करण्यासाठी बिलासपुर येथील मजुरांना किरायाने ठेवले. सुरुवातीला त्यांनी आपल्या २५ बिघा जमिनीवर धान्य आणि भाज्यांची शेती केली ज्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला. या सगळ्या कामांमध्ये त्यांची पत्नी कल्याणी जिने मास कम्युनिकेशन मध्ये डिग्री पुर्ण केली आहे तिही मदत करु लागते. हळुहळु त्यांचा हा व्यवसाय चालू लागला आणि आता शेकडो शेतकरी शेकडो एकर जमीनीवर सचिन काळे यांनी सांगितले ल्या पद्धतीने शेती करतात .

आता ते शेतकरी सचिन काळे यांनी सांगितल्या प्रमाणे शेती करुन खुश आहेत. एवढंच नाही तर यशस्वी शेतकरी सचिन काळे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सलाहकार सुध्दा आपल्या कंपनीत ठेवलेत. त्यांच्या परिसरामध्ये शेतीच्या मालाच्या कमीत कमी किंमती ठरलेल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओवर दोन करोड हुन जास्त वार्षिक आहे. हे सगळं शक्य झाले त्यांच्या मेहनत , जिद्दी मुळे आणि दूरदृष्टीमुळे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here