आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जेंव्हा मुलीचा खरेदी करण्याचा शौक पुर्ण करण्यासाठी शाहजहॉने बनवला ‘ चांदनी चौक ‘

एक दिवस जेंव्हा शहाजहान ला कळाले कि त्याची मुलगी जहानताराला खरेदी करण्याचा खुप शौक आहे तेंव्हा शहाजहानने हा छोटासा शौक पुर्ण करण्यासाठी चांदनी चौकात मार्केट बसवले. यामागे उद्देश एकच होता जहानताराला खरेदी करण्यासाठी कुठे दुर जावे लागु नये. एकाच जागी त्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात ज्या जहानताराला पाहिजे.

शहाजहान

तर चला बघुया कसा शहाजहानने पुर्ण केला आपल्या मुलीचा शौक .

चंद्राच्या चांदणी पासून बाजाराला मिळाले नाव …

चांदनी चौक बाजार आज किंवा काल नाही बनला. यांची मुळ मुघल काळापासुन आहेत. हि गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी शाहजहाँच्या हातांमध्ये दिल्लीची सल्तनत होती. अस म्हणतात की शहाजहानने आपल्या शासनकाळामध्ये दिल्लीमध्ये खुप गोष्टी बनवल्या. ज्यामध्ये चांदनी चौक एक आहे, यामागे ही एक कहाणी आहे.

अस म्हणतात की शहाजहान आपली मुलगी जहानतारा खुप प्रेम करत असे. तो तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होता. ईकडे जहानताराला खरेदी चा खुप शौक होता ति अनेक जाग्यांवरून वेगवेगळ्या वस्तु खरेदी करत असे.
शहाजहान ने एक असा बाजार बनवण्याचे ठरवले जिथे प्रत्येक वस्तु मिळेल. मोठा व्यापारीही तिथे व्यापार करू शकेल. मग काय शहाजहानने असा बाजार बनवण्याचा हुकुम दिला.

यानंतर चांदनी चौक वसवण्याचे काम १६५० मध्ये सुरू झाले. त्यांची डिझाईन खुप वेगळी ठेवण्याचे सांगितले कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे नाव होईल. यामुळे याला एका चौकोर आकारात बनवण्यात आले. यांच्या चारही बाजुस बाजार होता आणि मधली जागा यमुना नदीसाठी सोडली होती. काही काळामध्येच कारागिरांनी हा बाजार तयार केला. याच्या मधोमध यमुना नदीच्या एक भाग आणला जो आकर्षणाचे केंद्र बनला .

चांदनी चौकातील चांदीने दिली प्रसिध्दी .

एक वेळ जेंव्हा चांदनी चौकाचा बाजार बनला प्रत्येकजण याकडे आकर्षित होऊ लागला. सुरुवातीला तर इथे फक्त लहान मोठे व्यापारीच येत परंतु वेळेनुसार सगळं बदललं. जाणाऱ्या वेळेनुसार चांदनी चौक एक फेमस बाजार झाला लोकांची गर्दी इथे वाढु लागली.

लोकांची हि गर्दी पाहून व्यापारी येथे येऊ लागले. अस म्हटल्या जाते सुरुवातीच्या काळामध्ये येथे चांदीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे. पुर्ण भारतातुन मोठमोठे व्यापारी येथे चांदी विकण्यासाठी येत. खुप लोकांना वाटत असे येथे चांदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे या बाजाराला चांदनी चौक असे नाव पडले असेल.

वेगवेगळ्या बाजारांनी वाढवली चांदनी चोकाची रौनक.

चांदनी चौक सुरुवातीला पुर्ण एक बाजार होता पण नंतर याला वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्यात आले. या बाजाराला चार भागांमध्ये विभागण्यात आले. प्रत्त्येक विभागातील बाजाराची वेगळी ओळख होती. हे चार भाग होते उर्दू बाजार , जोहरी बाजार, अशरफी बाजार आणि फतेहपुरी बाजार. जवळपास १.३ किलोमीटर पसरलेल्या या बाजारात १५०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. जिथे प्रत्येक गरजेची वस्तु भेटते.

शहाजहान

चांदनी चौक बसवल्या तर गेले एका मुघल शासकाद्वारे पण येथे प्रत्येक धर्म आढळून येतो.

दिगंबर जैन लाल मंदीर असो वा गौरी शंकर मंदिर असो. आर्य समाज दीवान हॉल असो वा सेंर्टल बेपसिस्ट चर्च. गुरुद्वारा सीस गंज साहेब असो वा फतेहपुरी मजीद येथे सगळ्या धर्मांना काहींना काही आहे. फक्त एवढंच नाहीतर इथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात जे भारताची एकता दर्शवतात.

आता हे चांदनी चौकचा  बाजार पुर्णपणे बदललेले आहेत. आता जुन्या बाजाराची जागा नविन बाजाराने घेतली आहे . पहिले हे फक्त चांदीसाठी ओळखल्या जाई पण आता येथे मोठ मोठे होलसेल मार्केट आले आहेत.

१७ वर्मा शतकापासुन छत्ता बाजार महिलांसाठी प्रसिद्ध आहे. येथे महिलांसाठी एवढे दुकान आहेत कि पाहुणच डोक फिरेल. आपल्या बनण्याच्या वेळेपासून चांदनी चौक एक फेमस बाजार आहे. आजही येथे एवढी गर्दी होते कि पाय ठेवायला जागा मिळत नाही. भारतामध्ये क्षेत्र खुप फेमस बाजार आहेत पण चांदनी चौकाची बरोबरी कुणाला येत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

या प्रसिद्ध चित्रकाराने कर्ण आणि मूकबधिर व्यक्तींसाठी संवादाचा मास्क बनवलाय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here