आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

झोपडीत राहणाऱ्या छोट्या राजनने कधी दाऊदचा गेम करण्याची सेटिंग लावली होती..!


कधी झोपडीत राहणा-या छोटा राजनने बनवली होती दाऊदला मारण्याची प्लानिंग, गैंगस्टरची तिहाड पोहोचण्याची पुर्ण कहाणी .राजनवर नायर गैंग मध्ये राहतेवेळी त्याच्या अगोदरच अवैध वसुली, धमकी, मारामारी आणि हत्येचा प्रयत्न अशे गुन्हे दाखल होते .

आज एका गैंगस्टर बाबत जाणुन घेणार आहोत ज्याने दाउदला मारण्याची प्लानिंग बनवली होती . कधीकाळी झोपडीमध्ये राहणाऱ्या छोटा राजन ने मुंबई अंडरवल्ड मध्ये मोठे नाव कमावले होते . खुप अपराधि गुन्हे राजन वर दाखल होते. राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निखलजे होते. अंडरवर्ल्डच्या दुनियामध्ये राजनला ‘ नाना ‘ किंवा ‘ सेठ ‘ या नावाने ओळखले जाते.

१९६० साली मुंबईतील चेंबूर ची तिलक नगरीमध्ये जन्मलेल्या राजन बाबत असं म्हणतात की तो वयाच्या दहाव्या वर्षी पासून सिनेमा हॉलच्या जवळ ब्लैक मध्ये टिकट होता. या कामाच्या काळात त्यांची ओळख राजन नायरशी झाली आणि तो राजन नायर गैंगमध्ये भर्ती झाला. अस म्हणतात की राजन नायर हा गुन्हेगारी जगताचा बडा राजन समजल्या जात असे आणि राजेंद्र सदाशिव निखलजे (छोटा राजन) हा त्यांचा उजवा हात.

new google

दाऊद

दाउद सोबत केले काम .

अस म्हणतात की डॉन दाऊद इब्राहिम सोबत छोटा राजनने खुप मोठ्या घटनांना अंजाम दिला . छोटा राजन ने खुप काळापर्यंत दाउद साठी वसुली , हत्या आणि अनेक गुन्हे केले. हा गैंगस्टर तिहाड जेलमध्ये बंद आहे .

दाउद पासून झाला वेगळा .

छोटा राजन आणि दाऊदने खुप वर्षे मुंबई वर राज्य केले. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर छोटा राजन दाउद पासून वेगळा झाला.अस म्हणतात की लवकरच त्यांची दुश्मनी एवढी वाढली की ते एकमेकांच्या जिवांचे वैरी झाले .
अस म्हणतात की ते याकाळामध्ये एकमेकांना मारण्याचे प्लॅन बनवत असत. दाउदने छोटा राजन वर खुप वेळा हल्ला केला पण तो वाचत राहिला.

राजनवर हमल्याची प्लानिंग मुंबईतील शार्प शुटर शरद शेट्टीच्या घरी बनवली होती. साल २००० साली पिज्जा बॉय बनुन आलेल्या दाउदच्या लोकांनी बैंकॉक मधील हॉटेल मध्ये छोटा राजनवर हमला केला.

अस म्हणतात की छोटा राजनवर ६५ पेक्षा जास्त अपराधिक केस आहेत. राजन नायर गैंगमध्ये असताना त्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल होते. दाउद सोबत आल्यानंतर हा ग्राफ वाढतच गेला. भारतात त्यावर २० पेक्षा जास्त हत्यांचे केस आहेत. साल २०११ मध्ये मुंबईतील वरिष्ठ पत्रकार जोतिर्मय डेच्या हत्येमागे त्याचाच हात होता‌.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here