आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
एक असा देश ज्याचा धर्म तर इस्लाम आहे आणि संस्कृति आहे रामायण
मुस्लिम बहुल इंडोनेशिया मधील लोक फक्त चांगला माणुस होण्यासाठीच रामायण वाचत नाहीत तर याचे पात्र तेथील शिक्षण व्यवस्थेचे मुलभूत घटक आहेत.
काही वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. इंडोनेशिया चे शिक्षा आणि संस्कृति मंत्री अनीस बास्वेदन भारतात आले होते. या यात्रेच्या दरम्यान त्यांचे एक वाक्य खुप चर्चेत राहिले. अनीस यांनी म्हटलं होत ‘आमच रामायण दुनियामध्ये गाजलेल आहे. आमची इच्छा आहे की आमच्या कलाकारांनी भारतातील शहरांमध्ये कमीत कमी दोन वेळा यांचे प्रदर्शन करावे. आम्ही तर नियमीत पणे भारतामध्ये रामायण पर्वाचे आयोजन करू.
अनीस या बाबतीत तत्कालीन केंद्रीय संस्कृति मंत्री महेश शर्मा यांना भेटले. दोघांनी या प्रस्तावावर गंभीर चर्चा केली. यानंतर एका व्याखानामध्ये अंनिस यांचं असं म्हणत होत, ‘आम्ही हेही इच्छितो की भारतीय कलाकार इंडोनेशिया यावेत आणि तिथे त्यांनी रामायणाचे प्रदर्शन करावे. दोन्ही देशांच हे म्हणण आहे कि रामायणाच्या या आदान प्रदान मुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होतील आणि यामुळे पर्यटन सुध्दा वाढेल.
परंतु ही फक्त पर्यटन ची गोष्ट नाही. जर मुस्लिम लोकसंख्येचा दुनियातला सगळयात मोठा देश रामायणाचे प्रदर्शन भारतात करु ईच्छत असेल तर यामुळे वाढती धार्मिक असहिष्णुता कमी होईल.
90 टक्के मुस्लिम आबादी असणाऱ्या इंडोनेशिया वर रामायणाची मोठी छाप आहे. हिंदी चे प्रसिद्ध विद्वान फादर कामिल बुल्के यांनी 1982 मध्ये आपल्या एका लेखात लिहिले आहे, ‘35 वर्ष पहले माझ्या एका मित्राने ने जावा मधील एका गावात एका मुस्लिम शिक्षकाला रामायण शिकवताना पाहिले त्याला विचारले तुम्ही रामायण का शिकवता? तर त्याने उत्तर दिले चांगला मनुष्य होण्यासाठी आम्ही रामायण शिकतो.
खरतर रामकथा इंडोनेशिया च्या सांस्कृतिचा एक अभिन्न भाग आहे. खुप लोकांना हे बघुन हैराणी होते कि सगळ्यात जास्त मुस्लिम जनसंख्या असलेला देश रामायणासोबत जोडलेल्या संस्कृतीसोबत आपली ओळख जपतो. भारत दौऱ्यावर आलेल्या अनीस बास्वेदन यांचे म्हणने होते, ‘रामायण च्या चरित्रांचा वापर आम्ही शाळेतील मुलांना शिक्षण देण्यासाठी करतो.’
इतिहास सांगतो कि रामायणाचे इंडोनेशियाई संस्करण सातव्या सदीमध्ये जावा लिहील्या गेले. तेंव्हा इथे मेदांग राजवंश चे शासन होते. परंतु रामायण इंडोनेशियात येण्याच्या अगोदरच रामायणामध्ये इंडोनेशिया आला होता.
इंडोनेशियाई रामायण च्या भारतातील प्रदर्शनावर महेश शर्मा यांच म्हणन होत कि हा चांगला प्रस्ताव आहे. त्यांनी यावर पुढं जाण्याची बोलणीही केली. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी सांगितले ‘रामायण आणि रामलीला आमची विरासत आणि ओळख यांचे अभिन्न तत्व आहे.पण यावर अजुंन काही पाऊल उचलले नाही.
जेंव्हा भारतामध्ये धार्मिक असहिष्णुता पसरत आहे तेंव्हा अशा गोष्टी होण महत्त्वाच आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved
हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!
या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!