आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सफाई कामगाराचा मुलगा न्यायाधीश, पहिल्याच प्रयत्नात कुणाल यांची गरुडझेप


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे. लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे स्वप्न उराशी त्यांनी बाळगले होते, आज ते स्वप्न साकार झाले.

न्यायाधीश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी रात्री घोषित केला. यात कुणाल वाघमारे २०० पैकी  १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश (क)स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र कौतुक कौतुकाचा वर्षाव होत आहे.

new google

कुणाल हे रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा या सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलाने देखील आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले.

कुणाल यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक २१ आणि शाळा क्रमांक २ तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून पूर्ण केले. भाई चन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून एमएसडब्ल्यू ची पदवी घेतली. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून सन २०१४ एल.एल.बी. उत्तीर्ण होत सोलापूर विद्यापीठातून प्रथम येऊन येण्याचा मान मिळवला. २०१६ साली एल.एल.एम. पूर्ण करत सोलापूर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ साली दिवाणी न्यायाधीश(क) स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली. यासाठी ७ एप्रिल  २०१९ ला पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला तर ६ डिसेंबरला मुलाखत झाली. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर कुणाल यांनी आपले ध्येय गाठण्यात यश मिळवले.

न्यायाधीश

न्यायाधीशांना मिळणारा मानसन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठित हुद्द्यामुळेच बालपणापासूनच कुणाल यांना न्यायाधीश व्हायची प्रबळ इच्छा होती आणि अखेर ते साकारही झाले. या यशाबद्दल रमाकांत नडगेरी ,अशोक शिवशरण , अनीरुध्द वाघमारे ,धर्मराज हदिमणी, अनिल गायकवाड,रतन बनसोडे यांनी अभिनंदन केले.

 

स्वप्न पाहण्यासाठी कमी पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून लहानपणापासून न्यायाधीश होण्याची मी स्वप्न पाहत होतो. रोज ७-८ तास अभ्यास घरीच करायचो. संघर्षाशिवाय यश कधीचि मिळत नसते. अाज यशाचा दरवाजा उघडला. स्वप्न पाहण्यासाठी कमी वेळ आणि पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला. माझ्या यशात आई-वडील, ४ बहिणी आणि पत्नीचे खूप मोठे योगदान अाहे. योग्य तो न्यायदान करण्याचा प्रयत्न मी करीन. अस मत अॅड. कुणाल वाघमारे यांनी व्यक्त केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here