आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गुरदीप कौर चावला – सोशल मीडिया वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चे फोटो एका महिलले सोबत वायरल होत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत प्रत्येक विदेश दौऱ्यात असणारी ही महिला कोणी नेता नाही ती एक इंटरप्रिटेटर म्हणजे अनुवादक आहे. हिचे नाव गुरदीप कौर चावला आहे. जेंव्हा कधी पीएम मोदी विदेश दौऱ्यावर असतात तेंव्हा गुरुदीप कौर चावला त्यांच्या सोबत अनुवादक म्हणुन जाते. पीएम मोदी यांनी हिंदी मध्ये भाषण दिल्यानंतर गुरुदीप कौर चावला ह्या त्याचे रूपांतर इंग्रजीत करतात ज्यामुळे जगातील इतर नेत्यांना ते कळेल.

मोदी

वॉशिंगटन मध्ये हि दिसली गुरदीप कौर चावला.

२०१४ सालच्या मोदींच्या अमेरिका दौऱ्यात गुरदीप त्यांच्या सोबत मोदींच्या प्राइवेट विमानाने गेली होती. तिथे त्यांनी जवळपास १८ हजार भारतीयांसमोर मोदींच्या हिंदी भाषणाचे इंग्रजीत रुपांतर केले होते. आणि याच वेळी मोदी आणि बराक ओबामा यांच्या भाषणाचे रुपांतर सुध्दा केले होते.

new google

२७ वर्षापासून अनुवादक आहे गुरदीप कौर चावला.

सन 1990 मध्ये गुरदीप ने भारतीय संसद पासुन आपल्या या करियर ची सुरुवात केली होती. सन 1996 मध्ये लग्न झाल्यामुळे त्यांना हे काम सोडावे लागले होते. त्यानंतर ती आपल्या सोबत अमेरिका मध्ये शिफ्ट झाली आणि सन 2010 मध्ये अमेरिकाचे पूर्व राष्ट्रपति सोबत त्यांची इंटरप्रिटेटर बनुन भारत दौ-यावर त्याच्या सोबत आली.

मोदी

त्यावेळी तिने बराक ओबामा यांच्या सगळ्या इंग्रजी भाषणांचे आणि नेत्यांसोबत बोलण्याचे हिंदी मध्ये अनुवादन केले होते आणि ती आता पीएम मोदी ची अनुवादक आहे. गुरदीप कौर चावला ला संसद मध्ये जे शिकवल्या गेले ते देशातल्या कोणत्याही स्कूल किंवा कॉलेज मध्ये शिकवल्या जाऊ शकत नाही. गुरदीप म्हणतात आपल्या कामाबाबत त्यांना जागरुक राहावं लागतं आणि नेत्यांनी ज्या शैलीमध्ये भाषण केले त्याच शैलीमध्ये त्याचे अनुवादन करावे लागते.

आपल्या सगळ्यांना माहित आहे पीएम मोदी हिंदी भाषेला किती प्राधान्य देतात त्यामुळे मोदींची ही अनुवादक त्यांच्या खुप कामा येते. आपल्याला माहित आहे देशाचे पीएम साहेब आपल्या मातृभाषेला खुप महत्त्व देतात आणि सन्मान करतात. यामुळेच ते आपल्या प्रत्येक विदेश दौऱ्यावर हिंदी मध्ये भाषण करतात. आपणही आपल्या मातृभाषेचा सन्मान करायला पाहिजे.


तुम्हाला हेही वाचायला आवडेल-

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीची असेल ‘या’ विराट विक्रमांवर नजर… 

१२०० चीनी सैनिकावर भारी पडला  होता हा भारतीय जवान! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here