आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शेतमजूर महिला बनली ‘मसाला क्वीन’ झोपडीत सुरू झालेला उद्योग घेतोय कोटींची उड्डाण. मसाल्याच्या यशाचा सुगंध सातासमुद्रापार..


 

अत्यंत हलाखीची परिस्थिती. घर संसार चालवण्यासाठी शेतमजुराची कामे करून दिवस ढकलायच्या तर कधी दगड फोडणे, खड्डे खणणे, बांधकाम करणे अशी पुरुषांसारंखी कष्टाची कामे करायच्या. आयुष्यात पावलोपावली संघर्ष करणाऱ्या एका शेतमजूर महिलेने जिद्द आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशात ‘मसाला क्वीन’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे. ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव गावच्या कमलाताई परदेशी यांची.

मसाला उद्योग

new google

कमलाताई परदेशी यांनी कधीच शाळेत पाऊल टाकलं नाही. बिझनेसविषयी कुठलाही अनुभव पाठीशी नसताना महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या तिखट मसाला उद्योगाला त्यांनी एक उंच भरारी दिली आहे. २००४ साली त्यांनी आपल्यासारख्या दहा अक्षरशत्रू महिलांना एकत्र केले आणि अंबिका महिला बचत गटाची स्थापना केली.

प्रत्येक महिलांनी दर महिन्याला शंभर रुपये प्रमाणे तीन महिने जमा केले. यातून साडेतीन हजार रुपयांचे भांडवल उभे केले. जमा झालेल्या भांडवलातून छोटासा लघु उद्योग सुरू करण्याची संकल्पना कमलाताई यांच्या डोक्यात आली.

बाजारातील मागणी पाहून त्यांनी तिखट मसाला उद्योग सुरू करण्याचा निश्चय केला.

मसाला तयार करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग विभागाकडे प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्या.

मात्र प्रशिक्षणासाठी दहावी उत्तीर्णची अट होती. बचत गटातील कोणत्याच महिलेचं शिक्षण नसल्याने त्यांना प्रशिक्षण मिळाले नाही. अखेर कमलाताईनी मसाल्याचे प्रशिक्षण घेतलेल्या एका महिलेशी हाताशी धरून मसाला तयार करण्याचे तंत्र अवगत केले. मसाल्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणून मसाला तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

तयार करण्यात आलेला खमंग गावाकडचा तिखट मसाला हा नेमके कुठे आणि कसा विकावा याचं तंत्र मात्र त्यांना माहीत नव्हतं. मसाला पुडीत बांधून विकण्यास सुरूवात केली. मसाल्याचे पॅकिंग आकर्षक नसल्याने दर्जेदार मसाला असूनही त्यांचा मसाला विकला जात नव्हता.

मसाला उद्योग

मनाशी आलेली निराशा झटकून जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन ते मसाला विकत होते. अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांना मसाल्याचे पॅकिंग चांगले करण्याचा सल्ला देत होते. त्यांची ही सूचना मसाला उद्योगासाठी टर्निंग पॉईंट ठरली.

कमलाताईंनी त्यांची सूचना मनावर घेत आपल्या पॅकिंगमध्ये बदल केला. महिला बचत गटाचे लेबल लावले आणि त्यांचा मसाला खपू लागला. पुढे हळूहळू त्यांच्या मसाल्याच्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरू लागला. मसाल्याला मागणी वाढू लागली.
मसाला उद्योगाची वाढती व्याप्ती पाहून आपल्याच गाव परिसरातील १०८ महिलांचे मिळून आठ महिला महिला बचत गट स्थापन केले. अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. उद्योगाचे शॉप अॅक्ट लायसन देखील काढले.  उद्योग उभारणीसाठी राष्ट्रीय बँकेतून कर्ज घेतले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे मिळाली प्रगतीची दिशा..

कमलाताई परदेशी सांगतात, २००६ साली झालेले दख्खन प्रदर्शन, भीमथडी आणि महालक्ष्मी प्रदर्शनात त्या सहभागी झाल्या. या प्रदर्शनात त्यांच्या खमंग मसाल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. मसाल्याला अचानक मागणी वाढली. मुंबईत झालेल्या प्रदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन त्यांचा मसाला बिग बाजार मधील अधिकाऱ्यांना चवीसाठी दिला.

अवघ्या एका आठवड्यातच त्यांना दोन लाख साठ हजार रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली. पुणे-मुंबईतील अनेक मोठ्या मॉलने त्यांच्या मसाल्याची मागणी केली. पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि विदेशात त्यांचा मसाला पोहोचला.

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी थोपटली पाठ

कमलाताई यांच्या छोट्याशा उद्योगात आज दोनशेहून अधिक महिला काम करतात. कोरोनासारख्या महासंकटात ही त्यांनी या महिलांना मदतीचा हात दिला. त्यांच्याकडे आज ४२ प्रकारचे मसाले तयार केले जातात. वर्षाकाठी पाऊण कोटींची उलाढाल होते.

कमलताईची कर्तबगारी पाहून आर्थिक शिखर परिषदेने आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी पाठ थोपटली आहे. झोपडी सुरू झालेला हा उद्योग आज कोटींची उड्डाणे घेत असल्याचे पाहून कमलाताईंचा अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला आहे. आज अनेक नवे उद्योजक बिझनेस उभा करण्यापूर्वी कमलाताईंचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here