आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘या’कारणासाठी १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडने ‘कॅप्टन कूल’ धोनीला ड्रेसिंग रूममध्ये चांगलेच झापले होते; सेहवागचा धक्कादायक खुलासा


सौम्य स्वभाव असलेला राहुल द्रविड जेंटलमन्स गेम नावाच्या क्रिकेटचा खरा राजदूत आहे.  ‘मिस्टर डिपेंडेबल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड कधीच रागात दिसला नाही. नुकत्याच रिलीज झालेल्या एका जाहिरातीमध्ये द्रविडला रागात असल्याचे दाखवले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. राहुलचे हे रुप पाहून स्वत: भारतीय कर्णधार कोहलीदेखील आश्चर्यचकित झाला.

या जाहिरातीवर आशिष नेहरा याच्याशी बोलताना वीरेंद्र सेहवागने 15 वर्षापूर्वी घडलेला किस्सा सांगितला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर सेहवाग म्हणाला की, 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान युवा महेंद्रसिंग धोनीने सहज विकेट गमावल्यावर माजी कर्णधार राहुल द्रविडला प्रचंड राग आला होता.

राहुल द्रविड

new google

वीरूने माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला सांगितले की, ‘राहुल द्रविड किती प्रमाणात रागावू शकतो हे मी पाहिले आहे.  ही घटना पाकिस्तानच्या दौर्‍यावेळची आहे आणि धोनी तेव्हा संघात नवीन होता. त्याने पॉईंटवर फटका मारला आणि झेलबाद झाला. त्याच्या या शॉटवर द्रविड खूप रागावला होता. त्यावेळी द्रविड रागाने म्हणाला होता की, तु अशा पध्दतीने क्रिकेट खेळतो का? सामना संपवूनच तू ड्रेसिंगरूममध्ये यायला पाहिजे होतास.’

सेहवाग म्हणाला, “जेव्हा धोनी पुढच्या वेळी फलंदाजीला आला तेव्हा मला दिसले की तो बरेच फटके मारत नव्हता. मी जाऊन त्याला विचारले काय झाले. द्रविडकडून मला पुन्हा रागावून घेण्याची इच्छा नाही असे तो म्हणाला. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या द्रविडने गांगुलीच्या अनुपस्थितीत 2005 मध्ये प्रथम कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली.

राहुल द्रविड
राहुल द्रविड

सौरव गांगुलीच्या नंतर द्रविडला पूर्णवेळ कर्णधारही बनवण्यात आले. ‘जेमी’ च्या नेतृत्वात भारताने 20 कसोटी सामने खेळले, 62 एकदिवसीय सामने खेळले. या काळात वेस्ट इंडीज, बांगलादेश, इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला तर 104 आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांपैकी 50 सामन्यांमध्ये संघ जिंकला. 39 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि 11 सामने अनिर्णीत अनिर्णित राहिले होते.

निवृत्तीनंतर राहुल द्रविड भारतीय ‘अ’ संघ आणि 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. यासोबत बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रमुख म्हणून काम पाहतोय. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्याने राहुल द्रविडला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची विनंती केली होती. मात्र द्रविडने ती ऑफर स्वीकारली नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here