मचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘आपलं घर’ या आश्रमशाळेतील विजयने वयाच्या १६ व्या वर्षी अभंग रचलेत…..


 

“धर्मांधात घेती उगीचच पंगा
माझी स्वेदगंगा शिवारात||”

ही रचना वाचल्यावर असे वाटते की, कुण्यातरी एका नामवंत साहित्यिकांची अथवा कवीची असेल. पण नाही तर ही रचना आहे इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विजय जाधव याची. बालप्रतिभा असलेल्या विजयने वयाच्या १६ व्या अभंगाची रचना करण्यास सुरूवात केली. समाजमाध्यमांतून त्याच्या कविता अाणि अभंगाना प्रचंड दाद मिळताना दिसतेय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचा हा भूषण, सामान्य कुटुंबातला, आई अक्षरशत्रू, वडीलांच छत्र बालपणीचं हरपलेलं, उस्मानाबादमधील राष्ट्र सेवा दल संचलित ‘आपलं घर’ या आश्रमशाळेत तो लहानाचा मोठा झाला. ना भाऊ-बहिण… एकांताच्या कळा सोसताना व्यक्त होण्यासाठी बालवयातच कवितेची वाट सापडली. अन् सुरू झाली मराठवाड्याची काव्यबरसात. पुढे तो कवितेनंतर अंभग लिहू लागला.

अभंग

“पितिया दारु मैत्रिण पारु
मागतीया चकना खातिया सुपारीचा बुकना
अगं शांताबाई”

विजयने इयत्ता सातवीत असताना केलेली ही त्याची पहिलीच दिलखेच रचना. पुढे त्याला वाचनाचं वेड लागलं. आठवड्यात दोन-तीन पुस्तके सहज वाचून संपवायचा. यामुळे काळ अनुभवायच्या आधीच चार गोष्टी कळू लागल्या. पुढे तो एकापेक्षा एक तरल, गहन, बहारदार रचना आपल्या करु लागला. कविता, चारोळी, यांसह आता कोरोनाच्या काळात नुकतंच या बालकवीने अभंग आणि लोकगीते लिहिण्यास सुरुवात केली आहे.

काव्य लेखन स्पर्धेला मिळाला राज्यातून प्रतिसाद

पाऊस आला रे पाऊस
आनंदी झाला राजा बळी,
चढला रे धीर तुला
फुलली सोन्याची कळी..

कल्पना करा शेतकऱ्यांचं पोरं म्हटल्यास, विषण्णता, नाराजी, निराशा हिच मळकी अंगके मनात येतात; परंतु अलग दृष्टीकोन बाळगणारा हा नवसाहित्यिक निराळ्याच धाटणीचा आहे. ‘आशावादी’ शेतकरी साहित्याकडे याचा कल आहे. विजयने आशावादी शेतकरी साहित्य प्रस्थापितेसाठी काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. सबंध महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद लाभला होता.

व्हायचं आहे मराठीचा प्राध्यापक.

विजय नुकताच दहावीची परीक्षा ८४ टक्के गुण मिळवत उत्तीण झाला अाहे. भविष्यात मराठी विषयाचा प्राध्यापक होण्याचा त्याने चंग बांधला आहे. ‘आपलं घर’ वसतिगृह शाळेतील शिक्षक अाणि मित्र सर्वांच्या विश्वावासामुळे त्याच कवित्व आहे, असे तो निरागसपणे सांगतो. बालप्रतिभा लाभलेल्या विजयचा नावाप्रमाणे गवगवा होईल यात शंका नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

या प्रसिद्ध चित्रकाराने कर्ण आणि मूकबधिर व्यक्तींसाठी संवादाचा मास्क बनवलाय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here