आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कुत्र्याना घराची सुरक्षा करताना आणि चोरांना पकडताना आपण खुप वेळा पाहिले असेल. परंतु आपण कधी निवडणुकिच्या मैदानामध्ये कुत्र्याला पाहिले आहे ? जास्त परेशान होऊ नका पहिल्यांदा पुर्ण बातमी वाचा.
नेत्यांचे निवडणुक लढणे आणि जिंकणेतर साहजिक आहे. परंतु कधी नेत्यांची लढत निवडणुकीच्या मैदानात कुत्र्यासोबत झालेला पाहिले आहे?

कुत्रा

आपले उत्तर नाही असेच असणार परंतु अशी अजब घटना घडली आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये. येथे मॅक्स नावाच्या कुत्र्याला महापौर म्हणुन निवडले आहे. महापौर मैक्सच्या नावान मैक्सची ऑफिशियल फेसबुक आइडी सुध्दा आहे. एवढंच नाही तर मैक्सचे भाऊ बहिण माइकी आणि मित्जी यांना डिप्टीमहापौर बनवल्या गेले.

कुत्र्याला महापौर बनवण्याचा उद्देश.

मैक्स च्या फेसबुक आइडी वर खुप फोटो पोस्ट केलेल्या आहेत. नविन महापौरची मुख्य जिम्मेदारी आहे पर्यटक , स्थानिक लोक, सोशल मीडिया यांच्यासोबत फोटो काढणे. सोबतच महापौरला शहरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. जास्त हैराण होऊ नका या महापौरचे काम शहराच्या किंवा लोकांच्या समस्या सोडवणे नसेल. कुत्र्याला महापौर बनवण्याचा उद्देश म्हणजे लोकांना जनावरांच्या प्रती सहानुभूती वाढवणे आहे.

 सन २०१२ मध्येही मैक्सला महापौर बनवण्यात आले.

कुत्रा

एवढंच नाहीतर मैक्सला एक गाडीही देण्यात आली होती.  या महापौरचे पुर्ण नाव मैक्सिमस म्यूलर आहे आणि मैक्स गोल्डन रिट्रीवर प्रजातिचा आहे. हि गोष्ट खुपचं कौतुकास्पद आहे की कुत्र्याला एवढी इज्जत दिली जाऊ शकते याचा कुणी विचारही करु शकत नाही.

आपल्या देशात तर माणसांचीच कद्र केली जात नाही तर कुत्र्यांची कोण करणार. नेत्यांना तर फक्त आपली आणि नातेवाईकांची प्रगती व्हावी वाटते. देश आणि देशातील लोकांचे तर त्यांना एकदाच घेणे देणे असते जेंव्हा निवडणूक येते. बाकी वेळी तर ते कुणाला ओळखतही नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here