आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
जगामध्ये खूप मोठे ठग होऊन गेलेले आहे ज्यांचे कारनामे ऐकुनच लोक दांतांखाली बोट घालतात. असाच एक ठग भारतामध्येही होता. या ठगास नटवरलाल या नावाने ओळखल्या जात असे. तसे नटवरलाल यांचे खरे नाव मिथीलेश कुमार श्रिवास्तव होते. या ठगाने आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी सेक्स वर्करला सुध्दा सोडले नाही.
त्याने वेश्यांचे सुध्दा पैसे, दागिने लुटले. या ठगाने ३ वेळेस ताजमहल, २ वेळा लाल किल्ला आणि १ वेळा राष्ट्रपती भवन विकले होते. नटवरलाल असा चालाख ठग होता ज्याने वकिलीचे शिक्षण घेऊन ठगणे हा पेशा निवडला होता.
सगळ्यात मोठ्या ठगाची हैराण करणारी कहाणी..
भारतातील या सगळ्यात मोठ्या ठगाचे नाव मिथीलेश कुमार श्रिवास्तव होते. मिथीलेशचा जन्म बिहार मधील सिवान च्या बंगरा गावामध्ये झाला होता.मिथीलेश एका संप्पन्न परिवारातील होता. अभ्यासामध्ये नटवरलाल जास्त हुशार नव्हता त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास झाला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला खूप मारले. त्यामुळे नाराज नटवरलाल घरुन पळून कोलकत्ता येथे गेला. तेंव्हा त्याच्याकडे फक्त पाच रुपये होत . येथे आल्यावर त्याने ठगण्याचे काम सुरू केले.
ताजमहला पासून संसदभवन सुध्दा विकले.
सत्तर ते ऐंशी च्या दशकांमध्ये नटवरलाल यांचे ठगण्याचे काम शिगेला पोहोचले होते. त्याने लुटीच्या अशा काही घटनांना अंजाम दिला कि तो सगळ्यात मोठा ठग बनला.
या ठगाने ३ वेळेस ताजमहल, २ वेळा लाल किल्ला आणि १ वेळा राष्ट्रपती भवन विकले होते.
एवढंच नाही तर याने संसदभवन सुध्दा विकले होते. याने राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ताक्षराची नकल केली होती. तो टाटा , बिरला सारख्या नामवंत उद्योगपतींना ठगुन बसला होता.
नटवरलालला झाली होती ११३ वर्षांची शिक्षा .
शातिर ठग नटवरलाल याच्या विरुद्ध ८ राज्यांत १०० पेक्षा जास्त मामले दाखल होते. अस नाही की नटवरलाल कधी गिरफ्तार नाही झाला. त्याला ९ वेळा पकडण्यात आले पण प्रत्त्येक वेळी तो पळून जात असे. कोर्टाने नटवरलाल ला ११३ वर्षांची सजा दिली होती. शेवटच्या वेळी नटवरलाल पोलिसांना सापडला तेंव्हा त्याचे वय ८४ वर्ष होते. परंतू २४ जुन १९९६ मध्ये त्याने बिमार असण्याचे नाटक केले आणि तो एम्सला निघाला. यामध्ये पुन्हा एकदा नटवरलालने पोलिसांना धोका दिला आणि तो फरार झाला. त्यानंतर तो कोठे गेला आजपर्यंत कुणाला माहीत नाही.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला होता हा भारतीय जवान!