आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|

दहावीत काठावर पास होऊनही ३० वेळा ‘सेट-नेट’ परीक्षा उत्तीर्ण सेट नेट परीक्षा मधले ‘विक्रमवीर’


 

अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर  तोळणूर गाव. वडील शेतमजूर आणि आई गृहिणी. निरक्षर कुटुंबात जन्म. शिक्षणाचा फारसा वारसा नसताना आणि इंग्रजीला दहावीत ३६ तर बारावीत ३७ गुण मिळवून काटावर पास. असे असतानाही ध्यास घेऊन २४ राज्यांच्या २६ वेळा सेट, ३ नेट आणि ६ टीईटी परीक्षा पास होण्याचा विक्रम केला आहे ३८ वर्षीय धानय्या गुरुलिंगय्या कवटगीमठ यांनी.

सेट-नेट

तोळणूर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत सातवी तर सिद्धेश्वर प्रशालेत दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण अक्कलकोटच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयात बी.ए. वर्ग २ तर तिसरे वर्षं दय‍ानंद महाविद्यालयातून पदवी घेतली तर बी. एड. महात्मा फुले अकलूज येथे केल्यानंतर २००८ साली अक्कलकोटच्या मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. येथे ते कन्नड भाषेतून भूगोल- इतिहास त्याचबरोबर इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. शिक्षक म्हणून काम करत असताना एम.ए.ची पदवी सोलापूर विद्यापीठातून पूर्ण केली.

new google

 

याच दरम्यान त्यांची  सांगली येथील आटपाडी येथील प्रकाश स्वामी या प्राथमिक शिक्षकांची भेट झाली. मुळचे गळुरगी गावचे असलेले स्वामी नुकतेच सेट पास झाले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत सेट परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. यापूर्वी मिळालेले सारे अपयश भरून काढण्यासाठी शाळेत विद्यार्थांना शिकवत सेटनेट ची तयारी सुरुवात केली. सकाळी ३ तास आणि संध्याकाळी ४ तास अभ्यास करून जिद्दीने अभ्यास केला. यात हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क वर भर दिला.

 

२०१२ साली महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची तयारीला सुरुवात केली. मात्र सुरुवात अपयशाने झाली. यशाने दोन वर्षं हुलकावणी दिली. याच दरम्यान त्यांनी आपल्या अभ्यासाची तयारी किती झाली आहे हे जाणून घेण्यासाठी केरळ राज्याची सेट परीक्षा दिली.  त्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी इतर राज्यांच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. २०१५ साली ३५० पैकी २७० गुण मिळवत महाराष्ट्राच्या सेट परीक्षेत ओबीसीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.

सेट-नेट

आपल्या विषयातील खोलवर ज्ञान मिळविण्यासाठी अाणि इंग्रजी लिटरेचर मध्ये प्रत्येक राज्यात काय वेगळेपण असते हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इतर राज्यांच्या सेट परीक्षा देण्याचाही पायंडा सुरू केला. ज्या-ज्या राज्यात परीक्षा देण्यास गेले तिथल्या मुख्य विद्यापीठाला भेट देऊन ३७ विषयांचा अभ्यासक्रम गोळा केला. देशातल्या १४ मुक्त विद्यापीठ आणि ५० केंद्रीय विद्यापीठांना भेट दिली. हे सारे करत असताना कर्जाचा डोंगर डोक्यावर ती उभारला. त्याचा फारसा विचार न करता ते अभ्यास करू लागले.

सेट परीक्षा पास व्हायचे या ध्येयाने पेटलेल्या धानय्या यांनी केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम तर पूर्वोत्तर भारतातील सात राज्यांची मिळून गुवाहाटी विद्यापीठ परीक्षा घेते. त्यात ते दोनवेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत.

असे एकूण २६ सेट, ३ नेट आणि केंद्र आणि राज्य मिळून ६ टीईटी परीक्षा पास होण्याचा विक्रम केला.

त्यांचा हा विश्वविक्रम साता समुद्रापार पोहोचला. त्यांच्या स्तुतीचा डंका परदेशातही वाजू लागला. त्यांचे यश पाहून जगाने देखील पाठ थोपटायला सुरुवात केली. इंग्लंडमधील वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी ऑफ लंडन यांनी धानय्या यांना मानद डॉक्टरेट देण्यासाठी नाव निर्देशांक केले आहेत. आयत्या मिळालेल्या डॉक्टरेटवर समाधान न मानता पुन्हा ते सोलापूर विद्यापीठातून सुधा मूर्तींचे साहित्य चरित्र या विषयावर डॉ. प्रा. तानाजी कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएच. डी. केली.  ब्रिटिश कौन्सिल, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, प्राथमिक शिक्षा अभियान द्वारे धानय्य यांनी रिसोर्स पर्सन म्हणून कामही करीत आहेत.

आपल्या सारखे यश इतरांनाही मिळावे यासाठी पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ वडोदरा विद्यापीठ गुजरात विद्यापीठ पेरियर विद्यापीठ उस्मानिया विद्यापीठ गुलबर्गा विद्यापीठ, धारवड विद्यापीठ, जेएनयू विद्यापीठ दिल्ली येथे जाऊन विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला. धानय्या यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत ४० विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. इंग्रजी विषयासह इतर विषयातील देशभरातले विद्यार्थी त्यांच्याकडे आज मार्गदर्शनासाठी येत आहेत.

सेट-नेट

वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक इंग्लंड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम अमेरिका, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड हॉंगकॉंग, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आस्ट्रेलिया तसेच  लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी नाम निर्देशन झाले आहेत. नेट सेट परीक्षा मध्ये जागतिक विक्रम केल्यामुळे युजीसी विद्यपीठं अनुदान आयोग नई दिल्ली चे उपाध्यक्ष डॉ भूषण कुमार पटवर्धन  यांनी धानय्या याना दिल्ली येथील युजीसी( युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन ) सत्कार केले.

 

तसेच धानय्या यांनी त्याचं अनुभव इतरांना व्हावे या उद्देशाने आता पर्यंत नऊ नेट सेट पुस्तक लिहिले त्यात चार प्रकाशित झाले आहेत. नुकताच झालेल्या केरळ सेट परीक्षेत76 प्रश्न, आंध्र प्रदेश सेट परीक्षेत66 प्रश्न, महाराष्ट्र सेट परीक्षेत58 प्रश्न व कर्नाटक प्राध्यापक भरती परीक्षेत 93 प्रश्न धानय्या लिखित पुस्तकातून आले आहेत. त्यामुळे याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहेत.

 

या बरोबरच एनबीटी नॅशनल बुक ट्रस्ट चे पुस्तके, इंडिया इयर बुक, कुरुक्षेत्र मॅगझीन, योजना मॅगझीन तसेच एम्प्लॉयमेंट न्युज पेपर आणि पब्लिकेशन डिव्हीसन भारत सरकार हे सर्व  पुस्तक, मॅगझीन, पेपर वाचल्यास परीक्षेत यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच सेट नेट परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थांना नाकीनऊ येते तर दुसरीकडे धानय्या यांना सेट परीक्षा पास होणे हा डाव्या हाताचा खेळ झाला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here