आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रिक्षाचालक बनले यशस्वी उद्योजक

आपल्या अवतीभोवती अनेक यशस्वी लोक राहतात. आपण त्यांना पाहतो. त्यांची यशोगाथा आपल्याला नक्कीच प्रेरणा देत असते. जगण्याची वेगळी दृष्टी देते. अशीच एक कहाणी आहे सोलापुरातील युवा उद्योजकांची. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही जिद्द अन् कष्टाच्या जोरावर एक रिक्षाचालक यशस्वी उद्योजक बनला आहे. सोलापूरच्या अस्सल मातीतून गरूड भरारी घेणाऱ्या गोपाळ बसुदे या तरुण उद्योजकाची ही यशोगाथा.

रिक्षाचालक

गोपाळ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे बालपण कष्टात गेले. शिक्षणात त्यांना विशेष अभिरुची नव्हती. अभ्यासात मन रमेना, त्यामुळे लहान वयातच त्यांची शाळा सुटली.  आठवीपर्यंतच ज्ञान घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. त्यांना टेलरिंगच्या कामांमध्ये विशेष आवड होती. टेलरिंगचे काम करत करत आठवी शिक्षणाच्या जोरावर एका खासगी महाविद्यालयात ते शिपाई पदी रुजू झाले, पण तुटपुंज्या पगारावर त्यांचे भागेनासे झाले. शिपायाच्या नोकरीला त्यांनी सोडचिठ्ठी दिली. पैशांची जमवा जवमा करून त्यांनी एक रिक्षा घेतली. दिवसभर रिक्षा आणि रात्री टेलरिंगचे ते काम करू लागले.

अविरत कष्ट करूनही त्यांच्या पाठीमागील विघ्न सुटता सुटत नव्हते. यातच एक अशी घटना घडली जी गोपाळ यांच्या आयुष्याला वेगळी वळण देणारी ठरली. त्यांच्याकडे रिक्षाचा परवाना नसल्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ती रिक्षा जप्त केली. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आ वासून पुढे उभा राहिला. यादरम्यान वर्तमानपत्रात छापून आलेली एका यशस्वी उद्योजकाची कहाणी त्यांच्या वाचनात आली. त्यानंतर त्यांनी आपणही एक उद्योजक व्हायचे एक स्वप्न बाळगले.

रिक्षाचालक

पुढे गोपाळ केंट या कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करू लागले. ते काम करत असतानाच त्यांना उद्योजक बनण्याचे स्वप्न खुणावत होते.  त्यासाठी त्यांनी वाटचाल सुरू केली. कुठलंही आर्थिक पाठबळ त्यावेळेस त्यांच्याकडे नव्हते. मित्रांचे प्रोत्साहन आणि बँकेकडून काढलेली कर्जे यामुळे त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली.

गोपाळ यांनी २०११ साली जीनियस हेल्थ प्लस नावाची कंपनी स्थापन करून पाणी शुद्ध करणाऱ्या  प्युरिफायर मशीनचे उत्पादन ते घेऊ लागले. याच कंपनीमध्ये आज ते लाखोंची उलाढाल करताहेत. त्यांच्या 7 शाखा सोलापुरात कार्यरत आहेत. गोपाळ यांच्या कंपनीमुळे आज पस्तीस लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. सोलापूरच्या साखर पेठेत भाड्याच्या घरात राहून सुरू झालेला हा प्रवास आज एक नवा ब्रँड बनून बाजारपेठेत स्वतःच्या भक्कम पायावर उभा आहे. अनेक अडचणींना लिलया पार करत आपला उद्योग उभारला त्यांची ही गोष्ट प्रत्येक नवोद्योजकाला प्रेरणा देणारी आहे.

अविरत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर माझे उद्योजक होण्याचे स्वप्न मी पूर्ण केलो. मित्र अन माझ्या घरातील लोकांच्या पाठिंब्यामुळे हे सारं शक्य झाले. तरुण मित्रांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता उद्योगाकडे वळावे. नोकरीपेक्षा उद्योगात मोठे समाधान मला वाटते. असं तरुण उद्योजक गोपाळ बसुदे सांगतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here