आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
काय आपण ऐकले आहे? एखाद्या माणसाच्या तोंडुन बकरीचे नाव ऐकताच त्याला फासीची शिक्षा देण्यात आली आहे किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला नग्न अवस्थेमध्ये परेड करायला लावले आहे. जर नाही तर तुम्हाला सांगतो की रोमन साम्राज्यात एक असाही क्रुर शासक होता, ज्याला अजबगजब कामांसाठी इतिहासामध्ये लक्षात ठेवल्या जाते.
ज्याचे नाव कालिगुला होते. तो आपल्या शासनकाळामध्ये अत्यंत निर्दयी आणि सनकी राजा म्हणुन प्रसिद्ध झाला. त्याचे असे किस्से आहेत कि जे ऐकुन आपण हैराण होऊन जातील.
कलिगुला चे आपल्या बहिणीसोबत ही नाजायज ( अवैध्य ) संबंध होते. अशामध्ये आपल्याला हे जाणुन घेणे महत्त्वाचे ठरते कि कलिगुला पहिलाच असा होता की काही कारणांमुळे तो क्रुर झाला .
परिवारासोबत घडली एक मोठी घटना.
कलिगुला रोमचा तिसरा सम्राट होता. त्याचे पुर्ण नाव गायस ज्युलियस सीजर जर्मेनिकस होते. नंतर तो कालिगुला या नावाने प्रसिद्ध झाला. जनता त्याला त्याच्या कार्यांमुळे पागल म्हणत असे. त्याचा जन्म ३१ ऑगस्टला इटलीला झाला.
कलिगुला रोमच्या एका प्रतिष्ठीत परिवाराशी निगडीत होता. त्याचे परदादा महान ज्युलियस सीजर आणि दादा अगस्तस होते. त्यांचे वडिल ही लोकप्रिय माणसांमधील एक होते. फक्त ३ वर्षे वय असताना गायसचे शिक्षण अभियान सुरू झाले.
परंपरेच्या अनुसार त्याने वर्दी आणि छोटे बुट घातले. ज्याला बघुन त्याला कालिगुला ( छोटे बुक ) म्हटल्या गेले. जे हमेशासाठी त्याच्या नावाशी जोडल्या गेले. कालिगुलाच्या लहानपणीच त्याचे दादा महाराज अगस्तस यांचा शासनकाळ संपत आला होता. ते अस्वस्थ राहत असत अशामध्ये त्यांनी आपला दुसरा पुत्र टाइबेरियसला उत्तराधिकारी घोषित केले . १९ ऑगस्ट १४ एडी मध्ये अगस्तसचा मृत्यू झाला.
यानंतर रोमन साम्राज्याची सत्ता टाइबेरियसच्या हाती आली. टाइबेरियस एक अलोकप्रिय आणि धोकेबाज शासक होता. त्याने धोक्याने कालिगुलाचे वडिल आणि आपल्या भावाल्या मारले. त्याला भिंती होती की जनता त्याच्या भावाला राजा बनवेल कारण तो लोकप्रिय होता.
एवढंच नाही तर टाइबेरियसने आपली भावजयी आणि दोन्ही मोठ्या पुतण्यांना कैद केले. जिथे त्यांना खुप यातना देण्यात आल्या. भुक आणि तहान यामुळे त्यांचा मृत्यु झाला. अशामध्ये अगस्तसच्या बायकोने आणि कालिगुलाच्या आजीने त्याला आणि त्याच्या तीन बहीणींना सांभाळले.
रोमन सम्राट बनल्याच्या नंतर जनतेचा विश्र्वास जिंकला परंतु.
कालिगुलाला त्याच्या आजीने क्रुर शासक आणि तिच्या मुलापासून वाचवले. कालिगुलाने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले होते. जेंव्हा कालिगुला मोठा झाला तेंव्हा तो असे काही काम करू लागला ज्यामुळे टाइबेरियस खुश होऊन त्याला आपल्याकडे बोलावून घेईल. पुढे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले.
३० एडीमध्ये टाइबेरियसने त्याला कैकद्विप वर भेटण्यासाठी बोलवुन घेतलं. तिथे जाउन त्याने आपल्या मनातील राग न दाखवता टाइबेरियसची खुप प्रशंसा केली. तो टाइबेरियसचा विश्र्वास जिंकण्यात यशस्वी ठरला. नंतर टाइबेरियसने आपल्या मुलांसोबत त्यालाही वारिस बनवले.
टाइबेरियसच्या मृत्युनंतर कालिगुलाने अन्य वारिसांना मृत्युच्या घाट उतरवले. त्यानंतर रोमचे पुर्ण साम्राज्य आपल्या हाती घेतले. सम्राट बनल्यानंतर त्याने जनतेचा विश्वास जिंकला. टाइबेरियसने अन्यायपुर्वक कैद केलेल्या कैंद्यांना मुक्त केले.
कालिगुला खुप दिवस बिमार पडला होता. तो जिवन आणि मृत्युशी झगडत होता. ६ महिन्यांनंतर तो स्वस्थ झाला. परंतु त्याची तब्येत खुप खराब झाली होती. तो खूप चिडचिडाही झाला होता. लोक त्यांला बकरीसारखा दिसतो म्हणत. यामुळे तो ज्या माणसाच्या तोंडुन बकरीचे नाव ऐकत असे त्याला मृत्यु ची शिक्षा देत असे.
बहिणीसोबत केले दुष्कर्म .
कालिगुला अतंत्य क्रुर झाला होता. तो त्याची बहीण ज्युलियाच्या खुप जवळ आला होता. तिच्य सोबत त्याचे शारिरीक संबंध होते. तिच्या मृत्यूनंतर कालिगुलाने तिचे मंदीर बनवले. लोक तिची पुजा करत आणी तिला ‘ प्रेमाची देवी म्हणत ‘ .
त्याचे पागलपन एवढ्यावरच संपत नाही तर त्याने चार लग्न केले. त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका मुलीच्या लग्नाच्या दिवशी त्याने तिला पळवुन आणले तिच्या सोबत लग्न केले. तिसरे लग्न त्याने लग्न झालेल्या महिलेसोबत केले. आणि मिलोनिया नावाच्या महिलेसोबत चौथे लग्न केले. मिलोनिया त्याला थोडंफार ताब्यात ठेवत असे पण त्याच्या क्रुर पणामुळे तिचे काही चालले नाही. आपल्या मित्रांच्या समोर नग्न अवस्थेमध्ये त्याने तिला परेड मारण्यास सांगितले.
तर हा होता रोमचा अत्याचारी आणि सनकी शासक ज्याच्या अजबगजब कामामुळे आजही जगातल्या इतिहासामध्ये त्यांचे नाव आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.