आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

उडीसातील एका मारवाडी तरुणाने करोडोंची उलाढाल करणारी कंपनी “ओयो रूम्स” यशाच्या शिखरावर पोहचवलीय.. 


आज आपण पाहणार आहोत ओयो रुम फाउंडर रितेश अग्रवाल यांच्या यशाची कहाणी ज्यांनी आपल्याला हे दाखवून दिले की जिवनामध्ये सफलता आणि यश मिळवण्याचे काही वय नसत. फक्त त्यासाठी पाहिजे ती दुरदर्शी नजर आणि आपल्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य मार्ग.

ओयो रुम

रितेश अग्रवाल यांच्या प्रारंभिक जिवनाविषयी .

रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये उडिसातील कटक जिल्ह्यातील एका मारवाडी परिवारामध्ये झाला होता . त्यांच्यापरिवारामध्ये आई वडील आणि ३ भाऊबहीण होते. त्यांचे वडील Infrastructure Corporation सोबत काम करत असत आणि आई एक गृहीणी होती.

new google

त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या जिल्ह्यातील सॅक्रिड हर्ट स्कुल मधुन घेतले. पुढे घरच्यांनी त्यांना इंजिनिअरिंग चे शिक्षण घेण्यासाठी राजस्थानमधील कोट्याला पाठवले.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


रितेश अग्रवाल यांचे स्वप्न स्वताचे काही मोठे करण्याचे होते म्हणुन ते प्रत्येक शनिवार रविवार दिल्लीला जाऊन खूप लोकांना भेटत होते . यामुळे त्यांना Traveling चा खुप अनुभव आला होता. आपले काही करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली . त्यांनी कोटामध्ये एक पुस्तक लिहिलं ज्याच नाव होतं Indian Engineering Colleges : A Complete Encyclopaedia Of Top 100 Engineering Colleges  हे पुस्तक लोकांना खुप आवडलं आणि flipkart वर याची खुप विक्री झाली .

जाणुन चर्या रितेश अग्रवाल द्वारा बिझनेस सुरू करण्याच्या आईडिया बाबत

रितेश अग्रवाल सुरुवातीपासून च स्टीव जॉब्स, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांना आपला आदर्श मानत होते आणि  त्यांच्यासारख जिवनात काहितरी मोठ करण्याच स्वप्न पाहत होते. त्यांना प्रवासाचा जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी व्यवसाय करण्यासाठी आइडिया शोधली ति म्हणजे ऑनलाईन रूम बुकिंगची अशी एक कंपनी बनवायची जी देशातील कोणत्याही शहरांमध्ये हॉटेल आणि रुम किरायाने मिळण्याची माहीती देईल.

ओयो रूम्स

रितेश अग्रवाल द्वारा Oravel Stays पासून केलेल्या सुरुवातीबद्दल .

आपल्या आइडियाला पुर्ण करण्यासाठी रितेश अग्रवाल यांनी २०१२ मध्ये स्वताचे पहिले स्टर्ट अप Oravel Stays ची सुरुवात केली ज्याचे उद्देश कोणत्याही क्षेत्रामध्ये यात्रा करणाऱ्या लोकांना काही काळासाठी कमी किमतीत रुम किंवा हॉटेल उपलब्ध करून देणे होते.

त्यांना नशिबाची साथ भेटली आणि काही महिन्यांनंतर नविन स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक करणारी कंपनी Venture Nursery कडुन ३० लाख रुपयांचा फंड मिळाला.

यानंतर त्यांनी आपल्या बिझनेस प्लान Theil Fellowship जे की पेपल ची कंपनी चे सह संस्थापक पीटर थेलच्या ‘ थेल फाउंडेशन ‘ द्वारा आयोजित एक वैश्विक प्रतियोगिता समोर ठेवले जिथे त्यांना १० वे स्थान प्राप्त झाले आणि फेलोशिपच्या रुपात जवळपास ६६ लाख रुपयांची राशी मिळाली. खुप कमी काळामधी मिळालेल्या या यशामुळे रितेश अग्रवाल खुप खुश होते. परंतु तरीही Oravel Stays घाट्यामध्ये गेली. आणि त्यांना आपल्या या कंपनीला अस्थायी रुपात बंद करावं लागलं.

ओयो रूम्स

 रितेश अग्रवाल यांच्या Oravel Stays पासून Oyo Room पर्यंत च्या प्रवासाबद्दल .

रितेश अग्रवाल यांनी कंपनी बंद झाली तरी त्यांनी हार नाही मानली. आणी तिच्या बंद होण्याच्या कारणांचे कारण  शोधण्याचे मन बनवले. त्यांना हा अनुभव आला की भारतामध्ये हॉटेल किंवा रुम कमी किमतीत किरायाने मिळणे महत्त्वाचे नाही. परंतू कोणत्याही हॉटेल ने कमी किमतीत मुलभूत सुविधा देण गरजेचं होतं.

त्यांनी आपल्या Oravel Stays ला २०१३ मध्ये नवीन रुप, ध्येय ठरवुन ‘ओयो रूम्स’ या नावाने सुरू केले. ज्यामध्ये त्यांनी हॉटेलमधील रुम च्या मुलभूत सुविधांबाबत काही अटी घातल्या. जर हॉटेलला ओयो रूम्ससोबत जोडल्या जायचे असेल तर त्याला त्याला अटि पुर्ण कराव्या लागत.

लवकरच त्यांची मेहनत कामा आली आणि वर्ष २०१४ मध्ये ओयो रूम्सला 2 मोठ्या कंपन्या LSVP ( light speed venture partners ) आणि DSG consumer partners द्वारा ४ करोडची गुंतवणूक प्राप्त झाली. नंतर २०१६ मध्ये जापानची कंपनी Soft Bank ने ओयो रूम्ससोबत ७ अरब ची मोठी गुंतवणूक प्राप्त केली. आजच्या घडीला ओयो रूम्स भारतातील स्टार्ट अप कंपन्यांमध्ये अग्रस्थानी आहे . आज ओयो रूम्स चे मोबाईल एप्लीकेशन सुध्दा आहे. आज रितेश अग्रवाल यांचे नाव देशातील मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतलेल्या जाते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here