आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्लासेसच्या पोरांनी दिलेल्या नावाला बायजु रविंद्रनने भारतीय संघाचा ‘ऑफिशियल पार्टनर’ बनवलंय..!


 

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बायजु यांची यशस्वी कहाणी. ज्यांनी हे सिद्ध केले की खरी मेहनत आणि सातत्याने जिवनात मोठे लक्ष प्राप्त करता येते आणि दुसऱ्यांसाठी सुध्दा एक आदर्श प्रस्थापित करता येतो .या व्यक्तिचे नाव आहे बायजु रविंद्रन .

मित्रांनो तुम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेस BYJU’S हे नाव तर ऐकलेच असेल. आज आपण BYJU’S च्या यशाची स्टोरी जाणून घेणारआहोत ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल.

बायजु रविंद्रन
source- gettyimages

चला तर थोडं विस्तृत वाचूया BYJU’S चे संस्थापक रविंद्रन बायजू यांच्याबद्दल..

BYJU’S FOUNDER रविंद्रनचा जन्म आणि प्रारंभिक जिवन.

बायजु रविंद्रन यांचा जन्म १९८० मध्ये केरळ मधील कन्नुर जिल्ह्यातील अझिकोडे गावात एका मोठ्या परिवारात झाला . त्याच्या वडिलांचे नाव सुध्दा रविंद्रन होते आणि आईचे नाव सोभना वल्ली होते आणि ते दोघेही पेशाने शिक्षक होते. त्यांचा एक भाऊही आहे ज्याचे नाव रिजु रविंद्रन आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले होते.

त्यांची शिक्षण सोडून क्रिकेट आणी फुटबॉल मध्ये जास्त आवड होती. त्यांचे आई वडील सुध्दा शिक्षणाच्या बाबतीत त्यांना काही म्हणत नव्हते. खेळामध्ये आवड असुन सुद्धा कधी त्यांनी खेळामध्ये करियर करण्यावर भर दिला नाही. त्यांचा गणित विषय लहानपणापासून चांगला होता म्हणुन त्यांनी कन्नुर जिल्ह्यातील एका सरकारी कॉलेजमधुन इंजिनिअरिंग पुर्ण केले .

BYJU’S संस्थापक रविंद्रन यांच्या करियर ची गोष्ट .

 

बायजु रविंद्रन यांनी पदवी पुर्ण केल्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्विस इंजिनिअर म्हणून नोकरी केली. तिथे त्यांनी जवळपास दोन वर्षे चांगल्या पगारावर नोकरी केली. त्यांना त्याच्या कंपनीच्या काही खास कामांसाठी मैंगलोर ला जावे लागले. जिथे त्यांचे काही मित्र CAT परिक्षेची तयारी करत होते.

तेंव्हा त्याचे गणित चांगले असल्या कारणाने त्यांच्या मित्रांनी त्यांना गणिताच्या तयारीसाठी मदत मागितली. त्यांनी मित्रांची मदत केली आणि स्वताही मजेत CAT ची परिक्षा दिली आणि आश्र्चर्यकारक म्हणजे ही परिक्षा १०० टक्के गुण घेऊन पास केली.

यानंतर पुन्हा ते नोकरी करण्यासाठी गेले आणि २००५ मध्ये भारतात वापस आले आणि मित्रांना परिक्षेसाठी मदत केली. एकप्रकारे शिक्षण जगतात त्यांच्या करियर ची सुरुवात झाली होती. सुरुवातीला त्यांनी घरातल्या बालकनींमध्ये मित्रांना शिकवले. नंतर त्यांनी फ्रि वर्कशॉप द्यायला सुरुवात केली. नंतर मुलं त्यांना त्याबदल्यात पैसे द्यायला लागले. शेवटी त्यांनी कोचींग ची एवढी कमाई बघुन नोकरी सोडून दिली. आणि कोचींगवरच आपले लक्ष केंद्रित केले.

BYJU’S संस्थापक रविंद्रन यांच्या द्वारा BYJU’S सुरू करण्याची गोष्ट .

बायजु यांच्या विद्यार्थ्यांनी च त्यांच्या क्लास चे नाव BYJU’S क्लासेस ठेवले. हळुहळु त्यांनी हायर लेव्हलला शिकवायला सुरुवात केली जिथे त्यांना हा अनुभव आला की अजुनही भारतात सगळीकडे शिक्षा पध्दती चांगली नाही. यासाठी त्यांनी आपले ध्यान आता शाळेतील मुलांना शिकवण्यावर केंद्रित केले.

नंतर २०११ साली त्यांनी ‘Think And Learn’ नावाची कंपनी सुरु केली. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी स्वताचे BYJU’S App तयार केले. ज्याचा वापर करून त्यांनी शिक्षण फक्त थेरी टाइप न ठेवता टेक्नॉलॉजीचा वापर करून विसुअल लर्निंग वर सुद्धा काम केले.

त्यांचे हे अॅप वापरून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत चे विद्यार्थी पहले काही क्लास मोफत करुन पुढे शुल्क भरतात .आपण याची लोकप्रियता यावरुनच ठरवु शकतो कि पहिल्याच वर्षी ५५ लाख लोकांनी हे अॅप डाउनलोड केले होते. हळुहळु हळुहळु BYJU’S च्या कोर्स मध्ये वाढ होत गेली आणि आता JEE, NEET, CAT, UPSC यांसारख्या परिक्षांची तयारीसाठी कोर्स आले. यांच्या लोकप्रियतेमुळे लवकरच याला नवनविन इन्वेस्टर्स मिळाले.

आपण या गोष्टींवरुन अंदाज बांधु शकतो कि २०१७ मध्ये या कंपनीचे वार्षिक उत्पन्न २६० करोड होते आणि तेच २०१८ साली ५२० करोड वर पोहोचले. आज या कंपनीची किंमत ३७००० करोड आहे ज्याच्यात रविंद्रन चा हिस्सा २० टक्के आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here