आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हॉर्न न वाजवता गाडी चालवणारे पक्षीमित्र. पक्षी वाचविण्यासाठी अनिल यांची धडपड..


 

शहरात ध्वनिप्रदूषण हा ज्वलंत प्रश्न आहे. गाड्यांच्या हॉर्नमुळे होणारा कर्णकर्कश आवाज मानवी जीवनावर घातक परिणाम होतो. क्षमतेपेक्षा अधिक डेसिबलच्या आवाजाने पशू-पक्षीदेखील बिथरतात. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे पशु पक्षांना इजा होऊ शकते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासंदर्भात अनेकदा पक्षीमित्र जनजागृती करतात. दरम्यान, पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून सोलापुरातील एक पक्षीमित्र गेल्या दहा वर्षांपासून आपल्या गाडीचा हॉर्न न वाजवता गाडी चालवतो.

पक्षी

new google

अनिल भगीरथ जोशी असं या पक्षी मित्राचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी श्री जोशी हे रस्त्यावरून जात असताना कर्णकर्कश आवाजामुळे पक्षी घाबरून जात असल्याचे दिसले. भीतीपोटी पक्षी जीव वाचवण्यासाठी सैराभेैर होऊ लागले. प्रसंगी अपघातात जीवही गमवावा लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी गाडीचा हॉर्न न वाजवण्याचा निश्चय केला.
श्री जोशी हे गेल्या दहा वर्षांपासून ते हॉर्न न वाजवता गाडी चालवतात. रस्त्यावर वळण आले म्हणून कधीही हॉर्न वाजवत नाहीत. हॉर्न वाजवण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून ते गाडी कमी वेगात चालवतात.

 

अनिल जोशी हे बी.ई. (सिव्हिल) स्थापत्य अभियंता असून  त्यांचे उच्च शिक्षण प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये झाले आहे. श्री जोशी हे गेल्या 15 वर्षांपासून घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी दानापाण्याची सोय करत आहेत. पक्षांची सेवा करण्यातच त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना विलक्षण आनंद मिळतो. त्यांच्या अंगणात ठिक ठिकाणी पाण्याचे बाउल आणि धान्य ठेवण्यात आले आहे. तसेच पक्ष्यांसाठी घराभोवती अनेक कृत्रिम घरटे सुद्धा लावण्यात आली आहेत.

 

श्री जोशी गेल्या 3-4 वर्षांपासून वृत्तपत्र मध्ये पक्षी आणि प्राणी यांच्यासंबंधी येणार्‍या बातम्यांची कात्रणे संग्रह करतात. तरुण पिढी पर्यावरणाकडे वळत आहे. पक्ष्यांवरती अभ्यास करता यावा तसेच पुढील पिढीला माहिती देता यावी, हा या संग्रह पाठीमागचा हेतू अाहे. पर्यावरण जपण्यासाठी ते सतत धडपडत असतात.

पर्यावरणाच्या कोणत्याही उपक्रमात जसे वृक्षारोपण, सिडबॉल, पाणी फौंडेशन इत्यादी मध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच गेल्या 5-6 वर्षांपासून अनिल जोशी हे पर्यावरण पूरक अशा मातीच्या गणपतीची घरामध्ये स्थापना करून विसर्जन सुध्दा घरीच करतात.

पक्षी

अंगणात पक्षांनी थाटला संसार

पोपट,चिमणी, ग्रीन बी इटर, रॉबिन, रॉबिन पक्षी, शिंपी, सनबर्ड, राखी वटवट्या, भारद्वाज, कोकीळा, बुलबुल पक्षी या पक्षांचा मंजुळ स्वर अगदी सकाळच्या रामप्रहरी ऐकू येतो. पक्ष्यांच्या  आवाजानेच संपूर्ण जोशी कुटुंब जागे होते. यातील काही पक्ष्यांनी जोशी यांच्या अंगणातील झाडांवर आपला संसार थाटला आहे.

पावसाळ्यात जोशी यांच्या आंगणतील धान्य टिपण्यासाठी मुनिया आणि सुगरण हे पक्षी आवर्जून थव्याने येत असतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here