आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|
===
आयपीएलमध्ये न खेळता श्रेयस अय्यरला मिळणार ७ कोटीची सॅलरी; जाणून घ्या काय आहे कारण?
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2021 च्या संपूर्ण हंगामापासून दूर झाला आहे. असे असूनही, दिल्ली कॅपिटल्स त्यांचे संपूर्ण वेतन म्हणजे 7 कोटी अय्यर याला देईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात फील्डिंग दरम्यान अय्यर जखमी झाला होता. यानंतर त्याला या मालिकेतून वगळण्यात आले.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया 8 एप्रिल रोजी केली जाईल. यामुळे वेळेवर तंदुरुस्त न झाल्यामुळे तो संपूर्ण हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकणार नाही.
श्रेयस अय्यर याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विमा पॉलिसीनुसार पूर्ण वेतन मिळेल. २०११ मध्ये लागू करण्यात आलेल्या या धोरणात असे म्हटले आहे की, दुखापत किंवा अपघात झाला असेल तर आयपीएलच्या हंगामात सर्व करार झालेल्या खेळाडूंना संपूर्ण मोबदला देण्यात येईल.
या व्यतिरिक्त, तो खेळाडू या योजनेस पात्र असेल, जो राष्ट्रीय कर्तव्य बजावताना जखमी झाला किंवा त्याच्याबरोबर एखादा अपघात झाल्यास. खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्ध जेव्हा त्याला संघाबाहेत केले गेले तेव्हा अय्यर भारतीय संघाचा एक भाग होता. ही योजना करार नसलेल्या खेळाडूंसाठी नाही.
अय्यर हा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये ७९ सामने खेळले आहेत. त्याने दिल्लीसाठी हे सर्व सामने खेळले आहेत. यात २२०० धावा केल्या आहेत. २०२० साली युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत
२६ वर्षीय अय्यरने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सर्वाधिक धावा केल्या. अय्यरने मागील हंगामात ५१९ धावा केल्या होत्या. या व्यतिरिक्त संघाने त्याच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठली. यंदा त्याच्या जागी रिषभ पंत याच्याकडे या हंगामासाठी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स आपला पहिला सामना १० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved