आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|

===

छत्तीसगढ मधील 24 जवान शहीद झालेल्या हल्ल्याची जिम्मेदारी या नक्षलवाद्याने घेतलीय..


 

सुकमा आणि बिजापूरच्या सीमेवर झालेल्या नक्षलवादी आणि भारतीय जवनांच्या चकमकित 24 जवान शहीद झाले आहेत तर 31 भारतीय जवान गंभीर जखमी झाले आहेत. आणि आणखी काही जवानांचा शोध घेणे सुरु आहे.

या हल्ल्याचा मास्टरमाईंड ज्याच्यावर 25लाख इनाम असलेला नक्षलवादी नक्षल कमाडरं हिडमा असल्याच म्हटलं जातंय. हिडमानेच षडयंत रचून या कामाला अंजाम दिलाय. कमांडर हिडमा चकमकीच्यावेळी जवळपास 250 नक्षलवादयाचे नेतृत्व करत होता. जाणून घेऊया नक्की कोन आहे नक्षलवादी कमांडर हिडमा..

छत्तीसगढया नक्षली कमांडरचे पूर्ण नाव माडवी हिडमा असे आहे.जो संतोष उर्फ पोडीयल भीमा नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. सरकारकडून त्याच्यावर 25लाख रुपयाचं रोख बक्षिस जाहीर केले गेले होते. गेल्या 13 वर्षांमध्ये हिडमाने अनेक अपराध केले सून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हिडमाचे नाव छत्तीसगढच्या नक्षलवादयामध्ये सर्वांत खतरनाक टॉप कमांडर म्हणून येते.

आधुनिक हत्यारांनी भरलेली आहे त्याची टीम..

सुकमा आणि बैजापूर या भागालाआपला गड बनवलेला हिडमा या भागातूनच आपल्या नक्षली कारवाया करत असतो. या भागात जेवढेही नक्षली हल्ले झालेत त्यामागे हिडमाचा सहभाग होता. त्याच्या टीमजवळ सर्व प्रकारची आधुनिक शश्त्रे आहेत. ज्यात युबीजीएल,रॉकेटलॉंचर,एके 47चा समावेश आहे.

छत्तीसगढ

20 वर्षांपासून शाळा बंद केल्यात.

हिडमा एवढा क्रूर आहे की त्याने या भागामध्ये गेल्या 20 वर्षांपासून एकही शाळा चालू करु दिली नाहीये. दुर्गम पहाड आणि जंगलाच्या मधोमध असलेल्या या गावामध्ये आजपर्यंत पोलीस सुद्धा पोहचू शकले नाहीत. त्याच्या भीतीने एकही शिक्षक आपली बदली करून त्या भागात यायला तयार नाहीत त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून येथील शाळा बंदच आहेत. या भागात हिडमाचीच हुकूमत चालते.

40 वय असलेला हीडमा दहावीपर्यंत शिकलेला असला तरीसुद्धा फाडफाड इंग्लिश बोलतो असं म्हटलं जात.शिवाय तो आपल्या सोबत स्मार्टफोन आणि एक डायरी कायम ठेवतो ज्यात त्यांचे टार्गेट आणि शेड्युल लिहुन ठेवलेले असते. गेल्या वर्षी सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात हिडमानेच 17 जवानांचा जीव घेतला होता. तसेच 2019 साली आमदार भीमा माडवी,त्यांचा ड्रायवर आणि 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुद्धा हिडमाच्या सहकार्यानी त्याच्या सांगण्यावरून मारले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here