आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

75 पैश्यांचा शांपु पाऊच विकून सुरु केलेली ही कंपनी आज करोडोंची उलाढाल करतेय…!


जुन्या काळात लोक आपले डोके धुण्यासाठी मुल्तानी माती किंवा कपडे धुण्याची साबण वापरत असत. परंतु पश्र्चिमी देशांमध्ये त्यावेळी ही केस साफ करण्यासाठी शांपुचा वापर करत असत. साधारणपणे लोकांची अशी धारणा होती की भारतातील लोक रोज केस धुत नाहीत आणि रोज शांपु नाही वापरू शकत. नंतर एक मार्केट रिसर्च झाली आणि त्यात कळले की भारतातील लोक हप्त्यातुन दोनदा आणि विदेशी लोक रोज शांपु वापरता.

शांपु

खासकरुन भारतीय महिला ज्यांचे केस लांब आहेत त्या २ मिली जास्त शांपु वापरतात.

शांपु बॉटलपेक्षा साचेमध्ये जास्त विकतो.

new google

पहिल्या जमान्यात लोक असा विचार करत कि फक्त श्रीमंत लोकच शांपु वापरु शकतात कारण तो साचे किंवा पाउच मध्ये येत नसे. परंतु एका सर्व्हेमध्ये समजले शहराच्या तुलनेत गावातील महिला जास्त शांपु वापरतात. परंतु त्यांची आमदानी कमी असल्यामुळे ते बॉटल नाही घेऊ शकत.

दक्षिण भारतातील महिलांचे केस लांब आणी घनदाट असतात अश्यात हा शांपु त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी एका व्यक्तीने शांपुची बॉटल विकण्या ऐवजी तो पाउच मध्ये विकायला सुरुवात केली. ज्याची किंमत होती फक्त ७५ पैशै जे विकत घेणे सोपे आहे. त्या ब्रैंडचे नाव होते ‘ चिक शापु ‘ ज्याचे वार्षिक टर्नओवर २०० करोड आहे.

चला तर मग बघुया तामिळनाडूतील एका छोट्याशा गावातून आलेल्या २२ वर्षीय तरूणाबद्दल जो फक्त १५००० रुपये घेऊन घराच्या बाहेर निघाला. ज्याचे स्वताचा व्यवसाय करण्याचे स्वप्न होते. जे आज करोडोंचे मालक आहेत.

१५ हजार रूपयांपासुन सुरू केली कंपनी.

आंध्रप्रदेशच्या तमिनलाडु मधील एका छोट्याशा गावाशी संबंध ठेवणारे सी. के. रंगनाथन वयाच्या २२ व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर आणि भावांमधील वादांमुळे १५ हजार रूपये घेऊन घराच्या बाहेर पडले आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या राहण्याची व्यवस्था केली.

७५ पैशांमध्ये विकले शांपुचे पाउच.

रंगनाथन सुरुवातीला एका छोट्याशा रुममध्ये किरायाने राहत. त्यांनी एक स्टो आणि सायकल विकत घेतली. खुप नोकरी शोधुन सुध्दा त्यांना नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचा शांपु विकण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. सन १९८३ मध्ये त्यांनी पैशे जोडुन ‘ चिक ब्रैंड ‘ च्या नावान ७ मिलीचा शांपुचा पाउच ७५ पैशांना विकायला सुरुवात केली.

स्वस्त शांपुने लोकांना आकर्षित केले. हळुहळु चिक ब्रैंड लोकप्रिय होऊ लागला. साऊथ इंडिया मध्ये लोक त्यांना ओळखला लागले तर नॉर्थ इंडिया मध्ये सुद्धा शांपु विकायला लागला. फक्त एकाच वर्षात त्यांनी सहा लाखाचा सेल केला.

करुणानिधिच्या नाती सोबत केला विवाह.

सन १९८७ मध्ये त्यांचा विवाह तनीमोझी सोबत झाला. हि मुलगी कुणी साधारण मुलगी नव्हती तर तामिळनाडू च्या पुर्व मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांची नात होती. हा विवाह घरवाल्यांना न विचारता दोघांनीच केला होता. तेंव्हा कंपनीचा सेल ३.५ लाख रुपये महिना होता.

 

शांपु
आज कंपनीचा टर्नओव्हर आहे वर्षाला १६00 करोड रुपये.

आज रंगनाथन यांच्या कंपनीचे नाव केवीनकेयर आहे जी चिक शैंपू, नाइल पाउडर, फेयरएवर फेयरनेस क्रीम आणि स्पिन्ज डियोडरेंट बनवती. साल 2019-20 मध्ये कंपनीने १६00 करोड़ चा टर्नओवर केला. तर 2020-21 मध्ये कंपनीच लक्ष्य 2000 करोड़ रुपये पेक्षा जास्त टर्नओवरचे आहे. भारतामध्ये प्रत्येक साली विकणारे 8000 करोड़ रुपयांच्या शांपूमधील जवळपास 54% शैंपू पाउच म्हणजे प्लास्टिक च्या पुड्यांमध्ये विकतो.

आज ‘चिक’ शैंपू भारत च नाहीतर श्रीलंका, बांग्लादेश, नेपाल, मलेशिया, सिंगापुर मध्येही पुरवल्या जातो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here