आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हे आहेत देशातले सगळ्यात पहिले गे राजकुमार , सर्वांसमोर कबुल केली होती गे असण्याची गोष्ट


 

कोर्टाने दोन वयस्कर व्यक्तींमधील समलैंगिक संबंध अपराध असण्याची धारा ३७७ हटवली म्हणजे आपल्या देशात आता गे संबंध कधीही अपराध राहणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा एका राजकुमाराबद्दल सांगणार आहोत ज्याने सर्वांसमोर आपण गे असल्याचे कबूल केले होते.

राजकुमार

आम्ही बोलत आहोत गुजरातचे राजकुमार मानवेंद्र सिंह गोहिल बद्दल. गुजरातच्या एका राजघराण्यात राजकुमार मानवेंद्र सिंह गोहिल चा जन्म झाला होता. परंतु शाही परिवारामध्ये जन्म घेऊन सुध्दा त्यांचे जिवन सोपे नव्हते. ते शाही परिवारातील एकमेव सदस्य होते ज्यांनी आपल्या गे असण्याची गोष्ट सर्वांसमोर कबुल केली होती.

परंतु यानंतर परिवाराने त्यांना अलग केले. गुजरातचे महाराज राजपिपलांचे पुत्र मानवेंद्र यांना खुप वर्षे आपली सेक्सुअलिटी लपवून ठेवावी लागली, कारण आपल्या देशामध्ये गे असणे अपराध मानल्या जाते. अशामध्ये मानवेंद्र यांना दुहेरी जीवन जगावे लागले.

गे असुन सुद्धा परिवाराच्या दबावापोटी त्यांना १९९१ मध्ये मध्यप्रदेशची राजकुमारी झाबुआ सोबत विवाह करावा लागला. परंतु त्यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही कारण त्यांनी त्याच्या गे असण्याबद्दल सर्व काही आपल्या पत्नीला सांगितले होते. लग्नाच्या एका वर्षांनंतरच यांच्या पत्नीने त्यांना तलाक दिला. तिने मानवेंद्रच्या गे असण्याची गोष्ट कुणाला सांगितली नाही. परंतु मानवेंद्र आपल्या गे असण्याची गोष्ट आपल्या घरी सांगु शकले नाहीत.

२००२ साली जेंव्हा त्यांचे नर्व्हस ब्रेकडाउन झाले तेंव्हा त्यांना दवाखान्यात नेण्यात आले तेथिल सायकायट्रिस्ट ने त्याच्या आई-वडिलांना त्याच्या गे असण्याबद्दल सांगितले. यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना हि गोष्ट लपवुन ठेवण्यास दबाव आणले तसेच त्यांचा मेडिकल आणि धार्मिक पध्दतीने इलाज केला. परंतु आई वडिलांचा दबाव कामा आला नाही आणि मानवेंद्र यांनी सर्वांसमोर आपण गे असल्याचे कबूल केले.

राजकुमार

सगळीकडे हि गोष्ट पसरली. लोकांनी त्यांचे पुतळे जाळले. आई वडिलांनी त्यांना संपत्ती मधुन बाहेर काढले तसेच सर्व नाते तोडून घराच्या बाहेर काढले. एका इंटरव्ह्यू मध्ये मानवेंद्र सिंह यांनी सांगितले ‘ भारतामध्ये सार्वजनिक पणे उघड होते फार अवघड आहे. समाज आणि घरचे हि गोष्ट स्विकारत नाहीत. पॅरेंट्स आपल्या मुलांना ब्लैकमेल करायला सुरू करतात आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तिशी लग्न करायला मजबुर करतात. खुप लोक मला सांगतात कि त्यांच्या पॅरेंट्स नि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. खुप असे आहेत जे घरच्यांच्या दबावापोटी लग्नाच्या बंधनात अडकतात.

नंतर मानवेंद्र सिंह यांनी आपली चैरीटी सुरू केली, खुप काळापासून ते एड्स च्या नियंत्रणासाठी काम करतात. आपल्या गे असण्याची गोष्ट सर्वांसमोर कबुल करणे भारतासारख्या देशात अवघड आहे तरिही ति कबूल करून मानवेंद्र सिंह यांनी साहसाचे काम केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here