आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘युनिव्हर्सल बॉस’चा आयपीएलमध्ये नवा विक्रम: अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज


 

किंग्ज इलेव्हन पंजाबचा डावखुरा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएल 2021च्या त्याच्या पहिल्याच सामन्यात नवीन विक्रम नोंदविला. 41 वर्षीय गेल हा आयपीएलच्या इतिहासात 350 षटकार ठोकणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्सविरूद्ध हा पराक्रम केला. आठव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर गेलने बेन स्टोक्सला स्क्वेअर लेगवर षटकार ठोकून हा विक्रम केला.

एबी डिव्हिलियर्स जास्तीत जास्त षटकारांच्या बाबतीत आयपीएलमध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने 157 डावात 237 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर धोनी 216 षटकारांसह तिसर्‍या स्थानावर आहे. सामन्यात गेलने अवघ्या 28 चेंडूत 40 धावा केल्या. या दरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याने राहुलबरोबर दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही रचली.

युनिव्हर्सल बॉस

गेलने सध्याच्या संघात पंजाबसाठी 86 षटकार ठोकले आहेत. तो आरसीबीकडून सात वर्षे खेळला आहे. त्याने या संघासाठी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. गेलने 2011 मध्ये 44, 2012 मध्ये 59, 2013 मध्ये 51 षटकार ठोकले होते. पुढच्या चार वर्षांत त्याने 89 षटकार ठोकले. जे त्याच्या प्रतिष्ठेपेक्षा कमी होते. गेलने आतापर्यंत आयपीएलच्या 133 सामन्यात 150 पेक्षा जास्त च्या स्ट्राइक रेटने 4812 धावा केल्या आहेत. त्याने लीगमध्ये सर्वाधिक 6 शतकेही केली आहेत. त्याने 31 अर्धशतकेही ठोकली आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here