आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारताच्या टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समनला आयपीएल मध्ये मिळाली नाही संधी: धरली इंग्लंडची वाट


 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू हनुमा विहारी याच्याकडे आयपीएल लिलावात फ्रँचाइझींनी दुर्लक्ष केले. आपल्या संघात सामील करून घेण्यात कोणत्याही संघमालकांनी रस दाखवला नाही. निराश न होता हनुमा विहारी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडकडे रवाना झाला आहे. तो आता काउंटी संघ वॉर्कशायर संघासोबत राहून तयारी करणार आहे.

तो अाता इंग्लंडमधील आगामी सहा कसोटी सामन्यांच्या दौर्‍याची तयारी करणार आहे. आयपीएलनंतर इंग्लंडमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडशी सामना करावा लागलणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घ्यावा लागेल. उजव्या हाताचा हा फलंदाज इंग्लंडला पोहोचला असून या मोसमात कमीतकमी तीन सामन्यांसाठी बर्मिंघॅमच्या या काउंटी संघासोबत असेल.

भारत

बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, “होय, विहारी या हंगामात इंग्लंडमधील काउंटी टीम वॉर्कशायरकडून खेळेल. तो इंग्लंडमध्ये आहे.”

27 वर्षीय या फलंदाजाने भारतासाठी 12 कसोटीत 32 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि चार अर्धशतके ठोकली आहेत. गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सिडनी कसोटीत दुखापत झाली असली तरी विहारीने शानदार फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here