आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या व्यक्तीला जेलमधून सोडवण्यासाठी नेहरू आणि जेठमलानी पहिल्यांदाच एकत्र आले होते…!


 

भारताच्या इतिहासामध्ये असे उदाहरण कमीच बघायला मिळेल जेंव्हा प्रधानमंत्री नेहरूंपासून राज्यपाल विजयालक्ष्मी पंडीत आणि अभियोजन पक्षाचे वकिल राम जेठमलानी सुध्दा बचाव पक्षातील दोषीला वाचवण्यासाठी एकत्र झाले. देशामध्ये एक असा हत्याकांड झाला ज्याने देशाला हालवून ठेवले.

 

new google

नेहरू
यामध्ये नौसेना कमांडर कवास मानेकशाॅ नानावती ने त्याचा पारिवारीक मित्र आणि त्याच्या पत्नीचा प्रेमी आहूजाची गोळी मारुन हत्या केली. मानेकशॉ नानावती पारसी होता तर आहूजा सिंधी.

मानेकशॉ नानावतीची पत्नी सिल्वीया ब्रिटीश होती जिच्या सोबत आपल्या ट्रेनिंग च्या वेळी त्याने लग्न केले होते. नानावती नौसेनेत असल्यामुळे महिनोमहिने मुंबई पासून दूर राहत. संबंध बनले आणि एवढे घट्ट झाले की त्यांची पत्नी त्यांना तलाक देण्याचा विचार करु लागली. ही गोष्ट नानावतीला सहन झाली नाही. पुढच्या दिवशी त्यांनी रिवॉल्वर घेतली आणि त्यात सहा गोळ्या भरल्या. त्यानंतर सरळ प्रेम अहूजाच्या घरी जाऊन त्याला गोळ्या झाडल्या.

त्यानंतर पत्नी मानेकशॉ नानावती यांनी पुलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल केला.यानंतर मुंबईच नाहीतर पुर्ण देश दोन भागांमध्ये विभागला गेला. तमाम पारसी मानेकशॉ नानावती सोबत होते आणि सिंधी प्रेम आहुजा सोबत.

प्रेम आहुजा ची बहीण मैमीने तेंव्हाचे युवा वकिल राम जेठमलानी सिंधी असल्यामुळे या खटल्याबाबत त्यांची नियुक्त केले. तर पुर्ण पारसी समाज नानावती सोबत उभी राहिला. जेंव्हा कोर्टामध्ये हा खटला चालू होता तेंव्हा आरोप करणाऱ्या पक्षाचा हा प्रयत्न होता की नानावतीला शिक्षा व्हावी उलट बचाव पक्षाचे म्हणणे होते हातापाई मध्ये गोळी लागून प्रेम आहुजा चा मृत्यु झाला. परुंतु हे साध्य होत नसल्यामुळे एक युक्ती लढवण्यात आली.

नेहरू

एकिकडे तत्कालीन रक्षा मंत्री कृष्णा मेनन यांनी तत्कालीन नौसेना प्रमुख यांना कोर्टात जाऊन नानावती यांच्या पक्षात ग्वाही द्यावी असे सांगितले. याचे खास कारण होते. मानेकशॉ नानावती जवाहरलाल नेहरू यांच्या जवळचे होते .याचे कारण म्हणजे त्यांचे तेंव्हाचे रक्षामंत्री वि के कृष्णमेनन यांच्याशी खुप जवळीक असणे होते. जेंव्हा ते ब्रिटेन मध्ये भारताचे उच्चयुक्त होते तेंव्हा नानावती त्यांचा डिफेन्स एचैटी होता.

डिफेन्स एचैटी असल्यामुळे नानावती यांचे सरळ बोलणे नेहरूंशी होत असे.हेच कारण आहे कि नेहरुंनी आपली बहीण विजयलक्ष्मी पंडित जी मुंबई प्रदेशची राज्यपाल होती तिच्यावर दबाव टाकुन नानावती यांची सजा माफ करायला सांगितली.
कारण हायकोर्टाने नानावती यांना दोषी ठरवले आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय राखत त्यांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा दिली. तिथेच सुप्रीम कोर्ट आणि राज्यपाल यांच्या मध्ये टकराव होण्याची वेळ आली.

नेहरू एकीकडे नानावती यांना वाचवु पाहत होते तर सिंधी समाजाला नाराज करू पाहत नव्हते. रामजेठमलानी यांनी यावर उपाय शोधला. त्यावेळी एक प्रतिष्ठित सिंधी व्यापारी भाई प्रताप यांच्याविरुध्द आयात निर्यात लाइसंन्सचा दुरूपयोग चा खटला दाखल होता. राम जेठमलानी यांनी असा उपाय काढला की जर सरकारने त्या व्यापाऱ्यावरील खटला मागे घेतला तर सिंधी समाज नाराज होणार नाही.

तेच झाले. प्रेम आहुजा ची बहीण मैमी व भाई जगताप यांनी यासंबंधात राज्यपालांना एक चिठ्ठी लिहिली. यावर त्यांनी लगेच कारवाई करत भाई प्रताप आणि नानावती यांना क्षमादान केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here