आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|

 

५ हजार रूपयांपासुन ब्लाऊज शीलाईचे काम करणाऱ्या रंजना कुलशेट्टी यांची कहाणी.


 

आज आपण बघणार आहोत ५ हजार रूपयांपासुन ब्लाऊज शीलाईचे काम करणाऱ्या रंजना कुलशेट्टी यांची कहाणी ज्या आज दुसऱ्या महिलांना सशक्त बनवत आहे. चला तर बघुया त्यांची कहाणी विस्तारीतपणे.

रंजना कुलशेट्टी

new google

रंजना कुलशेट्टी यांच्या प्रारंभिक आणि खाजगी जिवनाविषयी माहीती.

रंजना कुलशेट्टी पुण्याच्या देहरिगाओ गावाची राहणारी आहे. ज्यांनी आतापर्यंतचे बहुतांश जिवन कोणत्याही उत्पन्नाशिवाय काढले. वर्ष १९९७ मध्ये त्यांनी आपल्या पतिवरील अर्थिक ताण कमी करण्यासाठी शिलाई करण्याच्या आपल्या आवडीकडे लक्ष केंद्रित केले. डिझायनिंग आणि शिलाई मधील कोर्स करायचे ठरवले पण यासाठी पैसे नव्हते. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिक कारोबारी महिला यांच्या मदतीने चॉकलेट रैपर वर स्टिकर लावण्याचे काम केले यासाठी त्यांना प्रतिकिलो २ रूपये मिळत, यामधुन त्यांनी ५०० रुपये कमावले आणि आपला कोर्स पूर्ण केला .

रंजना कुलशेट्टी यांच्या स्वताचा व्यवसाय सुरू करण्याची गोष्ट.

रंजना कुलशेट्टी यांनी स्वताचा व्यवसाय सुरू करण्या अगोदर पुण्याच्या वारजे गावातील एका दर्जी कडे काम केले जिथे त्यांना एका ब्लाऊज साठी १.५ रूपये मिळत . इथे पुर्ण एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी वर्ष १९९९ मध्ये ५००० रुपये गुंतवणुक , एक शिलाईमशीन आणि २५ रुपये चे ब्लाऊज यासोबत स्वताचा व्यवसाय सुरू केला .

रंजना कुलशेट्टी यांच्या स्वताचा व्यवसाय सुरू करण्यापासून आतापर्यंत चा प्रवास .

रंजना कुलशेट्टी यांनी स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार ही धोक्या पेक्षा कमी नव्हते. पहले तर ती त्या समाजातुन येत होती जिथै पति कामकाज करणाऱ्या महिलांना आजीबात भाव देत नाहीत. सुरुवातीला त्यांचे पती त्यांना शिलाई मशीन सोबत घराच्या बाहेर काढून देत. इकडुनतिकडुन प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वताचा व्यवसाय सुरू केला. पैसे कमी पडल्यामुळे त्यांनी १३०० रुपये हफ्त्याने २०००० रुपयांचे कर्ज काढले.

यानंतर त्यांनी मागच्या काही वर्षांत व्यावसायिक रणनिती, लक्ष योजना, डिजीटल मार्केटिंग यांचे प्रशिक्षण घेतले ज्यामुळे त्याचा व्यवसाय जोरात सुरू झाला.

रंजना कुलशेट्टी

आज ती पुर्ण ८ शिलाई मशीनची मालक आहे आणि तिने ३ महिलांची टिम बनवली आहे. आज दर महिन्याला २५० ब्लाऊज च्या विक्रीशिवाय कपडे, मास्क, लैपटॉप बैग, प्लांट होल्डर्स सारखे उत्पाद महाराष्ट्रात विकतात. याशिवाय मन देशीच्या साथीनं आंतरराष्ट्रीय निर्यात सुरू केली.

सध्या कोरोना वायरसच्या काळात त्यांच्या व्यवसायावर सुध्दा परिणाम झाला पण त्यांनी ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत असे ८०,००० मास्क विकले. अशातच रंजना आणि त्यांच्या टिमने ५०० ज्युट प्लांट धारकांची निर्यात ऑर्डर पुर्ण केली.
आपल्या जिवनात एवढे चढ उतार बघुन सुद्धा रंजना कुलशेट्टी यांनी  एक चांगली व्यवसायिक म्हणुन स्वताला सिध्द केले. आणि हेही सिद्ध केले की महिला पुरूषांपेक्षा कुठेही कमी नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here