आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

महात्मा गांधी यांचे म्हणन होत भाषेच्या आधारावर राज्य बनवल्यास देश मजबूत होईल परंतु त्यांचे शिष्य जवाहरलाल नेहरू यांचे मत याउलट होते.


 

इंग्लैंड च्या गवर्नर कॉउंसिल चा मेंबर आणि लेखक जॉन स्ट्रेची ने 1882 मध्ये प्रकाशित आपले पुस्तक ‘इंडिया’ मध्ये लिहिले आहे ‘हिंदुस्तान हा एक देश नाही तर हा खुप देशांचा एक महाद्वीप आहे ‘. आपण स्कॉटलैंड आणि स्पेन मध्ये समानता बघु शकतो पण बंगाल आणि पंजाब खुपच वेगवेगळे आहेत. काही अशाच पुस्तकांच्या मदतीने ब्रिटिश इंडिया च्या आईसीएस ऑफिसरांना भारत समजावला जात असे आणि याच आधारावर ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार 190 वर्षे या देशामध्ये जोडणे तोडणे तुकडे पाडणे असे काम करत राहिली आणि जाता जाता या देशाला विभागुन गेले.

धर्माच्या आधारावर विभाजन झाल्यानंतर भारतामध्ये अजुन एक विभाजन झाले यांचे कारण भाषा बनली . साल 1953 होते आणि भाषेच्या आधारावर बनणारे हे राज्य होते आंध्र प्रदेश.

new google

महात्मा गांधी

तेंव्हाचा  देशाचा राजनीतिक नकाशा..

त्यावेळी देशामध्ये तीन श्रेणी चे राज्य होते. पहले ते नऊ राज्य होते जे तत्कालीन ब्रिटिश सरकार मध्ये गवर्नर च्या अधीन होते आणि जे निर्वाचित गवर्नर आणि विधानपालिकेद्वारा शासित होते. यामध्ये आसाम, बिहार, मध्य प्रदेश , मद्रास, उड़ीसा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बॉम्बे होते.

दूसरी श्रेणी त्या राज्यांची होती जे पहले रियासतदारांच्या अधीन होते आणि ज्यांना आता राज्य प्रमुख आणि विधानपालिका संभाळत होती. यामध्ये मैसूर, पटियाला, पूर्वी पंजाब, हैदराबाद,राजस्थान, सौराष्ट्र, त्रावनकोर होते.

तीसरी श्रेणीचे राज्य ते होते जे पहले चीफ कमिश्नर किंवा एखाद्या राज्या  द्वारा शाषित होते आणि आता राष्ट्रपतिंच्या अनुशासनाद्वारे बनलेल्या चीफ कमिश्नरों द्वारा शासित होते. यामध्ये अजमेर, भोपाल, बिलासपुर, कुर्ग, दिल्ली, हिमाचल त्रिपुरा, कछ, मणिपुर आणि विन्ध्य प्रदेश होते.

आणि शेवटी अंडमान निकोबार चे द्वीप होते जे लेफ्टिनेंट गवर्नर द्वारा शासित होते.

भाषावार प्रांतावर महात्मा गांधीचे विचार.

कांग्रेस ने आपल्या मैनिफेस्टो मध्ये घोषणा केली होती की स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर प्रान्तांचे गठन होणार. हि गोष्ट आहे सन 1917 सालची आणि याच वर्षी मद्रास प्रेसीडेंसी च्या नियमानुसार आंध्र वृत्त चे गठन झाले होते. कांग्रेस याद्वारे आपले संगठन मजबूत करू पाहत होती .या गोष्टी ला गांधीजींचे सुध्दा समर्थन होते.

नेहरू आणि पटेल यांचे विचार

आजादीच्या अगोदर जवाहरलाल नेहरु यांचे मत अशेच होते. परंतु देशाचे धर्माच्या आधारावर विभाजन झाले होते आणि दूसरे विभाजन जे कि भाषेच्या आधारावर होणार होते, त्यामुळे देश तोडला गेला असता. यामुळे नेहरुंनी स्थिरतेला महत्त्व दिले. सरदार पटेल यांचे मत सुध्दा हेच होते.

जून 1948 मध्ये पटेल यांच्या सांगण्यावरून राजेन्द प्रसाद यांनी प्रांतीय भाषा कमीशन चे गठन केले ज्यामध्ये रिटायर्ड जज (एसके डार), वकील आणि एक सेवानिवृत आईसीएस आॉफिसर होते . या कमीशन ला मुद्द्यावर मत मागितलेल्या गेले जे त्यांनी सहा महिन्यांत दिले .

बी. आर .अंबेडकर यांचे मत

अंबेडकरांनी डार कमीशन ला भाषेच्या आधारावर राज्य गठन करण्याला सहमती दर्शवली. त्यांनी ‘एक राज्य एक भाषा हा सिद्धांत ठेवला.’ अंबेडकर महाराष्ट्र चे गठन इच्छित ज्याची राजधानी मुंबई असावी.

महात्मा गांधीं

विशालांध्र साठी आंदोलन आणि नेहरूंचे दुर्लक्ष

भाषेवार राज्यनिर्मितीची मागणी वाढु लागली.याची मोठ्या प्रमाणावर मागणी तेलुगू भाषिकांकडुन होती. विशालअंध्र च्या मागणीसाठी सिताराम स्वामींच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू होते पण नेहरू ही मागणी मान्य करत नव्हते . त्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्येही कांग्रेसला याचा फटका बसला.

 

गांधीजींचे अनुयायी पोट्टी श्रीरामुलु यांचा सत्याग्रह..

नेहरूंच्या दुर्लक्षाने आंदोलन खुप च आक्रमक करण्यात आले.  19 अक्टूबर, 1952 ला गांधीचे अनन्य अनुयायी आणि सत्याग्रही पोट्टी श्रीरामुलु ने मद्रास मध्ये भूख हड़ताल चे ऐलान केले. पोट्टी श्रीरामुलु यांचे आंदोलन एक एक दिवस करत पुढे जात राहिले.

भूख हड़ताल च्या पन्नासाव्या दिवशी , म्हणजे सात डिसेंबरनंतर श्रीरामुलु यांची तब्येत लवकर बिघडत राहिली. आणि तिकडे राज्यसभेत हालचाली जोरात सुरू झाल्या. केंद्रातील तत्कालीन उपराष्ट्रपति, श्रममंत्री, वीवी गिरी यांनी त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाही.

10 डिसेंबरला हैदराबाद चे मुख्यमंत्री बी रामकृष्ण राव यांनी श्रीरामुलु ला भूख हड़ताल आणि मरणासन्न अवस्थेत देशातील परिस्थिती बिघडेल अशे सांगितले पण ते ऐकले नाहीत. शेवटी १५ डिसेंबरला तब्येत खराब होऊन त्यांचा मृत्यु झाला. यामुळे दक्षिण भारतातील वातावरण बिघडले. आंदोलन, दंगे, जाळपोळ सुरू झाला. यामुळे नेहरूंनी दोनच दिवसात आंध्रप्रदेला वेगळे राज्य बनवले.

शेवटी राज्य पुनर्गठन कमेटी बनवली गेली आणि एक अक्टूबर 1953 ला मद्रास राज्यातील म14 जिल्हे काढुन आंध्र प्रदेश बनवल्या गेले.नंतर अजुन काही जिल्हे यामध्ये जोडल्या गेले. नंतर कमिटीच्या सांगण्यावरुन आणि जनतेच्या भावनेवरुन महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली .शेवटी १९६६ मध्ये पंजाबलाही स्वतंत्र राज्य बनवण्यात आले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here