आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

१० वर्षांपूर्वी धोनीच्या त्या षटकाराने सचिनचे स्वप्न केले पूर्ण ..


जेव्हापासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून टीम इंडियाकडून खेळताना विश्वचषक जिंकण्याचे फक्त एकच स्वप्न त्याने पाहिले होते.  त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये खेळविण्यात आला होता, तो भारतात झाला.  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला, त्यासह सचिनचे कित्येक वर्षांचे स्वप्नसुद्धा पूर्ण झाले.

धोनी

अंतिम सामन्यात कर्णधार धोनीने तडाखेबाज नाबाद ९१ धावा केल्या आणि गगनचुंबी खणखणीत षटकार ठोकून भारताला विश्वचषक जिंकून दिला.  धोनीच्या त्या षटकाराचा अावाज दहा वर्षांनंतरही वानखेडे स्टेडियमवर ऐकायला मिळतो. आजही जेव्हा एखादा भारतीय क्रिकेट चाहता त्या षटकाराचा व्हिडिओ पाहतो तेव्हा अंगावर काटे उभारल्याशिवाय राहात नाही.

new google

 

दहा वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला. २७५ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने ३१ धावात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरी विकेट गमावली.  लसिथ मलिंगा प्रचंड गोलंदाजीत कहर करीत होता.  यानंतर गौतम गंभीरने विराट कोहलीसह भारतीय डाव हाताळला.

धोनी

त्या सामन्यात गंभीरने ९७ धावांची संस्मरणीय खेळी केली होती, तर विराटने ३५ धावांचे योगदान दिले. धोनी आणि युवराज सिंग नाबाद माघारी परतले. धोनीने ७९ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतक आणि कुमार संगकाराच्या ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या.  प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने ४८.२ षटकांत चार गडी गमावून २७७ धावा फटकावून ऐतिहासिक विजय नोंदविला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here