आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

तसे तर भारताच्या इतिहासामध्ये अनेक मराठा सरदारांचे पराक्रमाचे किस्से ऐकायला मिळतात.

पण आज आम्ही तुम्हाला एक अशा मराठा सरदाराची कहानी सांगणार आहोत ज्याने आपल्या पराक्रमाने फर्श पासून अर्श पर्यंतचा प्रवास केला.

कोणत्याही सैनिकाच्या घरी जन्म न घेता आपल्या साहसाच्या बळावर एका नवीन राजवंशाची स्थापना केली. परंतु या माणसानं पाठीवर युध्दाचे मैदान सोडून पळण्यासारखी घटना घडली.

new google

 मल्हारराव होळकर

मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी महाराष्ट्राच्या बाहेर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

मल्हारराव होळकर यांचा जन्म पुण्यातील चोल गावात एका गुराख्याच्या घरी १६ मार्च १६९३ मध्ये झाला. मोठे झाल्यावर ते १७२१ मध्ये बाजीराव पेशवा यांच्या सैन्यात भरती झाले. इथे आपल्या साहस आणि पराक्रमाने पेशव्यांचे विश्वासु झाले आणि यशाच्या नवनवीन पायऱ्या चढू लागले.

त्यांना ५०० सैनिकांचे नेतृत्व सोपवण्यात आले. १७२८ मधील हैदराबादच्या निजामांसोबतच्या लढाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी एकापाठोपाठ एक अशा अनेक युध्दांमध्ये महत्त्वपुर्ण भुमिका बजावल्या. १७३७ मध्ये दिल्लीची लढाई , १७३८ मध्ये भोपाळच्या निजामांसोबत लढाई. एवढंच नाहीतर मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी पोर्तुगीजांशी लढाई जिंकली.

१७४८ मध्ये मराठा सरदार मल्हारराव होळकर यांची स्थिती मालवा इंदोर मध्ये मजबूत झाली होती यामुळे येथिल रियासत त्याच्या नावे करणात आली.त्यानंतर त्यांनी मालवा होळकर साम्राज्याची स्थापना केली.

मल्हारराव होळकर

इतिहासातील कित्येक लढायांमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या मल्हारराव होळकर यांच्या नावे पानिपत चे तिसरे युध्द सोडुन पळण्याचा गुन्हा आहे. परंतु खुप इतिहासकार या गोष्टी ला मानत नाहीत. त्यांच्या मते मल्हारराव होळकर यांनी अहमदशाह अब्दालीच्या सैन्यासोबत घनघोर लढाई केली होती.

 

जेंव्हा युध्दात विश्वासराव पेशवे यांचा मृत्यु झाला आणि मराठ्यांची हार होणार हे निश्चित झाले तेंव्हा मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ यांनी मराठा सरदार मल्हारराव होळकर यांना बोलावून त्यांना आग्रह केला कि त्यांनी त्यांची पत्नी पार्वतीबाईला सुरक्षित ठिकाणी पोहचावे.

मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या आज्ञेच पालन केल आणि पार्वतीबाईंना सुरक्षित ठिकाणी पोहचवले.
हि घटना मल्हारराव होळकर यांच्या  जिवनातील सगळ्यात मोठा कलंक ठरली. आणि लोकांनी मल्हारराव युध्द सोडुन पळाले म्हणायला सुरुवात केली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here