आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

प्रसिद्ध चित्रकार हसबनीस यांची संकल्पना : सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न


 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले. तोंडाला मास्क लावल्याने सभोवतालच्या व्यक्तीशी संवाद साधण्यात आणि समजावून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यात कर्ण आणि मूकबधिर व्यक्तींना संवाद साधताना सर्वाधिक अडचणी निर्माण होत आहेत. कारण त्यांचा संवाद हा ओठांच्या  हालचालीवर असतो. पण मास्क लावल्याने या हालचाली लवकर लक्षात येत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन  अशा व्यक्तींच्या मास्कवर विशिष्ट प्रकारचे स्टीकर्स लावण्याची संकल्पना प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी मांडली आहे.

मूकबधिर

new google

चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी फेब्रुवारी महिन्यात कर्ण आणि मूकबधिर व्यक्तींच्या मास्क वर विशिष्ट प्रकारची खूण असलेले स्टीकर्स तयार केले. स्टीकर्सवर कानाचे चित्र आणि तिरपी रेघ असे चित्र आहे. अशा स्टीकर्सचे चित्र मास्कवर असेल तर ती व्यक्ती कर्णबधिर अथवा मूकबधिर असल्याचे समोरच्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येते आणि त्यानुसार तो समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. याच स्टीकर्समुळे कर्ण आणि मूकबधिर व्यक्तीच्या संवादातील अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे. विशेष गरज असणाऱ्या ओळखीतल्या लोकांना त्यांनी हे स्टीकर्स दिले.

विशिष्ट चित्र असलेले स्टीकर्स गमव्दारे मास्कला चिकटविण्यात आले. परंतु हे स्टिकर्स मास्क पाण्यात धुतले की, ते स्टीकर्स गळून पडायचे. म्हणून हसबनीस यांनी कापडी मास्क वर ते चित्र प्रींट करून घेतले. ते चित्र प्रिंट केल्याने मास्क धुतला तरीही ते चित्र आहे तसे राहते. त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि काही खासगी संस्थांना नफा ना तोटा या तत्त्वावर हे स्टीकर्स दिले.

नफ्याचा विचार न करता हसबनीस आणि मास्क बनवून त्यावर प्रिंट करणारे व्यावसायिक हे विशेष मास्क बनवत आहेत. विशेष गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी असे स्टीकर्स तयार करण्याची संकल्पना चित्राच्या माध्यमातून सूचली असल्याचे हसबनीस यांनी सांगितले.

श्री. हसबनीस सांगतात, आपण काय म्हणतोय हे समजण्यासाठी आपल्या ओठांच्या हालचाली आणि हावभाव ह्यावरच ज्यांना अवलंबून राहावं लागतं, अशा कर्णबधीर लोकांची, ह्या कोरोना काळात किती केविलवाणी परिस्थिती झालीये. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरायला पाहिजे हे कबूल.

मूकबधिर

मास्क आवश्यक आहेच. पण आपण तोंडावर मास्क बांधल्यामुळे अशा कर्णबधीर लोकांचं जगणं अधिकच अवघड झालंय हे एरवी आपल्या लक्षातही येत नाही. अशा लोकांना त्यांच्या मास्कवर लावायला हे स्टीकर्स देऊया आणि ज्यांच्या मास्कवर हा स्टीकर्स असेल त्यांच्याशी बोलताना जरा काळजी घेऊया. त्यांच्याशी बोलताना शब्दांपेक्षा हावभावातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करूया.

दृष्टिबाधित व्यक्तींनाही घेता येतो चित्रांचा आनंद.

पुण्यातील शनिवार पेठेत राहणाऱ्या चिंतामणी हसबनीस यांचा वास्तववादी चित्रे काढण्याकडे अधिक कल. माणसांची चित्र काढायला त्यांना खूप आवडतं. या चित्रकलेतही त्यांनी वेगळेपण जपलंय. केवळ सामाजिक भान जपण्यासाठी त्यांनी हाती कुंचला घेतला. योगायोगाने आलेल्या एका प्रसंगातून एक नावीन्यपूर्ण चित्रशैली निर्माण केली.

सामान्य व्यक्तीप्रमाणे दृष्टीबाधित व्यक्तींना चित्रांचा रसास्वाद घेता येईल, अशी विशेष चित्र ते काढू लागले. या चित्रांना स्पर्श करून दृष्टीबाधित व्यक्तींना ही चित्रं पाहता येतात. यामुळे चित्र या दृश्य माध्यमाचा आनंद त्यांनाही घेता येतो. दृष्टीबाधित व्यक्ती त्यांना कळलेल्या चित्रांचा अर्थ डोळसांना सांगतात.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here