आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

इंडियन प्रिमियर लीग 2021ला सुरवात होण्यासाठी काहीच तास बाकी आहेत. या सिजनमध्ये चेन्नई सुपर किंगकडून तिच्या चाहत्यांना आणि मॅनेजमेंटला मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी खेळी न करू शकलेली चेन्नई सुपर किंग यावर्षी नव्या जोशाने कप आपल्या नावाने करण्याच्या उमेदीने मैदानात उतरेल.

चेन्नई आयपीएलमधील मजबूत टीमपैकी एक समजल्या जाते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आजपर्यंत चेन्नई तीन वेळा विजेता बनली आहे.

चेन्नई सुपर किंग

चेन्नईच्या टीमसाठी अडचणीची गोष्ट ही आहे की टीममधील अनेक खेळाडू प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळू शकत नाहीयेत. त्यामुळे होऊ शकते की काही खेळाडूंना फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल.

शिवाय चेन्नईचे अनेक खेळाडू हे आपल्याला पुढच्या सत्रात दिसतीलच असे नाही. सध्याच्या टीम मधील बऱ्याच खेळाडूंच हे शेवटचं हंगाम असू शकतो. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन बसला आहे. धोनीच्या नेतृत्वात गेल्या 8 मोसमात चेन्नई सुपर किंग खेळत आली आहे. धोनी सोबत आणखी काही खेळाडू आपल्याला या मोसमात खेळताना दिसतील परंतु हे आयपीएल सत्र त्यांच्यासाठी शेवटच असू शकते. जाणून घेऊया कोणते असतील ते खेळाडू.

1) महेंद्र सिंह धोनी

धोनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमधून अगोदरच रिटायर झाला आहे. आयपीएलचे हे सत्र धोनीसाठी शेवटचे असेल. यानंतर तो आपल्याला मैदानात खेळताना दिसू शकणार नाही. धोनी आयपीएलच्या मागच्याच सत्रात संन्यास घेत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु धोनीने ते नाकारलं होत. धोनीने म्हटलं होत की आणखी तो खेळणे चालू ठेवणार आहे.

हेलीकोप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने आयपीएलच्या 174 सामन्यात 4058 रण बनवले आहेत.

2)इमरान ताहीर

चेन्नई सुपर किंग

इमरान ताहीर 42 वर्षाचा असून सुद्धा मैदानात दमदार ऊर्जेसह असतो. ताहीर एक अनुभवी गोलंदाज आहे. जो फिरकीच्या जाळ्यात मोठंमोठ्या खेळाडूला अडकवू शकतो. 2018 मध्ये पर्पल कॅपचा मानकरी राहिलेला इमरान ताहीरसाठी सुद्धा यावर्षी शेवटचा आयपीएल मोसम असू शकतो. इमरान ताहीरने आयपीलच्या 58 सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत.

3)डवेन ब्रावो

वेस्ट इंडिजचा हा स्टार खेळाडू गेली अनेक वर्ष चेन्नई सुपर किंगचा हिस्सा आहे. ब्रावो ओलराऊंडर आहे. परंतु मागच्या काही मोसमात त्याचे प्रदर्शन तेवढे काही विशेष असं नाहीये. होऊ शकते की या मोसमच्या नंतर तो आयपीएलमध्ये दिसला जाणार नाही. ब्रावोने 140 सामन्यात 1499 रण बनवून सोबत 153 विकेट सुद्धा घेतल्या आहेत.

4) सुरेश रैना

सुरेश रैनाने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्यांच्या चाहत्यांना याची उम्मीद आजिबात नव्हती. आपल्या खराब फॉर्म मुळे होऊ शकते की रैनासाठी सुद्धा आयपएलचं हे सीजन शेवटचं असेल. रैना आयपीएलच्या दिग्गज खेळाडूपैकी एक आहे. रैनाने 193 सामन्यात 5368 रन्स बनवले आहेत. रैना हा आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत सर्वांत जास्त रण बनवणारा दुसरा खेळाडू आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here