आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

विराट सेना यंदा आयपीएलचं जेतेपद जिंकणार का? जाणून घ्या संघाची कमजोरी आणि ताकद


मुंआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक अव्वल खेळाडू संघात असूनही विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघ आतापर्यंत अायपीएलचे विजेतेपद जिंकू शकला नाही. यंदा काही नवीन खेळाडूंना संघात घेऊन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जेतेपद मिळविण्यासाठी संघाचा प्रयत्न असेल.

आयपीएल

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात एबी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज फलंदाज आहेत, परंतु या दोघांवर जास्त अवलंबून असल्याने संघ कधीही संतुलन साधू शकला नाही. आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जॅमीसन यासारख्या खेळाडूंच्या समावेशामुळे संघ समतोल स्थितीत दिसत आहे. आयपीएल 2021 विराट संघ किती शक्तिशाली आहे जो त्याला विजयी ठरवू शकतो तसेच संघात कोणत्या कमतरता आहेत हे जाणून घेऊया.

आरसीबीने गतवर्षी युएईमध्ये चांगली सुरुवात केली होती, पण शेवटच्या टप्प्यात त्यांची लय बिघडली आणि सलग पाच सामने गमावल्यानंतर एलिमिनेटरमध्ये संघ बाद झाला. यावेळी संघ व्यवस्थापनाने लिलावापूर्वी 10 खेळाडूंना रिलीज केले. आपली फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत करण्यावर भर दिला आहे. आरसीबीची फलंदाजी खूप मजबूत दिसतेय. आयपीएलमध्ये रन मशीन कोहलीचा शानदार विक्रम आहे. तो डावाची सुरूवात करणार असल्याचे कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे.

त्याच्याबरोबर दुसर्‍या टोकाला देवदत्त पडिक्कल देखील असेल ज्याने गेल्या मोसमात शानदार प्रदर्शन केले होते आणि अजूनही तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टॉप ऑर्डरमध्ये युवा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन आणि न्यूझीलंडचा फिन एेलन वेगवान धावा करण्यास सक्षम आहेत तर डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलसारखे अनुभवी खेळाडू मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. सचिन बेबी, डॅनियल ख्रिश्चन आणि वॉशिंग्टन सुंदर चांगली फलंदाजी करु शकतात.

आयपीएल

न्यूझीलंडचा काइल जॅमीसन संघात आल्यानंतरही आरसीबीचा वेगवान गोलंदाजी विभाग कमकुवत दिसत आहे. नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांना पांढर्‍या चेंडूने गोलंदाजी करण्याचा कमी अनुभव आहे आणि बर्‍याचदा ते जास्त धावा देतात. जॅमीसनने टी -२० मध्येही अजूनही संघर्ष करतोय. तसेच त्याला भारतात खेळण्याचा अनुभव नाही. हर्षल पटेल आणि ऑस्ट्रेलियन त्रिकूट ख्रिश्चन, डॅनियल सायम्स आणि केन रिचर्डसन हे वेगवान गोलंदाजी विभागात इतर पर्याय आहेत. फिरकी विभागाविषयी बोलायचे झाले तर आरसीबीला चेन्नई आणि अहमदाबादच्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर बहुतेक सामने खेळावे लागणार आ हे आणि अशावेळी आयपीएलमध्ये नेहमीच यशस्वी ठरलेला युजवेंद्र चहल त्याच्यासाठी ट्रम्प कार्ड ठरु शकतो.

आरसीबीचा संघ :

विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, देवदत्त पडीक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलेन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, एडम जॅम्पा, काइल जॅमीसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटिदार, सचिन बेबी, मोहम्मद अजहरुद्दीन, डॅनियल क्रिश्चियन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here