आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक


 

चेन्नई सुपरकिंग्जची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघात केली जाते. सर्वाधिक आठ फायनल्स खेळणार्‍या या संघाला यंदा चौथ्या विजेतेपदाची अपेक्षा असेल.

 

9 एप्रिलपासून सुरू होणार्‍या आयपीएलमध्ये संघ मागील मोसमातील कडवट आठवणीना विसरून एक नवी सुरुवात करण्याच्या विचारात आहे. त्यांचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.

एम एस धोनी

11 मोसमात 10 प्लेऑफ, 8 फायनल, तीन विजेतेपद मिळवणार हा संघ मागील वर्षी गुणतालिकेत खालून दुसर्‍या क्रमांकावर होता, म्हणजेच सातवा. तेव्हा धोनीची बॅटही शांत होती. त्याने 14 सामन्यात 25 च्या सरासरीने आणि 116.27 च्या स्ट्राइक रेटने 200 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील धोनीची ही सर्वात वाईट कामगिरी होती.

 

सीएसकेची मजबूत बाजू अशी आहे की, यात अनुभवी खेळाडू आहेत जे कठीण परिस्थितीत संघाचा डाव सांभाळत विजयापर्यंत नेतात.

धोनीचे प्रेरणादायी नेतृत्व हा संघाचा आणखी एक सकारात्मक पैलू आहे. यावेळी धोनी इंडियन प्रीमियर लीगचे अनेक विक्रम तोडू शकतो. त्यावर एक नजर टाकूया.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here