आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
राणी अमिना : २० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारी वीर अफ्रिअन योध्दा..
राणी अमिनाची गोष्ट यासाठी खास आहे कारण तिने अदम्य साहस आणि तेज डोक्याचा परिचय वेळोवेळी दिला .
यामुळेच तिने आपल्या साम्राज्याचा विस्तार असा काही केला कि तिच्या अगोदरची पिढी आणि नंतरची पिढीही तिच्या सारखे सामर्थ्य दाखवु शकले नाही.
किल्ले बंदी आणि व्यापारी मार्गाचा विस्तार असा काही केला कि सगळ्यांना तिच्या रणनिती चा लोहा मानावा लागला. एक कुशल योध्दा असल्या कारणाने तिला सगळ्या युध्द कौशल्यांमध्ये महारत हासिल होती. हेच कारण होते कि तिने आपल्या जाजाउ साम्राज्याचा विस्तार प्रत्येक दिशेला केला. अशामध्ये या वीर राणी अमिना बद्दल माहिती करुन घेणे रोचक ठरेल.
तर चला बघुया राणी अमिना यांच्या राज्यकाळाबद्दल जे सतत ३४ वर्षे चालले.
आई पासून शिकली एक उत्तम शासक होण्याचे गुण .
राजकुमारी अमिनाचा जन्म १५३३ मध्ये कडुनाच्या जाजा क्षेत्रामध्ये झाला. जे नाइजिरीया च्या उत्तरपुर्व भागात आहे. अमिनाचा जन्म राणी बकवा द हाबेच्या पोटी झाला जी तीचे आजोबा हाबे जज्जाऊ नोहिर च्या मृत्यूनंतर जाजाऊ साम्राज्यावर राज्य करीत होती. जुन्या काळी जाजाऊ असणारे हे लोक आता जरिया म्हणुन ओळखले जातात.
अमिनाने लहान पासून एक सत्ताधारी होण्याचे गुण शिकले होते. ति आपल्या आजोबांसोबत स्टेट मिटींगामध्ये जात होती तिथेच तिने राजनितिक आणि कुटनितीक गुण शिकले. वेळेसोबत अमिनाचे वय वाढले आणि ती १६ वर्षांची झाली. हि ती वेळ होती जेंव्हा तिच्या आईने राज्याची सुत्रे आपल्या हाती घेतली होती आणि ति राणी होती.
तेंव्हा तिने एक उत्तम शासक होण्याचे गुण तिच्या आईकडून शिकले.अभिनाने एका राणीच्या जिम्मेदारी कशा सांभाळल्या जातात हे सगळे आपल्या आईकडून शिकले.
त्यांनी स्वताला कधी चार भिंतींच्या आत कैद केले नाही तर लवकरच सगळ्या कला शिकुन घेतल्या. हेच कारण होते कि येथिल सगळे लोक अमिनाच्या आईच्यानंतर अमिनाला राणीच्या नजरेने बघु लागले.
ती सगळ्या सरकारी गोष्टींमध्ये भाग घेऊ लागली . सोबतच आपल्या राजनितीक कलेन सगळ्यांचे मन मोहु लागली. याला सोडुन सैन्याच्या क्षेत्रामध्ये सुध्दा ती स्वताला कुशल बनवु लागली.
अमिना बनली जाजाऊ साम्राज्याची नवी हाबे .
सन १५६६ मध्ये तिची आई म्हणजे बकवाची मृत्यू झाली. तिच्या मृत्यूनंतर अमिनाचा छोटा भाऊ करामा जाजाऊ साम्राज्याचा नवा शासक नियुक्त झाला. करामाची ताजपोशी नवीन हाबेच्या रुपात झाली आणि सगळा कारभार त्याच्या हाती सोपवण्यात आला.
करामा के शासन मे अमिना जाजाऊ केल्वेरी आणि मिलिट्री मध्ये एक उच्च पदाची महिला बनली. तिने स्वताच्या बळावर धन आणि संपत्ती जमवली. तिने जाजाऊला एका वेगळ्या प्रकारे ओळखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
करामाचे शासन चांगले चालु होते पण १५७६ मध्ये त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षे राहिला. त्याच्या मृत्यूनंतर फक्त एक चेहरा होता जो हा कारभार योग्य रित्या सांभाळु शकत होता आणि तो होता जाजाऊ .
याच वर्षी अमिना जाजाऊ साम्राज्याच्या नविन हाबेच्या रूपात नियुक्त झाली. तिने या पदावर आल्यावर पहिले लक्ष हे ठेवले कि सर्व व्यापारी मार्गांचा विस्तार करणार. याच ति आपल्या राज्यातिल लोकांना सुरक्षा प्रदान करणार ज्यामुळे व्यापारामध्ये काही अडचण नाही येणार.
तिने जे लक्ष ठेवले होते ते पुर्ण केले आणि आपल्या राज्याच्या सिमांचा विस्तार केला. तिने जाजाऊची सिमा अटलांटिक तटापर्यंत पोहचवली.
एक रात घालवल्यानंतर करत होती कत्तल :
अमिना २० हजार सैनिकांचे नेतृत्व करत होती. तिने जास्त युध्द व्यापारी मार्गांना विरोध करणाऱ्यांसोबत केले आणि ते जिंकले सुध्दा. तिने जिंकलेली शहरे आपल्या साम्राज्याला जोडली. तिच्या विषयी बोलल्या जाते की अमिना जिंकलेल्या शहरातील एका सैनिकासोबत रात्र घालवत असे आणि सकाळ होताच त्याला मारून टाकत असे. कारण त्याने अमिनाबद्दल कोणालाही सांगु नये.
अमिनाने ३४ वर्षे साम्राज्य चालवले. तिने फक्त शहरच जिंकले नाहीत तर आजुबाजुचे महत्त्वाचे प्रांत आपल्या साम्राज्याला जोडले. रोचक गोष्ट अशी आहे की तिच्या साम्राज्याच्या अगोदर आणि नंतर तिची बरोबरी कुणीच करु शकले नाही. तिला सगळ्यात जास्त सिमा क्षेत्रावर झेंडा फडकवण्यासाठी ओळखल्या जाते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved
हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!
या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!