आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी युवक करतोय प्रबोधन

अनेकांना केले आत्महत्येपासून परावृत्त: शेतकर्‍यांना ‘शिवार संसद’ देतंय जगण्याचं बळ


 

सोलापूर :  गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारीपणाला कंटाळून  महाराष्ट्रातल्या अनेक शेतकर्‍यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. कृषीप्रधान देशामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा सुन्न करणारा आहे. त्यात आघाडीवर महाराष्ट्र आहे.

शेतकरी कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केल्याने कित्येक घरे उद्धवस्त होत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकरी वर्गात प्रबोधन करण्यासाठी एका तरुणानं ‘शिवार संसद’ नावाने एक समविचारी तरुणांचं व्यासपीठ उभारलंय आणि त्या माध्यमातून राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांबरोबरच अन्य ठिकाणीही तो जनजागृती करतोय.

आत्महत्या

विनायक हेगाणा अस या तरुणाचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात स्थायिक. बीएसस्सी अॅग्रीकल्चर शिक्षण घेतलेल्या विनायकला नोकरी-व्यवसाया ऐवजी शेतकऱ्यांविषयी काहीतरी सामाजिक काम करावे असे मनोमन वाटायचे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही मोठी समस्या बनली होती.

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या कुटुंबाला एक सन्मानजनक वागणूक मिळावी, मुलांना चांगले शिक्षण मिळावे तसेच आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा त्याने चंग बांधला आणि आपले कोल्हापूर गाव सोडून तो उस्मानाबाद जिल्ह्यात स्थायिक झाला.

महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करतो?या प्रश्नांची उकल करण्यासाठी विनायक महाराष्ट्रभर गावोगावं फिरून शेतकर्‍यांशी संवाद साधू लागला. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागला. यातून त्याने काही निरीक्षणे नोंदवली. शेतीला पाणी नाही पिकाला हमीभाव नाही हेच या आत्महत्या पाठीमागचे कारण समोर आले.

हे काम करत असताना त्याच्या संवाद यात्रेत महाराष्ट्रातील समविचारी तरुण-तरुणी सहभागी झाले आणि यातूनच शिवार संसद नावाचे व्यासपीठ साकारले गेले. आज ‘शिवार संसद’ हे शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचं राज्यातलं एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पुढं येत आहे.

शिवार संसद शी आज महाराष्ट्रातले तीन हजारहून अधिक तरुण-तरुणी जोडले गेले आहेत. ही सर्व तरूणाई शेतकरी कुटुंबातील आहेत. या तरूणाईने ग्रामीण जीवन जवळून अनुभवले आहे. उस्मानाबाद, लातूर, सोलापूर अाणि बीड जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शिवार संसदच्या माध्यमातून विनायक आणि त्याचे सर्व तरुण सहकारी शेत शिवारात जाऊन लघुपट, गोष्टी, कथा आदी माध्यमातूनशेतकर्‍यांचे प्रबोधन करतात.

आत्महत्या

संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवतात. आर्थिक मदतही करतात. मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाला हातभार लावतात. तरुणाईच्या या प्रयत्नांमुळे आज अनेक शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.

 

आर्थिकदृष्टया सुबत्ता असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशाला हादरवून सोडणारा आहे. शिवार संसदने दिलेला मानसिक आधार आणि प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

 

शिवार हेल्पलाइन आत्महत्या रोखण्याचा ठरतोय दुवा

आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना वेळीच बाहेर काढून त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्यासाठी ( ८९५५७७१११५) शिवार हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. जून महिन्यापासून ते आत्तापर्यंत २२७७ शेतकऱ्यांचे फोनद्वारे समुपदेशन केले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढला जातो.

यासाठी  जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, वैयक्तिक पातळीवर मदत केली जाते. शेती विषयक, सामाजिक, शासकीय, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, घरगुती, मुलां-मुलीचे वैवाहिक, व्यसनाधीनता, नोकरी विषयक, जोडधंदा इ. प्रश्न सोडवण्यासाठी समन्वयातून सल्ला व मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण काम शिवार हेल्पलाइन मार्फत केले जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

शिष्याने गुरुला हरविले: आयपीएलमध्ये दबंग दिल्ली कॅपिटल्स पुढे चेन्नई सुपरकिंग्ज झाली चीत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here