आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पल्स कैंडीला तिच्या  चवीने बनवले लोकप्रिय..


 

नमस्कार मित्रांनो आज आपणजाणून घेणार आहोत पल्स कैंडीच्या यशाची कहाणी. एका १० बाय १० च्या खोलीतून सुरु झालेला हा पल्सचा प्रवास आज जगातील प्रसिद्ध कैंडी बनण्यापर्यंत येऊन टेकला आहे. आजच्या वेळेमध्ये कच्च्या  आंब्याच्या चवीवाली कैंडी म्हणुन ओळखले जाते. आजच्या वेळेला ही एवढी चवदार झाली की ज्याने ही एकदा खाल्ली तो हिच्या पासून दूर नाही राहू शकत . चला तर बघुया पल्स कैंडी ची गोष्ट .

पल्स कैंडी

new google

मांगो फ्लेवर पल्स कैंडीच्या सुरूवातीची गोष्ट .

पल्स कैंडीची सुरुवात भारतामध्ये २०१५ मध्ये डी.एस. ग्रुपने केली होती ज्याची नीव १९२९ मध्ये ठेवल्या गेली होती. या कंपनीचा जवळपास ८० हुन जास्त वर्ष भारतीय बाजारावर कब्जा आहे. या कंपनीचे तंम्बाकु, बाबा इलायची, माउथ फ्रेशनर यासारखे किती प्रोडक्ड बाजारात आलेत.

मागच्या काही वर्षांत भारतीय बाजारात अनेक नवीन ब्रैंड आले आहेत यामुळे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अशामध्ये कंपनी ने आपले नाव राखण्यासाठी कैंडीला एक नविन ब्रैंड बनवण्याचे ठरवले यासाठी त्यांनी रिसर्च सुरू केली. त्यामधून असे कळले की भारतीय लोकांना आंबे आणी कच्चे आंब्यांपासुन बनणाऱ्या गोष्टी जास्त आवडतात. त्यानंतर कंपनी ने कैंडीच्या सुरूवातीच्या भागाला आंब्याचा फ्लेवर आणि मधल्या भागात नमकिन पावडर घालून एक नवी चव देण्याचा प्रयत्न केला.

 पल्स कैंडीच्या भारतातील यशाची कहाणी .

 पल्स कैंडी

डी.एस. ग्रुपने मांगो फ्लेवर पल्स कैंडीच्या कंसेप्टचे काम वर्ष २०१३ मध्ये सुरू केले आणि पुर्ण दोन वर्षांनंतर भारतातील  गुजरात राज्य येथुन याला बाजारात उपलब्ध करण्यात आले. हि लोकांना एवढी आवडली कि पुर्ण भारतभर सप्लाय सुरू झाला. कंपनीने लगेच दुसऱ्या मॅन्युफॅक्चरींग युनिट सोबत करार केला कारण बाजाराची मागणी पुर्ण होत नव्हती. हळुहळु पल्स कैंडीचा स्वाद असा काही लोकांना रुचला की नंतर डब्बेच्या डब्बे लोक खरेदी करू लागले.

मांगो फ्लेवर पल्स कैंडीच्या अनोख्या प्रचाराची कहाणी .

डी.एस. ग्रुपने मांगो फ्लेवर पल्स कैंडीच्या प्रचारासाठी कोणतेही प्रमोशन केले नाही तर त्याची पैंकिंग अशी केली की या कैंडीला हिरव्या काळ्या रंगाच्या रैपर पेपर मध्ये गुंडाळले जेणेकरून ग्राहकांना ती आकर्षित करेल. हिचा स्वाद एवढा चांगला होता की लोकांनीच हिचा प्रचार केला. यासाठी लोकांनी व्हिडीओ, कॉमेडी, शॉर्ट फिल्म बनवल्या.

कच्च्या आंब्याची चव असणाऱ्या पल्स कैंडीचा आतापर्यंत चा प्रवास .

डी.एस. ग्रुप द्वारामांगो फ्लेवर पल्स कैंडीच्या सुरुवातीच्या नंतर हा प्रोडक्ट यशाच्या नवीन पायऱ्या चढू लागला. आपण याच गोष्टी वरून याचा अंदाज लाउ शकतो की कित्येक दुकानदार यांच्या मागणीमुळे किमतीपेक्षा जास्त पैशाला हिचे डब्बे विकत असत.

हिच्या डिमांड मुळे कित्येक नवीन नकली कैंडी बाजारात आल्या पण हिच्या चवीमुळे हिची मागणी टिकुन राहिली. आकड्यांनुसार याचे प्रोडक्शन २०१६ ला प्रतिमहिना १२०० ते १३०० टन होते. कंपनीने हिचे खुप फ्लेवर लॉंच केले आहेत. आज १ रुपये ला विकणारी कैंडीचा टर्न ओवर ३०० करोड आहे. हिचा जुनी टैग लाईन ‘प्राण जाये पर कैंडी न जाये’ आजही लोकांच्या डोक्यात आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here