आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|

कार्लोस ब्रॅथवेटने सलग चार चेंडूत चार षटकार ठोकून वेस्ट इंडीजला बनविले दुसऱ्यांदा टी-२० चॅम्पियन

कार्लोस ब्रेथवेट नायक तर बेन स्टोक्स ठरला खलनायक,  इंग्लंडला हरवून वेस्ट इंडीज बनला दुसर्‍यांदा टी-२० चॅम्पियन


 

मुंबई : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अाठवणी क्रिकेट रसिकांच्या मनात आजही घर करून आहे.  इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकात झालेला अंतिम सामना क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेला आहे. ३ एप्रिल २०१६ साली झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते.

कार्लोस ब्रॅथवेट
कार्लोस ब्रॅथवेट

ज्याप्रमाणे २०११ च्या विश्वचषकात एम. एस. धोनीने अंतिम सामन्यात षटकार मारुन तो अमर केला होता. त्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज कार्लोस ब्रेथवेट याने वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सला चार चेंडूत ठोकलेले चार षटकार अजरामर झालेत. हे अाजरामर षटकार देखील क्रिकेट रसिक लक्षात ठेवतील. २०१६ डॅरेन सॅमी च्या नेतृत्वात खाली वेस्ट इंडीजचा संघ  दुसर्‍यांदा टी २० चॅम्पियन बनला होता. दोनवेळा एकदिवसीय आणि टी २० विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडीजचा संघ आज जगातला एकमेव संघ आहे.

new google

कोलकाताचे ईडन गार्डन मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.

नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीस आला आणि निर्धारित २० षटकांत ९ विकेट गमावून १५५ धावा केल्या. जो रुटने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. रूटशिवाय कोणताही इंग्लिश फलंदाज अर्धशतक ठेकू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या संघाला १५६ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या तीन षटकांत तीन गडी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इंग्लिश संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत होता. पण अनुभवी मार्लन सॅम्युअल्स याने हार न मानता खेळपट्टीवर तग धरून उभा होता. इंग्लिश गोलंदाजांचा एकहाती मुकाबला करत संघाची धावसंख्या १५ व्या षटकांपर्यंत ४ बाद  १०४ धावांवर नेऊन ठेवला.

वेस्ट इंडिज संघाला शेवटच्या पाच षटकांत ५२ धावांची गरज होती. मार्लन सॅम्युअल्सला आंद्रे रसेल चांगली साथ देत होता. अचानक सामन्यात एक मोठा ट्विस्ट आला. १६व्या षटकात वेस्ट इंडीजचे २ गडी बाद झाले. सामना इंग्लिश संघाकडे झुकू लागला. त्या वेळी धडाकेबाज फलंदाज कार्लोस ब्रेथवेट याने मैदानात एण्ट्री केली. सुरुवातीला त्याने संयतपणे फलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेला. जिथे त्यांना शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती.

इंग्लिश संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने मोठ्या विश्वासाने निर्णायक २०वे षटक टाकण्याची जबाबदारी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर दिली. आज ज्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते, त्यावेळी त्याच्याकडे अनुभव नव्हता. स्ट्राइक ब्रॅथवेटाजवळ होता. दोन्ही खेळाडूंना नायक होण्याची समान संधी होती. पहिला चेंडू, लेग स्टंपवरील हाफ व्हॉली, इंग्लंडला या स्वस्त बॉलचा फटका सहन करावा लागला.  आता स्टोक्सच्या चेहर्‍यावर दबाव दिसू लागला. दुसरा सिक्स त्याहूनही चांगला आहे. यावेळी कार्लोसने लाँग ऑन सिक्स मारला. पूर्ण ताकदीने मारलेल्या शॉटवर प्रेक्षकामध्ये अानंदाचे वातावरण पसरले.

कार्लोस ब्रेथवेट
कार्लोस ब्रेथवेट

आता तीन चेंडूंमध्ये विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. फलंदाजाने आपले काम इमाने इतबारे केले मात्र गोलंदाज चुकांवर चुका करत होता. ब्रॅथवेटने  सलग तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. ‘चॅम्पियन्स’ वेस्टइंडिजच्या संघाने डग आऊटमध्ये बसून डान्स सुरू केला. आता केवळ चमत्काराच इंग्लंडला वाचवू शकत होता. वेस्ट इंडीजला तीन चेंडूंमध्ये एक धावा काढायच्या होत्या. स्कोअर बरोबर झाला होता. दुसरा कोणताही संघ असता, तर त्यांनी आरामदायक एक धाव घेत सामना संपविला असता, परंतु वेस्ट इंडीज नेहमीच वेगळ्या, बेधडक अण बिनधास्त शैलीसाठी ओळखला जातो आणि त्यांनी केले तसेच.

प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये अत्यंत तणावपूर्ण सामन्यात वेस्ट इंडीजच्या सहा फुट चार इंच उंची असलेल्या कार्लोस ब्रेथवेट या खेळाडूने बाजी मारली. सलग चौथ्या चेंडूवर षटकार मारून वेस्ट इंडीजला दुसर्यांदा टी २० विश्वचषक जिंकून दिला. शेवटच्या षटकावेळी माजी खेळाडू इयान बिशॉप यांचे समालोचन देखील अंगावर काटे उभे करणारे होते. “कार्लोस ब्रेथवेट … हे नाव आठवणीत ठेवा! ही कामगिरी बर्‍याच काळासाठी लक्षात ठेवली जाईल,” असे उद्गार त्यावेळी त्यांनी काढले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here