आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या मधमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन बद्दल मोठं वक्तव्य केल आहे.


 

कोरोना केसेसच्या वाढत्या आकड्यामुळे एकीकडे कोरोना थोपवण्याचं काम सरकारला कराव लागणार आहे तरं दुसरी कडे अर्थव्यवस्था सुद्धा सुरळीत ठेवण्याचं आव्हान सरकारला पेलाव लागणार आहे. अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले पाहूया.

सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आज जरी लॉकडाऊन लावत नसलो त्री लावणार नाही.असं होणार नाहीं. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास लॉकडाऊन शिवाय सरकारकडे पर्याय नाही.
त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनचा इशारा आताच देतोय,मात्र आज लॉकडाऊन जाहिर करत नाहीये.

कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात लवकरच कडक निर्बंध लादले जातील असाही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले

तरं येत्या एक दोन दिवसात राज्यात नियमावली जाहीर करू असं म्हटलं आहे.

राज्यातील सर्वच लोकांकडून सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. मास्क न लावले यात काहीही शोर्य नाही असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगवला.

मुख्यमंत्री

आणखी महत्वाचे मुद्दे..

मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे : मुख्यमंत्री

लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : मुख्यमंत्री

सध्या राज्यात कोरोना चाचणी करणाऱ्या 500 हून अधिक प्रयोगशाळा : मुख्यमंत्री

लॉकडाऊनची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही : मुख्यमंत्री

कोरोनामुळं जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान : मुख्यमंत्री

आज राज्यात 45 हजार रुग्णांची वाढ होण्याची शक्यता : मुख्यमंत्री

लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम; लस घेतली तरी मास्क घालणं अनिर्वाय : मुख्यमंत्री

इतर देशात कोरोना संसर्गामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ : मुख्यमंत्री

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल : मुख्यमंत्री

लॉकडाऊन हा खूप घातक, पण आपण कात्रीत सापडलोय : मुख्यमंत्री

राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार : मुख्यमंत्री

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार : मुख्यमंत्री

सरकार खंबीर आहे, कोरोनाविरोधातील लढाईसाठी एकजुटीने सिद्ध व्हा : मुख्यमंत्री

राज्यात कडक निर्बंध लादणार, येत्या एक-दोन दिवसात नियमावली जाहीर करणार : मुख्यमंत्री

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here