आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

डॉ. आंबेडकरांकडे होता पेन अन शिसपेन्सिलचा अनोखा संग्रह


 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या निर्मितीपुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या कर्तबगारीचा आवाका फार मोठा आणि विविधांगी आहे. या महामानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक श्रेष्ठतम पैलू आहेत. एक चांगला नेता, समाजसुधारक, पत्रकार, वकील, तत्त्ववेत्ता, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख तर आहेच शिवाय बाबासाहेब हे चांगले संग्राहक सुद्धा होते. त्यांच्याकडे दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके संग्रहित होतीच. तसेच त्यांनी आपल्याकडे विविध रंग आणि आकारांच्या पेन आणि शिसपेन्सिलचा संग्रह केला होता.

आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या एका छंदाची माहिती पाहणार आहोत. आपल्या अभ्यासाबरोबर बाबासाहेब काही आवडीनिवडीसुद्धा जपत होते. त्यापैकी पेन आणि पेन्सिलचा संग्रह गोळा करण्याचा हा छंद महाविद्यालयीन जीवनापासून होता. उत्तम आणि महागडे पेन बाळगण्याची हौस त्यांना होती. या कामी त्यांचा साहाय्यक जॉन मुंबईतला बाजार धुंडाळून शहरात उपलब्ध असलेले विविध आकाराचे पेन आणून देत असे. बाजारात एखादे नवे पेन आले तर ते खरेदी करणे आणि संग्रहित करणे हे बाबासाहेबांच्या आवडीचे काम.

बाबासाहेब पेन घेण्यापूर्वी छोट्या कागदावर आपली स्वाक्षरी करून पाहात आणि मग खरेदी करायचे. प्रत्येक कोटाला शोभतील असे आवडलेले पाच-सात पेन लावत असत. यातल्या काही पेनाचा संग्रह हा पुणे येथील सिम्बॉयसीस संग्रहालयात पाहायला मिळतो. लिखाणासाठी निरनिराळ्या तऱ्हेच्या शिसपेन्सिलीने जमवण्याचा छंद बाबासाहेबांना होता. त्या शिसपेन्सिलीने देखील रंगीत असायच्या. बाबासाहेब घराबाहेर पडले की, अगोदर ते स्टेशनरीच्या दुकानापुढे थांबत. दुकानदार निरनिराळ्या प्रकारच्या २०-२५ पेन्सिली त्यांच्यापुढे आणून ठेवत असे. त्यापैकी ७-८ पेन्सिली ते विकत घेत.

आंबेडकर

पेन्सिल हरवली की रागाला यायचे.

निरनिराळ्या तऱ्हेच्या फाऊंटन पेन प्रमाणेच विविध शिसपेन्सिल बाबासाहेब आंबेडकरांच्या टेबलावर असत. त्यापैकी एखादी शिसपेन्सिल त्यांच्या टेबलावरून कुणी नेली किंवा हरवली तर जाम भडकत असत. हरवलेली शिसपेन्सिल शोधून देण्यात घरातल्या मंडळींना मात्र कसरत करावी लागत होती. शिसपेन्सिल सापडली की, त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसायचा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.


 

हेही वाचा:

एम एस धोनीला खुणावताहेत ‘हे’ विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला यष्टीरक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here