आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
आजचा दिवस एमएस धोनीसाठी आहे खास: ‘हे’ आहे कारण
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा दिवस खास आहे. 16 वर्षांपूर्वी 5 एप्रिल 2005 रोजी त्याने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. धोनीने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 6 वन डे मालिकेच्या दुसर्या सामन्यात हा करिश्मा केला.
विशाखापट्टणमच्या डॉ.वायईएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली आणि पहिली विकेट 26 धावांवर पडली. सलामीवीर सचिन तेंडुलकर 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर चतुर कर्णधार सौरव गांगुलीने युवा खेळाडू एमएस धोनीला ‘वनडाउन’ साठी पाठवले.
एम. एस. धोनीने देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठेवत एक स्फोटक खेळी करून भारतीय संघाला एक स्फोटक फलंदाज मिळाला असल्याची जाणीव करून दिली. तो तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आला. वीरेंद्र सेहवागच्या मदतीने त्याने भारतीय डाव पुढे नेत होता.
या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीच्या धक्क्यातून भारताला वर काढण्यासाठी शतकी भागीदारी केली. स्फोटक खेळी करण्याच्या नादात सेहवाग 74 धावांवर बाद झाला.
या सामन्यात जेव्हा भारताची मधली फळी गडगडली होती, तेव्हा धोनीने एक टोक लावून धरत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ले करत होता. त्यावेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या राहुल द्रविडनेही 52 धावा केल्या होत्या. आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत धोनीने पाहुण्या संघाच्या गोलंदाजी पिसे काढत होता. सामन्यात आतिशबाजी करत त्याने 123 चेंडूंत 148 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीदरम्यान 15 चौकार आणि 4 षटकार लगावले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीचे पहिले शतक होते. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 9 विकेट्ससाठी 356 धावा केल्या.
या सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद सामी खूपच महागडे ठरले. आफ्रिदीने त्याच्या 9 षटकांत 82 धावा दिल्या. त्याच वेळी सामीने 9 षटकांत 65 धावा खर्च केल्या. हे गोलंदाज महागडे ठरण्याचे कारण म्हणजे एम एस धोनीची फलंदाजी.
विजयासाठी पाकिस्तानच्या संघापुढे 357 धावांचे लक्ष्य होते. पण ते निर्धारित 44.1 षटकांत 298 धावांवर बाद झाले. पाकिस्तानकडून सर्वाधिक 88 धावा अब्दुल रझाकने केल्या. भारताकडून आशिष नेहराने 4 आणि युवराज सिंगने 3 गडी बाद केले. या सामन्यात 148 धावांची खेळी करणारा एमएस धोनीला सामनावीर च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल-
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीची असेल ‘या’ विराट विक्रमांवर नजर…
१२०० चीनी सैनिकावर भारी पडला होता हा भारतीय जवान!