आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

माणुसकी:कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या गाईंचा वाचविला जीव

कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मागील वर्षी मोठा लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने जनावरांची चार्‍या अभावी चांगली उपासमार होत होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी भुकेने व्याकूळ झालेल्या आपल्या गायी कत्तलखान्याला विकून टाकत होते. कत्तलखान्याकडे जाणार्‍या गायी स्वत: च्या पैशातून खरेदी करून त्यांची एक मोठी गोशाळा उभी केली. गोशाळेच्या माध्यमातून मातेसमान मानल्या जाणार्‍या कामधेनुचे जीवन वाचवणार्‍या युवकाचे नाव सचिन सोनारीकर असे आहे.

गोशाळा

सचिन सोनारीकर हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारी या गावचे रहिवासी. ३२ वषीय सचिन याचे  श्री क्षेत्र सोनारी येथील श्रध्दास्थान म्हणजे श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात प्रसाद विक्रीचे दुकान चालवतात. त्यांनी सुरु केलेल्या या गोशाळेची स्थापना योगा-योगाने झाली.

new google

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कत्तलखान्याकडे जाणारा एक ट्रक सचिन यांच्या शेताजवळ बंद पडला होता. त्यात पाच गोमाता होत्या. अधिक चौकशी केली असता त्या गाई भाकड असल्याने त्यांना विकायला निघाल्याचे समजले. गोर-गरीब शेतकऱ्यांच्या त्या गाई होत्या.

गरीब शेतकऱ्यांना त्या गाई सांभाळणे परवडत नव्हते. गाई चार्‍या अभावी हंबरडा फोडत होत्या. त्या कत्तलखान्याकडे जाऊ न देता ६८ हजार रुपये देऊन स्वतः विकत घेतल्या. त्यांना घरी आणून त्यांचे संगोपन ते करु लागले. श्री. सोनारीकर यांची अठरा एकर पारंपारिक शेती. या शेतातच गायींसाठी मोठा गोठा उभा केला.

आपल्या शेतात पिकवलेला कडबा या गाईना दिला. लॉक डाऊन काळात या कडब्यावर गायींची गुजराण झाली. गोशाळा सुरू झाल्याचे समजताच अनेकांनी भाकड गाई पालनासाठी आणून सोडल्या. सध्या गोशाळेत ३७ गाई,१० वासरू आणि ७ नंदी आहेत. त्यांच्या संगोपनासाठी दोन माणसे ठेवली आहेत.

गोशाळा

वास्तविक पाहता उस्मानाबाद हा जिल्हा कायम दुष्काळी भाग. त्यात लॉकडाऊनची भर. लॉक डाऊन काळात आपल्याकडे असलेल्या चाऱ्यावर कसेबसे भागवले. स्वतः च्या शेतातील कडबा संपल्यावर इतरांकडून मदत घेऊन गोशाळा चालू ठेवली. सध्या चार गुंठे परिसरात ही गोशाळा सुरू आहे.

गोशाळेसाठी पत्र्याचे शेड उभारले असून चारा व पाण्याची उत्तम सोय केली आहे. स्वतःची दोन एकर पडीक जमीन गोमातांना चरण्यासाठी व निवांत फिरण्यासाठी ठेवली आहे. सध्या राज्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन पडल्याने तुम्हा-आम्हाला दुधातून शक्ती देणारी ही गोमाता पुन्हा संकटात सापडली आहे. आता दानशुरांतील माणुसकीची पाझरच यांची भूक भागवू शकते.

 

माकडांचा ही करतात सांभाळ

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथील श्रध्दास्थान म्हणजे श्री काळभैरवनाथ मंदिर. सोनारीचा भैरवनाथ हे राज्यातील अनेकांचं कुलदैवत आहे. भक्तगणांचा इथं नेहमीच राबता असतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असलेल्या कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असत.

या मंदिराच्या परिसरात सुमारे दोन हजारांहून अधिक माकडं आहेत. अन्नाअभावी लॉकडाऊनचा फटका या मुक्या जीवांनाही बसतोय. गेल्या अनेक वर्षापासून सचिन या माकडांचा सांभाळ करत आहेत.(मदतीसाठी संपर्क 8600244275)

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

या प्रसिद्ध चित्रकाराने कर्ण आणि मूकबधिर व्यक्तींसाठी संवादाचा मास्क बनवलाय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here