आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीची असेल ‘या’ विराट विक्रमांवर नजर


 

इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचा जलवा पुन्हा पाहायला दिसणार आहे.  गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये विराटची बॅट सातत्याने तळपत आहे. एका संघाकडून सलग 13 आयपीएल हंगाम खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.  2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून विराट आरसीबीकडून सातत्याने खेळत आहे.  या वेळी आयपीएल 2021 मध्ये विराट कोहली कोणती नवीन विक्रम नोंदवू शकतो ते जाणून घेऊया.

 विराट कोहली

विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू  आहे आणि तीन वेळा अंतिम फेरी गाठणार्‍या संघाचा देखील तो भाग आहे.  आयपीएलमधील विराटसाठी 2016 हे करिश्माई वर्ष होते. यावर्षी त्याने एकूण 973 धावा केल्या, यात दमदार 4 शतकांचा समावेश आहे. एवढी जोरदार कामगिरी करूनही विराट संघाला अंतिम फेरी जिंकण्यात अपयशी ठरला.  विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीचा सनरायझर्स हैदराबाद संघाने पराभव केला.

 

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.  त्याने आयपीएलमधील 192 सामन्यांच्या 184 डावांमध्ये 5878 धावा केल्या आहेत.  या काळात विराटने 5 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत.  विराटने आयपीएल सुरू होण्यापूर्वी जाहीर केले आहे की या वेळी तो डावाची सुरवात करेल. आशा आहे की यावेळी विराट उत्तम कामगिरी करून संघाचे जेतेपद पटकावेल.

 

विराट या आगामी आयपीएलमध्ये अनेक विक्रम करू शकतो.  कोहलीला संपूर्ण टी -20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 269 धावांची आवश्यकता आहे.  याशिवाय आयपीएलमध्ये 200 खेळण्यापासून तो फक्त 8 सामने दूर आहे.  आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 122 धावांची आवश्यकता आहे.

विराट कोहली

विराट कोहली 2020-21 च्या मोसमात मोहम्मद रिझवान (1011), मार्कस स्टोनिस (904)) आणि बाबर आझम ( 843) नंतर टी 20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.  वानखेडे स्टेडियमवर कोहलीने 409 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 142.5 होता.

 

आयपीएल 2021 ची सुरवात 9 एप्रिलपासून होत आहे.  या मोसमातील पहिला सामना चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल.  या सुरुवातीच्या सामन्यात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ होईल, अशी अपेक्षा आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here